२००९ मध्ये जुनागढ इथं आयात केलेल्या ४ चित्त्यांचं काय झालं?
तब्बल ७० वर्षांनी भारतात चित्ते आणले गेले असं सांगितलं गेलं. त्यावेळी पंतप्रधानांनी बोलताना याआधी कधीच चित्त्यांना भारतात आणण्याचे गंभीर प्रयत्न केले गेले नाहीत असं सांगितलं पण ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार यांनी पंतप्रधानांना त्यांच्याच जुन्या प्रकल्पाची आठवण करून दिली आहे. नेमकं काय म्हणाले आहेत रविश कुमार जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख...;
१३ वर्षांपुर्वी जेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा सिंगापुरहून चार चीत्ते आणले गेले होते. जूनागढमध्ये या चित्त्यांना ठेवलं गेलं होतं. २००९ ला छापल्या गेलेल्या काही बातम्यांनुसार चित्त्यांच्या बदल्यात सिंगापुर ला गिर चे सिंह दिले जाणार होते. तेव्हा माध्यमं गोदी मीडिया बनली नव्हती. तेव्हा या घटनेला इतर सामान्य बातम्यांप्रमाणेच कव्हर केलं गेलं होतं. १३ वर्षांनंतर याला मेगा इव्हेंट बनवलं आहे. बातम्यांमध्ये सांगितलं जातंय की ती केंद्र सरकारची योजना होती. ही बाब तेव्हाची काही कागदपत्रे आणि पत्रकारच चांगल्या पध्दतीने सांगू शकतात.
टाइम्स ऑफ इंडिया ने छापलं आहे की २००९ च्या आधीही तीन चीत्ते आणले गेले होते. दोन चित्ते दिल्ली च्या प्राणीसंग्रहालयात ठेवले होते तर एक चित्ता हैदराबाद इथं ठेवण्यात आला होता. यानंतर काही कारणास्तव तिन्ही चित्ते मरण पावले. अनेक वृत्तपत्रांनी लिहिलं आहे की सेंट्रल ज़ू अथॉरिटी ने गुजरात सरकार च्या राज्यात चित्ते आणून त्यांची संख्या वाढवण्यासाठी च्या प्रस्तावाला परवानगी दिली होती. २०१२ ची एक बातमी आहे की सिंगापुर वरून आणलेली एक मादी चित्ता चा मृत्यू झाला आहे. मादी चित्त्याच्या आधी एक नर चित्ता सुध्दा मरण पावला आहे. आणखी एक बातमी छापून आली होती की २०१४ येईपर्यंत सर्व चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.
जूनागढ पुर्वी तीन चित्त्यांचा मृत्यू, जूनागढ मध्ये चार चित्त्यांचा मृत्यू... एकूण सात चित्त्यांना वसवण्याचा प्रकल्प अयशस्वी ठरला. आता पुन्हा चित्ते आणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जुनागढ च्या अपयशाबद्दलही काही म्हणाले आहेत का?
पंतप्रधान मोदींनी सांगितलं की भारतात चित्ते आणून त्य़ाना वसवण्याचे गंभीर प्रयत्न नाही झाले. मी काही त्यांचं भाषण ऐकलं नाही. जुनागढ मध्ये अपयशी ठरलेल्या प्रकल्पाबद्दलही ते काही म्हणाले आहेत का? य़ा व्हिडीओमध्ये आपण गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री के नरेंद्र मोदी यांनी जूनागढ मध्ये चित्ते आणण्याच्या प्रकल्पावर बोलताना ऐकू शकता.
लेखक
रविश कुमार