महाराष्ट्र आणि कामगार दिनानिमित्त कोविडनंतरचा महाराष्ट्र कसा असेल ? राज्यातल्या उद्योग क्षेत्रावर नेमका काय परिणाम झाला आहे. करोना महामारीमुळे बांधकाम व्यवसायात कोण-कोणते बदल झाले ? येणाऱ्या काळात महाराष्ट्राची उद्योग क्षेत्रातली वाटचाल नेमकी कशी असेल? बांधकाम व्यवसायात कामगार वर्गाची महत्त्वाची भूमिका आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे अनेक कामगार रोजगारापासून वंचित आहेत अनेकांनी गावची वाट देखील धरली आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत तुम्ही कामगारांकडे कसं पाहता? असंघटित कामगारांच्या विकासाचं मॉडेल अद्याप तयार करण्यात आलं नाही. अशा अनेक प्रश्नांवर आपलं व्हिझन सांगतायेत नवी मुंबईतल्या हावरे इंजीनिअर्स अँड बिल्डर्स प्राव्हेट लिमिटेडच्या अध्यक्षा आणि बांधकाम व्यवसायातील यशस्वी उद्योजिका उज्ज्वला हावरे...