#Ukrain_Russia युद्ध भूमीची भाषा
युक्रेन- रशिया युद्धामध्ये भारतीयांच्या दृष्टीने अडकलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. परंतु युक्रेनमधील निर्वासितांना या युद्धाच्या जीवन-मरणाच्या संकटात स्थानिक भाषे व्यतिरिक्त कोणती भाषा येत नसल्याने एक प्रकारची हतबलता आहे. युद्धात जागतिक भाषा आणि स्थानिक भाषा या दोन टोकांवर भाष्य केलं आहे युक्रेनमध्ये राहिलेले लेखक डॅनिअल मस्करणीस यांनी..
माझ्या ऑफिसमधील युक्रेन टीममधील काही सहकाऱ्यांना (अलेक्साण्डर, येवगेन, इलोना आदी) मी मेसेज पाठवला होता..त्यांचा काही दिवसापूर्वी रिप्लाय आलाय... बरेच जण सुरक्षित असले तरी सगळीकडेच अनिश्चिततेचे वातावरण आहे ..माझी आयटी कंपनी अमेरिकन... त्यामुळे कुठल्या देशात पर्मनंट आणि कुठल्या देशात कॉन्ट्रॅक्टर म्हणून कर्मचाऱ्यांची भरती करायची ह्याचा पक्का अभ्यास असलेली ...ह्या अमेरिकन कंपन्या परकीय देशात आपला पैसे गुंतवताना राजकीय परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करतात ... कधी काही झालं तर चटकन पाय काढता आला पाहिजे ह्या हिशोबाने सगळं केलेलं .... त्यामुळे कंपनीने युक्रेनमधील सर्व कर्मचारी हे एका थर्ड पार्टीतर्फे कॉन्ट्रॅक्टर म्हणून नियुक्त केलेले होते.. सुदैवाने कंपनीने अजून आपले हात झटकलेले नाहीत ..
सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या कामात कंपनी लक्ष ठेवून आहे... आमचे बरेच सहकारी युक्रेनच्या 'कीव्ह'मधून बाहेर पडून युक्रेनच्या पश्चिमेला आलेले आहेत .. विविध relief स्वयंसेवी संस्थांसोबत कंपनीने टाय-अप केलंय.... सर्व कर्मचाऱ्यांनाही ह्या संस्थांसोबत जोडून घेण्याचं आवाहन केलं जातंय .. पैसे donate करणे , आपल्या आयटी स्किल्सचे योगदान देणे ह्याबरोबरच ह्या विविध स्वयंसेवी संस्थांना प्रामुख्याने हवे आहेत ते युक्रेन येथील व बॉर्डर परिसरातील 'Ukrainian, Russian, Belarusian, Bulgarian, Greek, Romanian, & Polish' ह्या भाषा जाणणारे ट्रान्सलेटर्स .. मोठ्या संख्येने निर्वासित झालेल्या युक्रेन नागरिकांशी व शेजारील राष्ट्रांमध्ये त्यांना सामावू इच्छिणाऱ्या नागरिकांशी बोलण्यास विविध स्वयंसेवी संस्थांना भाषेच्या बऱ्याच अडचणी येत आहेत ..भाषा म्हणजे समाजाचा एक अदृश्य 'glue' असतो .. जेव्हा असे humanitarian crisis उद्भवते तेव्हा राहतं घर, समाज सोडून जेथे मिळेल तेथे विविध भाषिकांसोबत रेफ्युजी म्हणून राहावं लागतं .. अर्थात हा प्रश्न नवीन नाहीय .. जगभरातील अशा रेफ्यूजीना त्यांच्या मूळ भाषेतून मदत करण्यासाठी 'Tarjimly' हे मोबाईल अँप आहे..ज्यांना ज्यांना अशा भाषा येतात ते लॉगिन करून अशा निर्वासितांना स्वयंसेवक म्हणून मदत करू शकतात...
एका बाजूला स्थानिक भाषेव्यतिरिक्त कोणतीच जागतिक भाषा येत नसल्याने ह्या युक्रेनियन रेफ्यूजीत आलेली एक प्रकारची हतबलता पाहावयास मिळत आहे ... तर दुसरीकडे युक्रेनमध्ये अडकलेले (व इंग्रजी ही जागतिक भाषा येणारे) भारतीय विद्यार्थी आपापल्या स्थानिक पंजाबी, मल्याळी, मराठी भाषेत व्हाट्सअँप व्हिडिओ मार्फत भावनिक साद घालत असल्याचे आपण आहोत ..युद्धासारख्या जीवनमरणाच्या प्रसंगी, भाषेची (जागतिक भाषा आणि स्थानिक भाषा) ही दोन्ही टोके अभ्यासण्यासारखी आहेत ..
- डॅनिअल मस्करणीस