'एक जीव वाचवल्याचं समाधान' पत्रकार विलास बडे यांनी सांगितली घटना

लोकलमधील गर्दीमुळे अनेक जणांचे अपघात होतात. यामध्ये काही जणांना रेल्वे पोलिसांकडून तर कधी सतर्क प्रवाशांकडून वाचवलं जातं. त्याच प्रकारे आपल्या सतर्कतेमुळे पत्रकार विलास बडे यांनी वृध्द महिलेचा जीव वाचला. हा प्रसंग विलास बडे यांनी शब्दबध्द केला आहे.;

Update: 2023-01-22 02:20 GMT

न्यूज 18 लोकमतचे (News18 Lokmat) वृत्त निवेदक विलास बडे यांच्या सतर्कतेमुळे एका वृध्देचा जीव वाचला. हा प्रसंग काही क्षणात घडला. मात्र त्यातून मोठं समाधान मिळाल्याचे विलास बडे यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.

ऑफिसला लवकर पोहोचायचं होतं. घाईघाईत ११ वा. खारघर (Kharghar) स्टेशनला पोहोचलो. स्टेशनवर ठाण्याला जाणारी लोकल (Thane Local Train) आली. थोडा हिरमोड झाला, कारण मला CST पकडायची होती. प्लॅटफॉर्मवरून ठाणे लोकल निघाली, तेवढ्यात लोकांच्या ओरडण्याचा आवाज आला. समोर एक ६५-७० वर्षांची आज्जी लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकून घासत जात होती. तिचा एक पाय लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकला होता आणि एक पाय लोकलमध्ये होता. लोकल वेगाने पुढे जात होती. क्षणभर काहीच सुचलं नाही, धावत जावून पूर्ण ताकदीने आज्जीला खेचलं.

सुदैवाने आज्जीने हॅंडलचा हात सोडला त्यानंतर दोघेही प्लॅटफॉर्मवर कोसळलो. जेमतेम पाच सेकंदात हे सगळं घडलं. घडलेल्या प्रसंगाने आज्जी प्रचंड भेदरली होती. तिला घट्ट मिठी मारली. आम्ही सगळ्यांनी तिला धीर दिला. तोपर्यंत मोठी गर्दी जमली. आज्जी स्थिर स्थावर झाल्यावर पुढच्या प्रवासाला निघालो काही सेकंदात एक जीव वाचवल्याचं समाधान घेवून.

Tags:    

Similar News