शेअर बाजारात गुंतवणुक करायची आहे पण फार काही ठाऊक नाही? मग तर हा लेख वाचाच

सध्याच्या काळात तरूणांचा कल हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यामध्ये जास्त असलेला दिसतो. अनेकांना गुंतवणूक करायची असते परंतू फारशी माहिती नसल्याने तरूण हात आखडता घेतात किंवा पैसै गुंतवले तरी गमावून बसतात. अशाच लोकांनी नेमकं काय कराव? जाणून घेण्यासाठी वाचा संजीव चांदोरकरांचा हा लेख...;

Update: 2022-09-10 03:59 GMT

सध्याच्या काळात तरूणांचा कल हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यामध्ये जास्त असलेला दिसतो. अनेकांना गुंतवणूक करायची असते परंतू फारशी माहिती नसल्याने तरूण हात आखडता घेतात किंवा पैसै गुंतवले तरी गमावून बसतात. अशाच लोकांनी नेमकं काय कराव? जाणून घेण्यासाठी वाचा संजीव चांदोरकरांचा हा लेख...

शेअर्समध्ये नव्याने गुंतवणूक करण्यास सुरुवात केलेल्यांसाठी काही गोष्टी

कोणत्याही कंपनीच्या शेअरची फक्त खरेदी किंवा फक्त विक्री कधीच होऊ शकत नाही ;

लक्षात घ्या. विक्रेत्याला कोणीतरी खरेदीदार मिळाल्याशिवाय तो विक्रीच करू शकणार नाहीये , आणि खरेदीदाराला कोणीतरी विकणारा लागणार

एखाद्या शेअरची कोण विक्री का करेल , ज्यावेळी त्याला त्या शेअरमध्ये रस कमी झाला असेल ; आणि दुसरा कोणी खरेदी का करेल तर त्याला त्यात अजून नफ्याची शक्यता वाटत आहे म्हणूनच

दुसऱ्या शब्दात , एकाच शेअर बद्दल दोन टोकाचे वित्तीय दृष्टिकोन असल्याशिवाय मार्केट स्थिर होणार नाही , बरोबर ?

परकीय गुंतवणूकदारांची (एफआयआय ) भारतीय शेअर बाजारातील मध्यमवर्गीय गुंतवणूकदारात सतत चर्चा असते,

एफआयआय म्हणजे संस्थात्मक गुंतवणूकदार ; म्हणजे कोणी व्यक्ती नाहीत; एफआयआय कडे प्रोफेशनल / अनुभवी फंड मॅनेजर्स असतात , इक्विटी रिसर्च करणाऱ्या टीम्स असतात

कधी केलाय विचार कि एफआयआय झुंडीने एकदम भारतात कसे येतात आणि झुंडीने कसे जातात ; एकाचवेळी बहुसंख्य एफआयआय भारतीय शेअर्सचे खरेदीदार होतात किंवा विक्रेते होतात

हे कसे काय ?

एखाद्या एफआयआयला वाटले अमुक शेअर विकावा (काही कारणांनी ) तर दुसऱ्या एफआयआयला असे वाटले पाहिजे ना नाही हा शेअर खरेदी करण्याच्या लायकीचा आहे

म्हणजे ५० एफआयआययनी १००० कोटी रुपयांचे शेयर्स विकले, आणि त्याचवेळी एफआयआयच्या दुसऱ्या गटाने १००० कोटींचे शेअर्स विकत घेतले , तर एफएआयआय एक गट म्हणून नेट खरेदी विक्री शून्य होईल , किंवा तो फरक कमी असेल

पण असे होत नाही ; का ? विचार तर कराल

दुसरा मुद्दा :

फक्त काही महिन्यापूर्वी भारतातील शेअर मार्केट अनाकर्षक वाटत होते म्हणून हजारो कोटीचे शेअर्स एफआयआय गटाने विकले होते , आता फक्त दोन चार महिन्यात त्यांचे मत १८० कोनात बदलले ? आणि ते पुन्हा एकदा खरेदी करू लागले ? का ? विचार तर कराल ?

तिसरा मुद्दा

एफआयआय सारखे संस्थात्मक गुंतवणूकदार एकाचवेळी कॅश आणि डेरिव्हेटीव्ह सेगमेंट मध्ये खेळत असतात ; म्हणजे कॅश सेगमेंटमध्ये ते खरेदीदार असतील तर डेरिव्हेटीव्ह मध्ये त्यांनी शॉर्ट पोझिशन्स / विक्रेते घेतलेल्या असतात

जे एफआयआय नी आता केले आहे

____

देशातील डिमॅट धारकांची संख्या १० कोटीवर गेली आहे ; त्यात तरुण तरुणींची संख्या खूप मोठी आहे ; आणि मुंबई दिल्ली सारख्या महानगरांपलीकडील छोट्या शहरात हे लोन पसरवले गेले आहे

सांभाळून गुंतवणूदार मित्रानो ; शेअरबाजार वाईट किंवा चांगला नसतो ; शेअरबाजारात दोनच प्रकारचे गुंतवणूकदार असतात , डोळस आणि आंधळे ; व्हायचे असेल तर डोळस गुंतवणूकदार व्हा , सतत स्वतःला , तुमच्या ग्रुपमध्ये प्रश्न तर विचाराल ?


संजीव चांदोरकर (१० सप्टेंबर २०२२)

Tags:    

Similar News