#Secularism सेक्युलॅरिझम म्हणजे काय ? गौतमीपुत्र कांबळे
धर्मसत्ता श्रेष्ठ ? (religion)की राज्यसत्ता श्रेष्ठ ? (Monarchy) पोप श्रेष्ठ ? (pope) की सम्राट (king)श्रेष्ठ ?काल्पनिक जगाचे वर्चस्व मानायचे? हा युरोपातील (Europe)संघर्षातून धर्मसत्ता आणि राज्यसत्ता मान्य झाल्या का? काय होता 'दोन तलवारींचा सिध्दान्त'? या दोन सत्तांची फारकत कशामुळे झाली? सेक्युलर (Secular)तत्त्व म्हणजे काय ? परखड विश्लेषन केलं आहे, लेखक गौतमीपुत्र कांबळे यांनी...;
मानवी विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मानवी हिताच्या उद्देशाने आणि मानवी संगोपन आणि संरक्षणाच्या गरजेतून कुटुंबसंस्थेपासून ते धर्मसंस्थेपर्यंत वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण झाल्या. या सगळ्या एककेंद्री या बहुकेंद्री सत्ता बनल्यावर त्या मानवी दुःख, गुलामगिरी आणि शोषणाच्या जशा कारण बनल्या तशाच त्या समर्थकही बनल्या. धर्मसत्तेने पारलौकिक काल्पनिक जगाच्या मोह आणि भय यांच्या आधारे, त्याला पूरक अशा तत्त्वज्ञानात्मक आणि मूल्यात्मक व्यवस्थेच्या आधारे अन्य व्यवस्थांवर आपले वर्चस्व दीर्घकाळ अबाधित ठेवले त्यामुळे या जगाशी संबंधीत असलेली राज्यसत्ताही दुय्यम आणि दुबळी ठरवली गेली.
पण पुढे विवेकी लोकांना काल्पनिक अशा पारलौकिक जगाचा मोहही वाटेना आणि भयही त्यामुळे त्यांनी पारलौकिक जगाचे केवळ अस्तित्वच अमान्य केले नाही तर त्या जगाचा आधार बनलेले तत्त्वज्ञान आणि मूल्यव्यवस्थाही नाकारली आणि मग संघर्ष सुरु झाला. धर्मसत्ता श्रेष्ठ ? की राज्यसत्ता श्रेष्ठ ? पोप श्रेष्ठ ? की सम्राट श्रेष्ठ ? पारलौकिक काल्पनिक जगाचे वर्चस्व लौकिक जगाने का मानायचे? हा संघर्ष युरोपमध्ये काही शतके सुरु होता. शेवटी तडजोड होऊन धर्मसत्ता आणि राज्यसत्ता या वेगवेगळ्या आणि स्वतंत्र सत्ता असल्याचे मान्य करण्यात आले. यालाच 'दोन तलवारींचा सिध्दान्त' म्हटले गेले आणि या दोन सत्तांची फारकत झाली. ही फारकत ज्या तत्त्वाने झाली. तेच सेक्युलर तत्त्व होय.
त्यामुळे सेक्युलॅरिझमची व्याख्या करण्यात आली की, Secularism means a wall of Separation between Church and State. तसेच सेक्युलर तत्त्वाने पारलौकिक जगाचे अस्तित्व नाकारल्यामुळे सेक्युलॅरिझमची व्याख्या करण्यात आली की, 'Secular means worldly or material not religious or spiritual. अशाप्रकारे या जगाने चैत्यन्यवादाची आणि धार्मिकतेची फारकत घेतल्याने या लौकिक जगात जे महत्त्वाचे त्यापासूनही पारलौकिकतेला आणि धर्माला अलग ठेवण्यात आले. आणि व्याख्या करण्यात आली की, "The belief that state, morals, education etc. should be independent of religion' इतकेच नव्हे तर याहीपुढे जाऊन सेक्युलॅरिझमची व्याख्या करण्यात आली की, a system of political or social, philosophy that rejects all forms of religious faith' अलीकडे तर Secularism and Humanism यात भेदच केला जात नाही.
