राजकारणातून निवृत्त होण्याचा मार्ग खडतर असतो का? , सुहास पळशीकर यांचे विश्लेषण
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हा राजीनामा मागे घेतला असला तरी राजकीय निवृत्तीचा मार्ग खडतर असतो का? भारत आणि अमेरिकेतील राजकीय निवृत्तील फरक काय आहे? राजकारणातून निवृत्त होण्यामागे काय अडचणी असतात? याविषयी जाणून घेण्यासाठी वाचा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांचे विश्लेषण....
Political Retirement : राजकारणामधून निवृत्त जर व्हायचं असेल, राजकारणातली पदं सोडायची असतील तर ते इतकं अवघड का जातं? म्हणजे एक तर लोक पद सोडत नाहीत. किंवा त्यांना कोणी पदं सोडू देत नाही, असं का होतं? आता हा प्रश्न मी म्हटलं तसं केवळ शरद पवार यांच्या पलीकडे जर तुम्हाला न्यायचं असेल तर काही उदाहरणं आपण बघूया. नेहमी असं म्हटलं जातं की राजकारणामध्ये सुद्धा निवृत्तीचं वय असायला पाहिजे. पण भरपूर वय झाल्यानंतर सुद्धा राजकारण करत राहणं आणि ते ही पदं सांभाळत राहणं हे काय नवीन नाही. जवळचं उदाहरण पाहायच्या आधी एक लांबचं उदाहरण पाहूया.
अमेरिकेचे आत्ताचे अध्यक्ष (Joe Biden) हे ऐंशीच्या घरातले आहेत. पुढच्या निवडणुकीला (American Election) उभं राहणार असं त्यांनी जाहीर सुद्धा केलेलं आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी जे असणार आहेत ट्रम्प (Donald Trump) त्यांनी पंच्याहत्तरी पार केलेली आहे. म्हणजे हा लढा जेव्हा होईल अमेरिकेमध्ये त्यावेळेला एक एक्याऐंशी ब्याऐंशी वर्षाचा नेता आणि दुसरा सत्याहत्तर वर्षाचा किंवा अठ्ठ्याहत्तर वर्षाचा नेता अशा दोघांमध्ये ती लढत होईल. हे जर लक्षात घेतलं तर मी काय म्हणतोय ते तुमच्या लक्षात येईल.
राजकारणामध्ये निवृत्तीचं वय सहसा नसतं. फार फार तर अमेरिकेत जसं आहे की अध्यक्ष (American President) दोनदा स्वतः येतं. अशा प्रकारच्या काही मर्यादा असतात. भारतात तर त्याही मर्यादा नाहीत. त्यामुळे भारतातली उदाहरणं तुम्हाला चकित करून सोडतील. अगदी अलीकडेच निधन पावलेले शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल (Prakash singh Badal) हे तब्बल त्यांच्या नव्वदीपर्यंत मुख्यमंत्री पदावर होते. तीच गोष्ट करुणानिधींची (Karunanidhi) द्रविड या पक्षाच्या नेत्यांची सांगता येईल. काहीजण ज्याच्यावर असं म्हणतात की हा सगळा कुटुंबाचा मामला असतो. आणि आपण त्याच्याबद्दल बोलूच नये. पण फक्त कुटुंबाचा हा मामला असतो असंही नाही.
उदाहरणार्थ मार्क्सवादी communist पक्षाचे नेते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू (Jyoti Basu) हे असेच जवळपास पंच्याऐंशीव्या वर्षापर्यंत म्हणजे ऐंशीच्या घरात गेल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री पदावर राहिले होते आणि शेवटी त्यांनी प्रकृती अस्वस्थ्यामुळे आपलं पद सोडलं. ते पक्षाचे असतील तेही असेच ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत वयाच्या काम करत होते. याचा अर्थ असा झाला की मूळ सूत्र हे आहे की राजकारणात तुम्ही एकदा पडलात की त्याच्यातून निवृत्त होणं हे फार अवघड जातं.
