राकेश झुनझुनवाला कोणासाठी संपत्ती निर्माण करत होते? संजीव चांदोरकर

स्वतःसाठी कोणी व्यक्ती संपत्ती निर्माण करत असेल तर आमचे काही म्हणणे नाही; पण आम्ही देशासाठी संपत्ती निर्माण करतो असा कोणाचा दावा असेल तर देशाची संपत्ती म्हणजे नक्की काय आणि ती संपत्ती निर्माण करणारे नक्की कोण? बिगबुल राकेश झुनझुनाला यांच्या निधनानंतर वित्तभांडवलाच्या तत्वज्ञानाची चिरफाड व्हायला हवी असं सांगताहेत संजीव चांदोरकर....;

Update: 2022-09-06 07:59 GMT

 स्वतःसाठी कोणी व्यक्ती संपत्ती निर्माण करत असेल तर आमचे काही म्हणणे नाही; पण आम्ही देशासाठी संपत्ती निर्माण करतो असा कोणाचा दावा असेल तर देशाची संपत्ती म्हणजे नक्की काय आणि ती संपत्ती निर्माण करणारे नक्की कोण? बिगबुल राकेश झुनझुनाला यांच्या निधनानंतर वित्तभांडवलाच्या तत्वज्ञानाची चिरफाड व्हायला हवी असं सांगताहेत संजीव चांदोरकर....

काही दिवसांपूर्वी शेअर मार्केटवरील "बिग बुल" राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले ; त्यांना श्रद्धांजली

त्यांच्या निधनानंतर काही दिवस गेल्यानंतर झुनझुनवाला वित्त भांडवलाच्या ज्या तत्वज्ञानाचे प्रतिनिधी होते त्याची चिरफाड करण्याची गरज आहे.

शेअर्मार्केटवरील सट्टेबाज गुंतवणूकदार , कंपन्यांचे प्रवर्तक स्वतःला " संपत्ती निर्माणकर्ते (wealth creators) म्हणवतात"

स्वतःसाठी कोणी व्यक्ती संपत्ती निर्माण करत असेल तर आमचे काही म्हणणे नाही; पण आम्ही देशासाठी संपत्ती निर्माण करतो असा कोणाचा दावा असेल तर देशाची संपत्ती म्हणजे नक्की काय आणि ती संपत्ती निर्माण करणारे नक्की कोणकोण यावर चर्चा व्हावयास हवी

______

एखाद्या कंपनीचे "मार्केट कॅपिटलायझेशन" गतवर्षी १ लाख कोटी रुपये असेल आणि त्याचे भाव वाढल्यामुळे एका वर्षानंतर मार्केट कॅपिटलायझेशन २ लाख कोटी झाले तर त्या कंपनीने (देशासाठी) १ लाख कोटी रुपयांची संपत्ती निर्माण केली असे म्हटले जाते

खरेतर तर संपत्तीतील हि वाढ फक्त इक्विटी शेअर्समधील गुंतवणूकदारांसाठी असते ; पण अल्पसंख्य इक्विटी गुंतवणूकदार स्वतःला संपूर्ण भारतीय नागरिकांचे प्रतिनिधी मानतात आणि शेअरमार्केट म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रतिबिंब ! असो

______

आम्ही संपत्ती निर्माणाच्या विरोधी नाही; पण मग संपत्ती म्हणजे काय ? आणि ती निर्माण करणारे कोण यावर होऊन जाऊ देत चर्चा:

देशाची संपत्ती म्हणजे काय ?

संपत्तीची व्याख्या देशाच्या स्टॉक मार्केट मधील मार्केट कपिटलायझेशन पर्यंत सीमित आहे का ?

देशात आरोग्यदायी जीवन जगणारे स्त्री पुरुष, सुदृढ बालके, रसरसलेले, अगणित क्षेत्रात आव्हाने घेण्यासाठी मुसमुसललेले तरुण तरुणी हि देशाची संपत्ती नाही ? पुढच्या पिढयांना उपभोगासाठी अधिक समृद्ध करून दिलेली नैसर्गिक साधनसामुग्री देशाची संपत्ती नाही ?

_______

चला चर्चेसाठी अर्थव्यवस्थेपुरती आपली चर्चा मर्यादित करूया; पण मग

देशाच्या अर्थव्यवस्थेच्या जवळपास ५० टक्के जीडीपी निर्माण करणाऱ्या छोट्या (एमएसएमई) उद्योग जे निर्माण करतात ती संपत्ती नाही काय ?

आणि कोट्यवधी शेतकरी ? आपल्या तुटपुंज्या साधन सामुग्रीने जे काही तयार करू पाहतात त्यांना त्या पॆक्षा जास्त संपत्ती तयार करावीशी वाटत नाही ?

आणि संपत्ती तयार करण्याची मनीषा उरी बाळगणारे, त्यासाठी विविध गोष्टी शिकावयास तयार असणारे, दिवसाचे बारा तास राबण्याची तयारी असलेले कोट्यवधी तरुण, कष्टकरी बायका त्याचे काय ?

संपत्ती निर्माण करण्यास मानवी श्रमाची उत्पादकता वाढवावी लागते. त्याचा संबंध शिक्षण , आरोग्य यांच्याशी आहे, पायाभूत सुविधांच्या व भांडवलाच्या उपलब्धतेशी आहे ; ते काय प्रत्येक नागरिकाने स्वतःचे स्वतः तयार करायचे असते ? मग शासनाचा नक्की रोल काय ?

दुर्दैव हे आहे कि शासनामागून शासन कोट्यवधी सामान्य नागरिकांना देशाच्या संपत्ती निर्माणात सामीलच करून घेत नाहीये आणि सारी नजर त्या मूठभर कॉर्पोरेट्सकडे लावून बसत आहेत

खरेतर संपत्ती निर्माणाचा पाया जेव्हढा व्यापक असतो त्याप्रमाणात सामान्य नागरिकांच्या क्रयशक्तीचा पाया देखील व्यापक बनतो आणि त्याप्रमाणात देशांतर्गत बाजारपेठ

"संकुचित, अप्पलपोटी" कॉर्पोरेट क्षेत्राला या गोष्टी परस्परावलंबी आहेत हे कळून घ्यायचे नाहीये ; पण आमचे "मायबाप" सरकार पण संपत्ती व संपत्ती निर्माणकर्त्यांची व्याख्या व्यापक करीत नाही हे दुर्दैव आहे

संजीव चांदोरकर (१ सप्टेंबर २०२२)

Tags:    

Similar News