डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु महात्मा फुले..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले तिसरे गुरु मानले कारण शूद्र-आतिशूद्र, महिला आणि शेतकरी यांच्यासाठी आयुष्यभर संघर्ष करुन महात्मा फुले यांनी सामाजिक लोकशाहीचे स्वप्न पाहिले संविधानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरवले याबाबतचा अभ्यासक विकास मेश्राम यांना पुनःप्रकाशित लेख...;
आधुनिक भारतीय इतिहासात शूद्र-आतिशूद्र, महिला आणि शेतकरी यांच्या स्वातंत्र्यलढ्याचे पहिले नायक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध , कबीर यांच्यासमवेत ज्योतिबा फुले यांना आपला तिसरा गुरु मानले आहेत.
'शूद्र पुर्वी कोण होते?' हे पुस्तक महात्मा फुले यांना समर्पित करताना बाबासाहेबांनी लिहिले की, हिंदू धर्मातील उच्च जातीचे लोक निम्न जातीच्या लोकांशी 'गुलाम म्हणून बघतात तेव्हा त्या लोकांना तुम्ही गुलाम नाही म्हणून महात्मा फुले त्यांना जाणिव निर्माण करतात हे कार्य देशाला स्वातंत्र्य मिळण्यापेक्षा खूप महत्त्वाचे आहे आणी म्हणुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांना ते ग्रंथ अर्पण केले. महात्मा फुले यांनी 'जाती विवेकाचा निर्णय' या ग्रंथात (1865) मध्ये लिहिले आहे की धर्मग्रंथात वर्णन केलेले विकृत जाती-भेदभाव शतकानुशतके हिंदूंचे मन गुलाम करीत आहे. त्यांना या पळवाटातून मुक्त करण्याशिवाय यापेक्षाही महत्त्वाचे काहीही असू शकत नाही. बाबासाहेबांनी आपल्या प्रसिद्ध ग्रंथात 'डिस्ट्रक्शन टू कॅस्ट सिस्टम' म्हणजेच 'अॅनिहिलेशन ऑफ कास्ट' मध्ये, त्याच तत्त्वाचे अनुसरण करून जातीव्यवस्थेचे स्रोत असणारे मनुस्मृती शास्त्र नष्ट करण्याचे आवाहन केले आहे.
जोतीराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी महाराष्ट्रातील शूद्र वर्णातील माळी जातीमध्ये झाला. माळी जातीमुळे फुले हा शब्द त्यांच्या नावावर आला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. फुले एक वर्षाची असताना त्यांची आई चिमणाबाई यांचे निधन झाले. तेव्हा गोविंदराव यांची बहीण जोतीबा फुले यांची आत्या सगुनाबाई यांनी त्यांना मोठे केले. सगुणाबाईंनी ही आधुनिक विचारांच्या होत्या त्यांनी तेच संस्कार जोतिराव फुले यांच्यावर केले.
सन 1818 मध्ये भीमा कोरेगाव युद्धानंतर ब्रिटिशांनी पेशव्याच्या राजवटीचा अंत केला असला तरी त्यांच्या जातीवादी विचारसरणीने लोकांच्या सामाजिक जीवनावर खुप पगडा होता . पुण्यात शूद्र-आतिशूद्रस आणि महिलांसाठी शिक्षणाची दारे बंद होती. सर्व प्रथम, ख्रिश्चन मिशनरी यांनी शूद्र-अति-शूद्र आणि स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडली.
वयाच्या सातव्या वर्षी जोतिराव यांना शिक्षणासाठी शाळेत पाठवले गेले, परंतु लवकरच जोतिराव यांचे वडील गोविंदराव यांनी सामाजिक दबावातून त्यांना शाळेतून काढून आपल्या सोबत शेतात काम करण्यास सुरवात केली. पण जोतिराव यांची उत्सुकता आणी प्रतिभा पाहून उर्दू-पर्शियन विद्वान गफर बेग आणि ख्रिश्चन लेखक लिजित साहेब प्रभावित झाले. त्यांनी गोविंदरावांना जोतिराव यांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत पाठवावे अशी विनंती केली आणि जोतिराव पुन्हा शाळेत जाऊ लागले.दरम्यान, वयाच्या 13 व्या वर्षी जोतिराव यांचे 9 वर्षांच्या सावित्रीबाई फुले यांच्याशी 1840 मध्ये लग्न झाले. 1847 मध्ये, जोतिराव यांनी स्कॉटिश मिशनच्या इंग्रजी शाळेत शिक्षण सुरू केले. येथेच विद्यार्थी जोतिराव यांची आधुनिक ज्ञान विज्ञानाची ओळख झाली.