डोकं खाजवून त्याची उदाहरणं तुम्हाला कदाचित सापडतील. मला माहिती असलेलं एक छोटं उदाहरण जे आहे, ते महाराष्ट्रातल्या संगमनेरचे आमदार होते. बी. जे. खताळ (BJ Khatal patil) पाटील यांचं आहे. त्यांनी ऐंशीच्या निवडणुकीत असं जाहीर केलं. ऐंशी सालच्या ही माझी शेवटची निवडणूक आहे आणि नंतर ते निवडणुकीला तर उभे राहिले नाहीतच. पण सार्वजनिक जीवनातून बाहेर पडले आणि आपल्या घरी शांतपणे त्यांनी उरलेलं आयुष्य व्यतीत केलं. म्हणजे जवळपास वयाच्या पासष्ठीत त्यांनी ही निवृत्ती पत्करली आणि आत्ता परवा वयाच्या शंभरीमध्ये त्यांचं निधन झालं, असे नेते कार्यकर्ते, असे राजकारणी अगदी विरळ असतात.
शरद पवार यांच्या राजीनाम्याचा अर्थ काय? (Sharad pawar Resign)
इतर वेळेला आपल्याला जे दिसतं ते असं की, एखादी व्यक्ती राजकारणात पडली की ती सहसा राजकारणातून निवृत्त होत नाही. अगदी आत्ता शरद पवारांचं उदाहरण जरी आपण घेतलं तरी आपल्याला असं दिसेल की, त्यांनी असं सांगितलं होतं की, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देतोय. मी राजकारणातून निवृत्त होतोय, असं त्यांनी म्हटलेलं नव्हतं. ते होणार नव्हते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
देसाई ज्यावेळेला पंतप्रधान (Morajaji Desai) झाले. तेव्हा तेही ऐंशीला टेकले होते ज्यांचं वय ऐंशी पर्यंत पोहोचलेलं होतं. अर्थातच याच्यावर एक युक्तिवाद असा केला जातो की, या सगळ्यांच्या तब्बेती जर ठणठणीत असतील ते जर काम व्यवस्थित करू शकत असतील तर त्यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचं काय कारण आहे? त्यांच्याबद्दल आपल्याला तक्रार करण्याचं काय कारण आहे? याच्याउलट तक्रार करणाऱ्यांचे गमतीशीर म्हणणं असतं. ते असं असतं की जर अशा दिग्गजांनी वयस्कर नेत्यांनी पदं अडवून ठेवली तर नवीन लोकांना पदं मिळणार कशी?
मघाशी मी करुणानिधींचा उल्लेख केला. त्यांचंच उदाहरण पहा. करुणानिधींनी आपल्या हयातीतच आपले सुपुत्र MK Stalin हे आपले राजकीय वारसदार असतील हे ठरवून दिलं होतं. पण या स्टॅलिनला मुख्यमंत्री होण्यासाठी आपल्या वडिल मृत्यू होऊन नंतर निवडणूक जिंकायची वाट पाहावी लागली आणि मग ते शेवटी आत्ता ते आज आता सत्तरीचे आहेत. म्हणजे अडुसष्ठाव्या वर्षी अंतिमतः ते मुख्यमंत्री होऊ शकले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी अस्वस्थता आहे त्याच्यातलं एक कारणही हेच आहे. अजितदादा हे आता 'साठी' ओलांडलेले नेते आहेत. आणि तरीही अजून जोपर्यंत शरद पवार आहेत तोपर्यंत त्यांनाच ते म्हणतील त्याप्रमाणे राहावं लागतं वागावं लागतं. ही कदाचित त्यांची तक्रार असणार.
अर्थात अशा प्रकारच्या तक्रारी केव्हा होतील? ज्यावेळेला पक्ष हे एखाद्या कुटुंबाच्या आणि त्या कुटुंब प्रमुखाच्या हातात असतील तेव्हा ही उदाहरणं आपण घेतोय त्याच्यात पाहतो मी करुणानिधी यांच्या ताब्यात हा पक्ष कायम राहिला. जेव्हा फूट पडली आणि बाहेर पडले तेव्हापासून करुणानिधींचा पक्ष म्हणजे द्रमूक असं समीकरण तयार झालेलं होतं. अकाली दलामध्ये अनेक नेते होते. विशेषतः लुंबोवाल होते. पण तरीसुद्धा दीर्घकाळ बादल कुटुंबाचं वर्चस्व अकाली दलावरती राहिलं आणि त्यांच्या घरात त्या निमित्तानी वादळ वादंग सुद्धा झालं. सुखदेव बादल आणि मनप्रीत बादल यांच्यामध्ये झालेला वाद प्रसिद्ध आहे.
