Indira gandhi : जितेंद्र आव्हाड यांनी जागवल्या इंदिरा गांधींच्या आठवणी

इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त जितेंद्र आव्हाड यांनी प्रियंका गांधी यांच्या अटकेवेळी व्यक्त केलेल्या भावना इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त पुन्हा प्रसिध्द करण्यात येत आहे.

Update: 2022-10-31 04:45 GMT

1977 साली पाटणा पासून काही अंतरावर असलेल्या बेलछी गावामध्ये 14 दलितांची अमानूषपणे हत्या करण्यात आली. ह्याचे राजकीय महत्व ओळखून इंदिरा गांधींनी बेलछीला जायचे ठरवले. त्या ट्रेनने पाटणाला पोहचल्या. व तिथून एका जीपमध्ये बसल्या. सोबत 100 ते 200 माणसे होती. पुढे गेल्या तर त्यांची जीप चिखलात रुतली. पुढचा मार्ग काढण्यासाठी म्हणून ट्रॅक्टर आणण्यात आला. परंतु रस्त्यावर असलेला प्रचंड चिखल आणि त्यामुळे रस्त्याची झालेली दुर्दशा यामुळे ट्रॅक्टरही पुढे जाईनासा झाला. तेवढ्यात त्यांच्यासोबत असलेल्या त्या गावातील एका कार्यकर्त्याने सांगितले, कि गावामध्ये एक हत्ती आहे. त्या हत्तीचे नाव मोती. आणि त्या हत्तीवर बसून आपण हा परीसर पार करु शकतो.

इंदिरा गांधींनी पुढे त्याला होकार दिला. तिथे उपस्थित असलेल्या काही नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला. की, तुम्ही जाणार कश्या, हत्तीवर बसणार कश्या. त्यांनी उत्तर दिले

.

'बहोत दिनों के बाद हाथी कि सवारी करने मिलने वाली है'

हत्तीला आणण्यात आले. इंदिरा गांधी हत्तीवर बसल्या. हत्ती कसा चालतो हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे बसलेल्या माणसाला तोल सांभाळणे खूप कठिण असत. त्या मार्गावर प्रचंड वादळी वारा सुटला होता. हत्तीला नदी पार करुन पुढे जायचे होते. कोणिही हिम्मत दाखवली नसती. पण, आता मागे हटायचे नाही ह्या ईर्षेने पेटलेल्या इंदिराजींनी प्रवास तसाच चालू ठेवला. साडेतीन तास हत्तीवर बसून प्रवास करत त्या बेलछीला पोहचल्या. आणि इतिहासाची पाने पलटली.

इंदिरा गांधी जेव्हा बेलछीला पोहचल्या, तेव्हा आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येक गावातील दलित त्यांच्या स्वागतासाठी उभा होता. तिथल्या दलितांना वाटले की, कोणीतरी देवदूतच आला आहे आपल्याला भेटायला. आणि तिथूनच इंदिरा गांधींचा पुर्नजन्म झाला. तो एवढ्या लवकर होईल असे कोणाला अपेक्षितही नव्हतं. कारण 1977 च्या निवडणूकीत त्यांची पूर्णपणे धूळधाण झाली होती. परंतु राजकारण कधी काय वळण घेईल हे कोणालाच माहित नसतं.

इतिहासाची पुर्नवृत्ती होते असं म्हणतात. इंदिरा गांधींनाही असंच... शहा कमिशन, वेगवेगळ्या ठिकाणी जेलमध्ये अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण, ह्या सगळ्यातून त्या धिरदोक्तपणाने बाहेर पडल्या. अन् अखेरीस 1980 साली जनता पक्षाची धूळधाण झाली आणि इंदिरा गांधी सत्तेत आल्या.

Tags:    

Similar News