स्कॉटिश मिशन स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर समानता आणि स्वातंत्र्याचा विचार जोतिराव फुले यांना परिचय झाला आणि . त्यांच्यासमोर एक नवीन विश्व उघडले. तर्क हे त्याचे सर्वात मोठे शस्त्र बनले. त्यांनी तर्क आणि न्यायाच्या जोरावर प्रत्येक गोष्टीची चाचपणी सुरू केली. तो आजूबाजूच्या समाजाकडे नव्या दृष्टीकोनातून पाहू लागले . यावेळी वैयक्तिक आयुष्यात त्यांना जातीचा जाचाचा अपमान सहन करावा लागला. या घटनेमुळे वर्ण-वर्णव्यवस्था आणि ब्राह्मणवाद या किती भयानक भेसूर आहे यांची जाणीव त्यांना झाली.
1847 मध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. ज्योतिबा फुले यांना हे माहित होते की शिक्षण हे अज्ञान दूर करण्याचे शस्त्र आहे ज्यावरून शूद्र-आतिशुद्र आणि स्त्रिया मुक्त होऊ शकतात. त्यांनी त्यांच्या एका कवितांमध्ये लिहिले आहे - विद्या विना मती गेली
मती विना नीती गेली
नीती विना गती
गती विना वित्त गेले
एवढे अनर्थ एका
अविद्या ने केले
अविघा ने काय केले हे जोतीबांनी आपल्या कवितेमधून शुद्रांना सांगितले.. सर्वप्रथम त्यानीं आपल्या घरात शिक्षणाची ज्योत पेटविली. पत्नी सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण शिकवून त्यांना ज्ञान विज्ञानाने सुसज्ज केले. त्यांनी सावित्रीबाई च्या विचार कक्षा रुंदावत व्यापक भावना भरली की पुरुष आणि स्त्रिया दोघेही समान आहेत. जगातील प्रत्येक माणूस स्वातंत्र्य आणि समानतेसाठी पात्र आहे. ज्योतिबा यांनी सावित्रीबाई फुले, सगुणाबाई, फातिमा शेख आणि इतर आपल्या सहकारी सोबत हजारो वर्षांपासून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या ना शिक्षणाचा मार्ग दाखवुन त्यांना मानवी हक्कांची जाणीव करुन दिली.
या कल्पनांना प्रत्यक्षात आणत फुले दाम्पत्याने 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा उघडली. ही शाळा महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतात मुलींसाठी सुरु केलेली पहिली शाळा होती. जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ही शाळा उघडत पाखंडी लोकांना आणी विषमता पेरणाऱ्या धर्मग्रंथांना उघडपणे आव्हान दिले.
शूद्र-अति-शूद्रांना आणि स्त्रियांना शिक्षणाने अन्याय आणि अत्याचारांवर आधारित सामाजिक व्यवस्थेला नष्ट करणे हे फुले यांचे उदीष्टे होते.1873 मध्ये त्यांच्या 'गुलामगिरी' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी हे पुस्तक लिहिण्याचा हेतू या शब्दात व्यक्त केला - शेकडो वर्षांपासून शूद्र, अतिशुद्र लोक ब्राह्मणांच्या राजवटीत त्रस्त आहेत. या अन्यायकारक लोकांची सुटका कशी करावी हे सांगणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. '
जोतीबा फुले हे जसे शूद्र आणि आतिशूद्रांच्या मुक्तिसाठी प्रयत्न करीत होते, तसेच ते महिला स्त्री मुक्तीसाठी प्रयत्नशील होते. त्यांनी स्त्रियांबद्दल लिहिले आहे की 'स्त्रिया-शिक्षणाची दारे पुरुषांनी बंद केली होती. जेणेकरुन त्याला मानवी हक्क कळत नसावेत. 'महिला मुक्तीसाठी असा कोणताही लढा नाही, जो ज्योतिबा फुले यांनी आपल्या काळात लढा दिला . ज्योतिबा फुले व सावित्रीबाई यांनी आपल्या कुटूंबाला स्त्री पुरुष समानतेचे मूर्त रूप बनवून समाज आणि राष्ट्रातील समानतेच्या संघर्ष करित राहिले.
