पंतप्रधान मोदी यांनी राजीनामा द्यावा, निखिल वागळे यांची मागणी

Nikhil Wagle on Satyapal Malik : सत्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे देशात वादळ उठलं आहे. त्यातच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी केली आहे.;

Update: 2023-04-17 06:58 GMT

Nikhil Wagle : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी द वायरच्या (The wire) करण थापर यांना मुलाखत दिली. या मुलाखतीनंतर देशात पुलवामा प्रकरणावरून देशात वादळ उठलं आहे. तर या वादळाचे केंद्रबिंदू पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आहेत. यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. एवढंच नाही तर नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निखिल वागळे यांनी केली आहे. (Nikhil Wagle demand PM Narendra Modi Resign)

2019 मध्ये पुलवामानंतर (Pulwama Attack) मी आणि काही एक्स्पर्टने शंका उपस्थित केल्या होत्या. त्या शंका बरोबर असल्याचं पहायला मिळत आहे. आतापर्यंत फक्त एक्स्पर्ट शंका उपस्थित करीत होते. मात्र आता थेट जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) राज्याचे राज्यपालच शंका उपस्थित करायला लागले आहेत. सत्यपाल मलिक हे घटनात्मक पदावर होते आणि घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने शंका उपस्थित केल्याने त्याला विशेष महत्व आहे. हे जर इतर देशात झालं असतं तर मोठा गदारोळ झाला असता आणि पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीला राजीनामा द्यावा लागला असता. पण पंतप्रधान मोदी हे बेदरकार आहेत. त्यामुळै नैतिक जबाबदारी निश्चित करायची असेल तर ती पंतप्रधान मोदी आणि तत्कालिन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांची आहे. यामध्ये पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांच्या निष्काळजीपणामुळे देशाचे 42 जवान शहीद झाले आहेत. आपल्याकडे मीडिया सरकारला शरण गेल्यामुळे अशा पंतप्रधान यांची कोंडी करणार नाहीत. पण जे स्वतंत्र माध्यमं आहेत. ते मात्र सरकारला प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे माझ्या मते या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यायला हवा, असं मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी व्यक्त केले आहे.

Full View

Tags:    

Similar News