#UkraineRussia : आग एक ना एक दिवस तुमच्या दारात येणार : तुषार गायकवाड

युक्रेन-रशिया युध्दादरम्यान हजारो भारतीय विद्यार्थी अडकले असतान सरकारने ऑपरेशन गंगा सुरु करुन विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. पाच प्रश्न उपस्थित करुन मोदी सरकारला तुषार गायकवाड यांनी प्रश्न विचारले आहेत....;

Update: 2022-03-02 12:00 GMT

युक्रेन मधील भारतीय विद्यार्थ्यांपैकी जवळपास ११५ विद्यार्थी बेपत्ता आहेत. याबाबत केंद्र सरकारच्या परराष्ट्र खात्याकडे कोणतीही ठोस माहिती नाही. त्यांची शोधमोहीम SOS इंडिया यांचेमार्फत पुण्यात बसून सुरु आहे. या ११५ जणांच्या सोशल मेडीया अ‍ॅक्टिव्हिटीज तसेच इतर सहकारी मित्रमंडळीशी संपर्क करुन शोधण्याचे काम सुरुय.

पहिला प्रश्न - परराष्ट्र मंत्री कुठे आहेत? काय करत आहेत?

नेहमीप्रमाणे शेठ व त्यांचा आयटी सेल प्रत्येक घटनेवेळी नीचतेची आणखी एक पातळी गाठत असतो सध्याही तेच सुरुय. खारकिव्ह मध्ये आज कर्नाटकच्या एका विद्यार्थ्याचा जीव रशियन सैनिकांच्या हल्ल्यात गेलाय. याच विभागात अजूनही सुमारे ४०० च्या आसपास विद्यार्थी अडकलेत काहींशी संपर्क तुटलाय. संपूर्ण खारकिव्ह मध्ये सुमारे ४००० विद्यार्थी आहेत.

दुसरा प्रश्न - घरावर, गाडीवर, कपड्यांवर तिरंगा लावल्यास रशियन सैनिक मदत करणार. अशा खोट्या बातम्या देणारे भडवे पत्रकार आणि संपादक कुठायंत?

भक्तांनी अफवा पसरवत रशियन संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांनी युक्रेन मधील भारतीयांनी घर-गाडी वर तिरंगा लावल्यास सैनिक सुरक्षित स्थळी पोहोचवतील असे फोटोशॉप, ग्राफिक्सच्या माध्यमातून असत्य पसरवले. मेडीयाने त्याच आधारे बातम्या करुन भारतीयांना मूर्ख बनवले.

तिसरा प्रश्न - आज दिवसभर ट्विटरवर सुमारे ३३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी ModiActNow हा हॅश टॅग टाॅपला ट्रेंड केला. याची बातमी कुठे आली का?

या देशातील प्रत्येक नागरीक अप्रत्यक्ष कर भरत असतो. प्रत्यक्ष कर भरणारे आज सुरक्षित आहेत ते सरकारमुळे नव्हे. तर या अप्रत्यक्ष कर भरणाऱ्यांची दानत म्हणून सुरक्षित आहे. पोट भरत नाही म्हणून कर भरणाऱ्यांच्या हातातील जर यांनी हिसकावून घ्यायचे ठरवले. तर कर भरतो म्हणून माज करेन म्हणणाऱ्यांच्या ढुंगणाला लंगोट सुद्धा उरणार नाही! (हा मुद्दा सोशल मेडीयावर विकृत संस्कार दाखवणाऱ्या भक्तभडव्यांसाठी आहे.)

चौथा प्रश्न - स्वतःला शिबी राजाचा वंशज म्हणवत पोस्ट लिहून विकृती पसरवणारा कोण आहे? तो शिबी राजाचा वंशज आहे की घटकंचुकी खेळणाऱ्या धाडसी आजीचं परतुंड-खापर परतुंड आहे याचे संशोधन झाले पाहिजे.

शेवटचे... यांच्या नीचपणामुळे १५००० विद्यार्थ्यांचा जीव पणाला लागलाय. आणि आज एक जीव गेलाय. असे असंख्य जीव आजवर यांनी घेतलेत आणि पचवलेत. सोनिया गांधींनी शेठला 'मौत का सौदागर' म्हटले होते. शेठ त्याची सिद्धता देत आहेत.

गेली साडेसात वर्षे आम्ही इथे निक्षून सांगतोय, हि आग एक ना एक दिवस तुमच्या दारात येणार आहे. आज हि आग १५००० कुटुंबाच्या दारात आलीय. वेळ अजून गेलेली नाही. सुधरा!!

Tags:    

Similar News