भारतीय TV अँकर्सने दहशतवाद्यांची मदत केली- निखील वागळे
14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा चार वर्षानंतरही ताज्या आहेत. या हल्ल्यामुळे आजही संपूर्ण देश हळहळतो आहे. या हल्ल्यात 42 जवान शहीद झाले होते. मात्र या हल्ल्यासाठी जबाबदार कोण? याविषयी ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांचे विश्लेषण मॅक्स महाराष्ट्रवर पुन्हा प्रसिध्द करीत आहोत.;
14 फेब्रुवारी 2019 हा भारतीय इतिहासातील काळा दिवस (Black Day). या दिवशी पुलवामा (Pulwama Attack) येथे झालेल्या हल्ल्यात 42 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला जबाबदार कोण? याविषयी ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे (Nilkhil Wagle) यांनी विश्लेषण केले आहे.
निखील वागळे म्हणाले की, 1971 मध्ये भारताने पाकिस्तानचे तुकडे केले होते. त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान (pakistan) भारतात दहशतवादी हल्ले करतो आहे. त्यामुळे पाकिस्तानचा उद्देश भारतात फूट पाडणे हेच आहे. मात्र भारतीय मीडियाने (Indian Media cover pulwama Attack) पुलवामा हल्ल्यानंतर केलेल्या वार्तांकनावरून पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना भारतीय TV Anchor ने मदत केल्याचे स्पष्ट होत आहे. पाकिस्तानचा जो उद्देश आहे. त्या उद्देशानुसार भारतीय मीडियाने वार्तांकन केल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी लगावला.
भारतीय मीडियाने पुलवामा हल्ल्यानंतर देशातील वातावरण खराब करण्याचे काम केल्याचे एवढंच नव्हे तर या घटनेचे संधी असल्यासारखं वार्तांकन भारतीय मीडियाने केले. त्यामुळे भारतीय मीडियाने शहीद जवानांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम केल्याची टीका निखील वागळे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना केली.