George Jacob Holyoake यांनी प्रथम Secularism ची सूव्यवस्थीत मांडणी केली त्याने आपल्या, The principles of Secularism सेक्युलॅरिझमची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. Holyoake यांनी म्हटले आहे की, पुस्तकात 'Secularism purposes to regulate human affairs by considerations purely human... The leading ideas of secularism are humanism, moralism, materialism, utilitarian unity, Humanism, the physical perfection of this life - Moralism founded on the laws of Nature, as the guidance of this life
Materialism as the means of Nature for the Secular improvement of this life. - Unity of thought and action upon these practical grounds. Secularism teaches that the good of the present life is the immediate concern of man, and that it should be his first endeavor to raise it. Secularism inculcates a morality founded independently upon the laws of Nature. It seeks human improvement through purity and suitableness of material condition as being a method at once moral, practical, universal, and sure.' त्यावरुन या वैशिष्ट्यांची तुलना केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'धम्मा'ची जी वैशिष्ट्ये सांगितली आहेत त्याच्याशीच होऊ शकते.
सेक्युलॅरिझम हा भारतीय संविधानाच्या मूळ ढाच्याचा अनिवार्य भाग सुरुवातीपासूनच मानण्यात येत असला तरी 'सेक्युलर'ची भारतात दखलपात्र चर्चा सुरु झाली ती १९७६ साली ४२ वी घटना दुरुस्ती करुन सेक्युलर शब्द संविधानाच्या उद्देशिकेत (Preamble) घातल्यानंतर! परंतु सेक्युलर ची व्याख्या न केल्यामुळे इथल्या धार्मिक आणि राजकीय विद्वानांनी आपापल्या सोयीची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आजही 'सर्वधर्मसमभावा' सारखी किंवा 'राज्याने सर्व धर्माना समान आदराने वागवावे' यासारख्या अपूया आणि चुकीच्या व्याख्यांचा सर्रास वापर केला जातो. याला स्वातंत्र्य लढ्यात सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची पार्श्वभूमीही कारणीभूत आहे.
भारतीय संविधानातील अनेक कलमे सेक्युलॅरिझमशी थेट संबंधीत आहे. We the people of India' प्रास्ताविकेतील ही सुरुवातीची संकल्पनाच सेक्युलॅरिझमचा उद्घोष करते. कलम १४ ते १८ आणि २५ ते ३० आणि ४४ ही कलमे सेक्युलॅरिझमच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची. २५ (१) कलम तर सेक्युलॅरिझमची सम्यक व्याख्याच करते. २५ (१) नुसार, 'सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमता व आरोग्य आणि या भागातील (भाग ३) अन्य तरतुदींच्या आधीन राहून सद्सद्विवेकबुध्दीच्या स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याच्या, आचरण्याच्या व त्याचा प्रसार करण्याच्या अधिकाराला सर्व व्यक्ती सारख्याच हक्कदार असतील.' सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमता व आरोग्य यापैकी कशालाही, कोणाच्याही धर्म स्वातंत्र्याच्या पालनामुळे बाधा आल्यास शासन आणि न्यायपालिका त्यामध्ये हस्तक्षेप करणार आणि हेच सेक्युलॅरिझमचे कार्य आहे.
याचा अर्थ धार्मिक स्वातंत्र्य निरंकुश नाही. तसेच सेक्युलर तत्त्व तटस्थ (Neutral) नाही. या पार्श्वभूमीवर सेक्युलॅरिझमची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल. मानवी दुःख, गुलामगिरी आणि शोषणाचे कारण आणि समर्थन बनलेल्या सर्व धार्मिक व्यवस्थांमध्ये, आणि अशा धार्मिक व्यवस्थांनी ज्या अन्य व्यवस्थांमध्ये (उदा. शिक्षण, कला, साहित्य, शासन इत्यादी) शिरकाव केला आहे. त्याही व्यवस्थामध्ये मानवमुक्तीसाठी हस्तक्षेप करणारे कृतीशील तत्त्व म्हणजे सेक्युलॅरिझम होय.'
--- गौतमीपुत्र कांबळे ---