मंत्रालया समोर आत्म-हत्या: एक जीव गेला दोघांचे जगण्याचे शर्थीचे प्रयत्न
मंत्रालयाजवळ दोन महिलेनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून एक महिलेची परिस्थिती गंभीर असून त्याना तात्काळ मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिढीत महिला ह्या वेगवेग्ळ्या ठिकाणी राहत असून, त्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहे.;
मंत्रालयाजवळ दोन महिलेनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून एक महिलेची परिस्थिती गंभीर असून त्याना तात्काळ मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिढीत महिला ह्या वेगवेग्ळ्या ठिकाणी राहत असून, त्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहे. शीतल गादेकर(धुळे)आणि संगिता ढवरे (नवी मुंबई) अशी ह्या महिलांची नावे आहे. त्यात मृत महिलेचे नाव शितल गादेकर(धुळे) असे आहे.
घटनेचा मागोवा लक्षात घेता ह्या महिला एका समाजसेवकाच्या संपर्कात होत्या. त्यानी ह्या महिलांना हे कृत्य करण्याची युक्ती दीली. ह्या दोन्ही महिला वेगवेगळ्या जिल्ह्यातून आल्या आणि एका टॅक्सीतून त्या मुंबई मंत्रालयात गेल्या आणि त्यांनी विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला. पोलिस तपासातून असे लक्षात आले की एका महिलेचे पत्ती संगिता ढवरे या (नवी मुंबई) येथील पोलिस काँन्सटेबल आहेत. त्याचा पाय एका शस्त्रक्रियेत निकामी झाला, तर डाँ. विरूध्द पोलिस तक्रार व्हावी म्हणून ही महिला मागणी करत होती. तर शीतल गावेकर(धुळे) या महिलेच्या पत्तीच्या निधनानंतर पत्तीच्या मित्राने जमिन बळकावली ह्या घटनेची तपासनी व्हावी, ही मागणी होती.
काल मंत्रालयाच्या बाहेर तीन आत्महत्या झाल्यात. त्यामध्ये दोन स्त्रिया एक पुरुष,यातील एका महिलेचा मृत्यू झालाय,दोघांवर उपचार सुरू आहेत.लोक प्रचंड नाडले गेलेत,व्यवस्थेला वैतागून त्यांनी स्वत:चे जीवन संपविण्याचा निर्णय घेईपर्यंत परिस्थिती ओढवली,सत्तेत बिगर भाजप पक्ष नाही,त्यामुळे याची बातमी करून मिडिया आकांडतांडव करणार नाही,सगळं शांत आहे. दिसली काही बातमी डीबेट? हॅशटॅग न्याय द्या म्हणून? कसं दिसणार हे सगळं दाबण्यासाठी सगळे काम करतात अशी प्रतिक्रिया सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त केले जात आहे.