फुले यांनी एकत्रितपणे समाजसेवा सामाजिक संघर्षाचा मार्ग निवडला. सर्व प्रथम, त्याने हजारो वर्षांपासून वंचित लोकांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले. विधवांसाठी आश्रम बांधून त्या विधवेने पुनर्विवाहासाठी प्रोत्साहित केले आणि अस्पृश्यांसाठी स्वतःची घरचा पाण्याचा हौद दलित पीडित लोकांसाठी खुला केला . हे सर्व करतांना त्यांना हे चांगलेच समजले होते की ब्राह्मणवाद नष्ट केल्याशिवाय अन्याय, विषमता आणि गुलामी संपणार नाहीत. यासाठी त्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली. पौराणिक मान्यतांचा विरोध करणे, शूद्र आणि अतिशुद्रांना वर्णद्वेषांच्या जाळ्यातून मुक्त करणे, पुराणांद्वारे पोषित केलेली जन्मजात गुलामीतून मुक्तता करणे हे सत्यशोधक समाजाचे उद्दीष्ट होते. त्यातून फुले यांनी ब्राह्मणवादाविरूद्ध सांस्कृतिक क्रांती सुरू केली. 1890 मध्ये जोतीराव फुले यांच्या निधनानंतर, सावित्रीबाई फुले यांनी सत्यशोधक समाजाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारली.
शूद्र, आतिशूद्र आणि स्त्रिया व्यतिरिक्त जोतीराव फुले ज्या समाजासाठी सर्वात जास्त संघर्ष केला तो हा समाज शेतकर्यांचा होता. 1883 मध्ये लिहीलेल्या "शेतकर्यांचा आसूड " या ग्रंथात त्यांनी शेतकर्यांची दयनीय अवस्था जगासमोर आणली. ते म्हणाले की, धर्माच्या नावाखाली भट्ट-ब्राह्मणांचा वर्ग, कारभाराच्या नावाखाली वेगवेगळ्या पदे भूषविणा अधिकारी यांचा वर्ग आणि सेठ-सावकारांचा वर्ग यानी शेतकर्यांला लुटले असून शेतकरी असहाय्य सर्व काही सहन करत आहे आणि आजही त्यांनी मांडलेल्या विचारांची सत्यता दीसून येत आहे. . हे पुस्तक लिहिण्यामागील हेतू वर्णन करताना ते लिहितात की 'सध्या धर्म आणि राज्याशी संबंधित अनेक कारणांमुळे शूद्र-शेतकरी अत्यंत भयावह स्थितीत पोहोचले आहेत. या परिस्थितीच्या काही कारणांवर चर्चा करण्यासाठी हे पुस्तक तयार केले गेले आहे. "जोतिराव फुले एक विचारवंत, लेखक आणि अन्यायाविरूद्ध सतत लढणारे योद्धा होते. ते दलित-बहुजन, महिला आणि गरीब लोकांच्या नवजागाराचे नेते होते. शोषण-अत्याचार आणि अन्याय यावर आधारित ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या सत्यतेचा पर्दाफाश आणि आव्हान करण्यासाठी त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. ज्यामध्ये प्रमुख रचना खालीलप्रमाणे आहेतः
1) तृतीय रत्न (नाटक,1885 ),
2)- छत्रपती राजा शिवाजीचा पोवाडा (1869)
,3) - ब्राह्मण चातुर्य (1869),
4 )- गुलामगिरी (1873 ),
5) - शेतकऱ्याचा आसूड (1883),
6) - सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक (1889), असे अनेक ग्रंथ लिहिले.
1890 मध्ये ज्योतिबा फुले आम्हाला सोडुन गेले असले तरी सावित्रीबाई फुले यांच्यासह ज्योतिबा फुले यांनी शूद्र-आतिशूद्र आणि महिलांच्या शोषणाविरूद्ध मशाल पेटविली, नंतर ती मशाल सावित्रीबाई फुले यांनी पेटविली. सावित्रीबाई फुले यांच्यानंतर शाहूजी महाराजांनी ही मशाल आपल्या हातात घेतली. नंतर त्यांनी ही मशाल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हाती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मशालला सामाजिक परिवर्तनाच्या ज्वालामध्ये रुपांतर केले.
विकास परसराम मेश्राम
मु+पो,झरपडा
ता अर्जुनी मोरगाव
जिल्हा गोदिया
मोबाईल 7875592800
vikasmeshram04@gmail.com