रशिया युक्रेन युध्द आणि भविष्यातील परिणाम

रशिया युक्रेन युध्दाचा जगावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यातच IMF (नाणेनिधी) ने पुढील काळात काय परिणाम होऊ शकतात? याची यादी जाहीर केली आहे. याचे विश्लेषण केले आहे लेखक संजीव चांदोरकर यांनी...;

Update: 2022-05-09 07:05 GMT

रशिया-युक्रेन युद्ध काही दिवसात संपेल असे भाकीत युध्दाच्या सुरुवातीला केले जात होते. मात्र अडीच महिने उलटले तरी युध्द संपण्याची चिन्हं दिसत नाहीत.  युध्दामुळे होणारी जीवितहानी आणि विशेषतः युक्रेनच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम कमी गंभीर नाहीत. पण जगाच्या राजनैतिक आणि आर्थिक संरचनेवर होणारे दूरगामी परिणाम खूपच गंभीर असणार आहेत आयएमएफ (नाणेनिधी) ने नजीकच्या भविष्यकाळात काय होऊ शकते याची यादीच केली आहे

१. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पाश्चिमात्य राष्ट्रांचा एक गट आणि रशिया-चीनच्या नेतृत्वाखालील दुसरा गट तयार होणार आणि संपुर्ण जग दोन गटात विभागले जाऊ शकते

२. या प्रत्येक गटांतर्गत व्यापार, कच्चामाल सप्लाय चेन्स, पेमेंट प्रणाली, गुंतवणुक, वित्त व्यवहार समांतर पद्धतीने सुरु होऊ शकतात.

३. संरक्षण साहित्यावरचा जगातील खर्च खूप वाढू शकतो; त्याचा परिणाम लोककल्याणावर होऊ शकतो.

४. वातावरण बदलावर सर्व राष्ट्रांनी मिळून ज्या उपाययोजना करायच्या त्याला कायमची खीळ बसू शकते; कारण कोणतेही एक राष्ट्र सुटे हे कार्यक्रम राबवू शकत नाही.

५. अन्नधान्य आणि ऊर्जा यांचे जागतिक मार्केट कोलमडून गरीब / विकसनशील देशांमध्ये महागाई कायमची राहू शकते.

६. पोलादाशिवायचे विविध प्रकारचे धातू न मिळणे, ऊर्जा महाग यामुळे औद्योगिक उत्पादनाचे खर्च सर्वत्र वाढू शकतात.

७. तंत्रज्ञानाची देवाण घेवाण , शास्त्रीय ज्ञान त्या गटापुरते मर्यादित राहू शकते आणि त्यामुळे उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो

८. जगातील सतत वाढणाऱ्या कर्जबाजारीपणावर सामुदायिक तोडगा काढण्याची गरज आहे ; ते आता अशक्य होऊन गरीब राष्ट्रे कर्जाचे हप्ते थकवायला लागतील ; जगातील ६० % राष्ट्रे कर्ज कड्यावर उभी आहेत

९. जगाच्या विविध भागात राजनैतिक , लष्करी ताणतणाव वाढून दैनंदिन आयुष्य विस्कळीत होऊ शकते

१०. कमोडिटी मार्केट्स , वित्त क्षेत्रे , व्यापार , जीडीपी यात प्रचंड अस्थिरता येऊ शकते

दुसऱ्या शब्दात गेल्या ७० वर्षात प्रयासाने बसवलेली जागतिक घडी विस्कटवून जाऊ शकते

रशिया युक्रेन युध्दाचा जगावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यातच IMF (नाणेनिधी) ने पुढील काळात काय परिणाम होऊ शकतात? याची यादी जाहीर केली आहे. याचे विश्लेषण केले आहे लेखक संजीव चांदोरकर यांनी...

Tags:    

Similar News