सेक्सचा आणि पावित्र्याचा संबंध काय?

“अरे तिच्या कसलं प्रेमात पडतो, तिचा आधी बॉयफ्रेंड होता, नक्कीच “वापरलं” असणारे तिला. तू पण वापर आणि सोडून दे, लग्न वगैरे तिच्याबरोबर!! खुळायस का?” या मानसिकतेवर प्रहार करणारा सई मनोज देशमाने यांचा लेख नक्की वाचा;

Update: 2021-07-06 06:19 GMT

सेक्स या क्रियेत स्त्री पुरूष दोघेही इनवॉल्व असतात. पण कितीही आणि कोणाबरोबरही, सेक्स केलं तरी पुरूष कधीच 'नासत' नाही. मात्र, आपल्या सो कॉल्ड आदर्श समाजाने स्त्रीच्या सेक्स लाईफवर मात्र, अनेक बंधने घातली आहेत.

स्त्रीने लग्नाआधी सेक्स केलं तर ती नासते, स्त्रीने लग्नानंतर नवऱ्याबरोबर सेक्स केलं आणि काही कारणाने नवरा बायको विभक्त झाले तरीही फक्त स्त्रीच नासते. नवरा आयुष्यभर बरोबर असेल तरच मग त्या स्त्रीने नवऱ्याबरोबर केलेलं सेक्स पवित्र का आणि ती स्त्रीही...!!

"अरे तिच्या कसलं प्रेमात पडतो, तिचा आधी बॉयफ्रेंड होता, नक्कीच "वापरलं" असणारे तिला. तू पण वापर आणि सोडून दे, लग्न वगैरे तिच्याबरोबर!! खुळायस का?" ही अशी आपल्या समाजाची मानसिकता आहे.

लग्नाआधी १० मुलींबरोबर संबंध असणाऱ्या मुलाला, बायकोच्या आयुष्यातला मी पहिलाच पुरूष असावा असं मनापासून वाटतं.

"माझ्या ना २-३ गर्लफ्रेंडस होत्या, तुझं काय?" असं बायकोला विचारल्यावर, "एक होता, आवडायचा मला" अशा बायकोच्या उत्तरावरही बायकोला मला परत तुझे तोंड नाही पहायचं? म्हणणारे महाभाग आहेत. बरोबर आहे, बायको यांना कोरीकरकरीतच हवी ना, स्वत:चा शिक्का उमटवायला.

लग्नानंतर पहिल्यांदाच संबंध ठेवताना बेडशीटवर लाल डाग नाही पडला तर तू अपवित्र, कुठे कुठे तोंड मारून आलीय म्हणणारे स्वत: मात्र मी पुरूष आहे. मला काहीही चालत या गर्वात वावरत असतात. पहिल्यांदा सेक्स करताना रक्त आलं तर मात्र ही मंडळी फार मोठा पराक्रम केल्याच्या अविर्भावात 'मीच तिच सील तोडलं ' असा मित्रांमध्ये दिंडोरा पिटतात. पण यांचं सील कधी आणि कुठे तुटलं, हे त्या बायकोने कसं चेक करायचं? पण काय गरजेचं नसते ना, पुरूषाला सगळं चालत हो किनी...

मुळात सेक्सचा आणि पावित्र्याचा काय संबंध येतो? हेच मला कळत नाही. सेक्स ही एक गरज आहे, जी स्त्री पुरूष दोघांनाही असते. वर आणि सेक्स म्हणजे चारित्र्य असा एक आपल्याकडचा समज.

स्त्रीचं चारित्र्य काचेसारखं असतं, एकदा तडा गेला की संपलं, असं आपल्या कडच्या बायकाचं मानत असतील, तर मग सगळच अवघडे किनी.. पुरूषाचं चारित्र्य मात्र, काहीही केलं तरी कशाचाही इफेक्ट न होणाऱ्या एखाद्या मजबूत धातूसारखं असाव बहुदा...

Tags:    

Similar News