अगदी आत्ता सध्या लालू प्रसाद यांच्या दोघा भावांमध्ये याच्यावरून मतभेद आहेत. नेमकं त्यांची गादी आता कोण चालवणार? म्हणजे जोपर्यंत आपण राजकारणाला आणि राजकीय पदांना जुन्या राजेशाही पद्धतीने कुटुंबाची वारसदार असलेली माणसं शोधतो. तोपर्यंत हे प्रश्न तसेच राहतात. मग आता उलटा प्रश्न आपण विचारून बघुयात की, मग नेत्यांना राजकारणातून निवृत्त का होता येत नाही? त्याचंही कारण अनेक वेळेला कुटुंब हे असतं. करुणानिधी विकलांग झाले होते. Wheel chair वर होते. तरी ते निवृत्त झाले नाहीत. याचं एक कारण त्यांच्या कुटुंबामध्ये आहे. त्यांचं फार मोठं कुटुंब आहे. त्या कुटुंबामध्ये पक्ष आणि पद किंवा पक्ष आणि शासकीय पद यांचं नियंत्रण कोणाकडे असावं याच्यावरून भरपूर वादंग होतो. आणि ती व्यवस्था लावून देऊन सुद्धा आपण निवृत्त झाल्यावर हे सहजासहजी शक्य होईल असं त्यांना वाटत नव्हतं. म्हणजे कुटुंबामध्ये असलेले वाद आणि पक्षाचं जे काही नियंत्रण कुटुंबाकडे आहे ते नियंत्रण या दोन कारणांमुळे सहसा अनेक नेत्यांना राजकारणातून निवृत्त होता येत नाही.
अर्थात हे लक्षात ठेवलं पाहिजे की, ही सगळी चर्चा करताना आपण केवळ पदांची चर्चा करतोय असं नाही. यातली गंमत अशी आहे की, हा एकूणच सार्वजनिक जीवन आपल्याकडे ज्या पद्धतीने केलं जातं, चालवलं जातं. त्याच्या वैशिष्ट्याचा एक भाग आहे. हा एका जीवनशैलीचा भाग आहे. म्हणजे तुम्ही एकदा सार्वजनिक कार्यामध्ये पडलात, राजकारणात पडलात. की तुमचं जीवन सगळं बदलतं. तुम्हाला सत्तेसाठी किंवा सेवेसाठी सतत लोकांच्या संपर्कात राहावं लागतं. लोकांना तुम्ही हवे असतात आणि तुम्हालाही लोक हवे असतात. त्यामुळे तुम्ही सहजासहजी राजकारण सोडत नाही आणि लोकही सहजासहजी तुम्हाला राजकारण सोडू देत नाहीत, अशा पेचामध्ये लोक अडकून बसतात.
जोपर्यंत अशा नेत्यांना केवळ कुटुंबाचं वर्चस्व चालवायचं नसेल तोपर्यंत त्याच्याबद्दल तक्रार करायचा अर्थातच लोकशाहीमध्ये काही कारण नाही. जोपर्यंत त्यांची कार्यक्षमता शिल्लक आहे. पक्ष त्यांच्या पाठीमागे आहे, तोपर्यंत वय हा घटक राजकारणामध्ये बहुदा आपल्या देशात तरी कमी महत्वाचा राहणार. खरं आव्हान असतं ते म्हणजे सत्तरीनंतर पंच्याहत्तरीनंतर पन्नास पन्नास वर्ष राजकारण केल्यानंतर तुम्ही राजकारणात relevant कसं राहणार? हे relevant राहणं, राजकारणाशी स्वतःला बदलत्या काळात जोडून घेणं, हे ज्यांना जमतं, त्यांना वयावर मात करूनही राजकारणात राहू शकतात.