संविधानाचा फायदा टाटा, बिर्ला, अडानी आणि अंबानींनाच: डॉ. संजय सोनावणे

Update: 2021-04-13 15:10 GMT

'उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे'

वर्षानुवर्षाच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची आज जयंती. त्या निमित्ताने मॅक्समहाराष्ट्रने बाबासाहेबांच्या विचाराने आणि कतृत्वाने भारावून गुलामगिरीच्या बेड्या तोडून समाजात नावलौकिक कमावणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधला.


शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. या बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेल्या आंबेडकरी समाजातील डॅा. संजय राजाराम सोनावणे यांच्याशी आम्ही बातचीत केली.

संजय राजाराम सोनावणे हे रायगड येथील एस. आर. एस ग्रुपचे चेअरमन आहेत. त्यांनी सरकारी नोकरी सोडून बांधकाम क्षेत्रात उद्योजक म्हणून आपलं आणि आपल्या समाजाचं स्थान निर्माण करण्याचं ध्येय गाठलं. त्यांचा उद्योग क्षेत्रातील अनुभव सांगताना आंबेडकरी समाज उद्योग क्षेत्रात नेमकां कुठे आहे ? यावर भाष्य केलं आहे.

मागास समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेल्या घटनेचं आणि त्यांनी निर्मिती केलेल्या कायद्याचा लाभ मागास समाजापेक्षा सवर्ण समाजातील लोक घेताना पाहायला मिळतेय.

टाटा, बिर्ला,अडानी आणि अंबानी हे यशस्वी उद्योगपती का आणि कसे झाले? आंबेडकरी समाजातील उद्योजक आहेत त्यांनी कायद्याला अभिप्रेत आहे अशा प्रकारचे व्यवसाय करून स्वतःची प्रगती केली पाहिजे त्याचसोबत समाजाची, राज्याची, देशाची प्रगती केली पाहिजे.

सोनावणे आपल्या मुलाबद्दल सांगतात की, माझा मुलगा परदेशात शिकून आल्यानंतर भारतात खाद्य पदार्थाचा व्यवसाय सुरु करत आहे. त्याचबरोबर आम्ही माध्यमं आणि इतर अन्य व्यवसाय उभे करणार आहोत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला नसता तर आज आम्हाला जगण्याचा अधिकार मिळाला नसता, आम्ही कुठे असतो हा देखील संशोधनाचा विषय झाला असता. सोनावणे यांनी आंबेडकरी समाजातील तरुणाईला नोकऱ्यांमागे पळण्यापेक्षा छोट-मोठे व्यवसाय सुरु करावा. स्वतःची आणि समाजाची प्रगती करावी असे आवाहन त्यांनी केलं आहे.

Full View

Tags:    

Similar News