पहिलं लग्न झालं पण नवऱ्याचं निधन झालं. त्या मुलांना घेऊन शकुंतला वाघचौरे यांनी दुसरं लग्न केलं. दुसऱ्या लग्नानंतर एक मुलगा आणि एका मुलीचा जन्म. नवरा मारझोड करायचा. पण शकुंतला वाघचौरे सोसत राहिल्या. पुढे नवऱ्याने साथ सोडली. मग शकुंतला आपल्या मुलांना घेऊन धुणी-भांडी करून दिवस ढकलू लागल्या. मुला-मुलींना चांगलं शिक्षण मिळावं, यासाठी शकुंतला रात्रं-दिन काम करायच्या. त्यातच मोठ्या मुलीला वकील व्हायचं होतं. पण ते राहून गेलं. मात्र मुलगा दीपक सोनावणे याने आईचं स्वप्न पूर्ण केलं आणि आईच्या हाती एलएलबीची डिग्री दिली. हा सगळा संघर्ष नेमका कसा होता? हे जाणून घेण्यासाठी Adv. दीपक सोनावणे आणि त्यांची आई शकुंतला वाघचौरे यांची मुलाखत नक्की पाहा.....