देशाला सर्वात मोठा धोका हिंदूत्ववादी संघटनांकडून, पंडित नेहरूंच्या पत्राचा कुमार केतकर यांनी दिला दाखला

भारतीय समाज हिंदूत्ववादी समाज आहे का? युनिटी ऑफ इंडिया काय आहे? मन की बात काय आहे? याविषयी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक कुमार केतकर यांनी विश्लेषण केले आहे.;

Update: 2023-05-30 04:39 GMT

मी स्वतंत्र मुद्दे मांडलेले नाहीत. पण उपस्थित झालेले मुद्दे आपल्या समोर पर्यायी संदर्भ देऊन मांडणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे नेहरू असोल, आंबेडकर असोत किंवा अजून कोणीही असोत Unit of India असा काही प्रकार नव्हता.

1947 पर्यंत नव्हता. भारत हा geographical entity अशा अर्थाने वेगळा होता. Indian civilisation म्हणून वेगळा होता. Indian traditions म्हणून वेगळा होता. Indian customs म्हणून वेगळा होता. Indian culture म्हणून वेगळा होता. India was not a political entity before 1947 at even their it was a partition entity. त्यामुळे जर भारत वर्ष हे एक प्रचंड मोठी प्रभावी संस्कृती असती तर विभाजनच झालं नसतं.

भारतीय संस्कृती म्हणा, हिंदू संस्कृती म्हणा. इतकी तेजस्वी, ओजस्वी आणि सहिष्णू असती तर साधारणपणे 50 लाख लोकं एका सहा महिन्याच्या काळात भारत पाकिस्तान सीमेवर मारले गेले नसते. हिंदूंनी मुसलमानांना, मुसलमानांनी हिंदूंना मारले. पण ती सहिष्णूता, तो हिंदूंमधला Greatness, ते हिंदूंमधलं मानवत्व हे मुद्दे. यात वसुधैव कुटूंबकम म्हणायचं आणि CAA-NRC लागू करायचं. एकाच आवाजात म्हणतात की, आम्ही मुसलमानांना आत येऊ देणार नाही. रोहिंग्यांना आत येऊ देणार नाही. मग हे वसुधैव कुटूंबकम कसलं? हेच मला कळत नाही.

पण त्या वसुधैव कुटूंबकम मानणाऱ्या लोकांबरोबर dialogue कसा करायचा? हे ही मला कळत नाही. कारण ते वसुधैव कुटूंबकम कुठून बघून म्हणतात आणि दुसरीकडे ते देशातील मुसलमानांना नाकारतात. एकीकडे ते भारताची परंपरा सांगतात आणि त्याच वेळेला नेहरू संपला असं म्हणतात. नेहरू संपला म्हणजे इतिहासच संपला. मग कसलीही सहिष्णूता आणि कसला देश. आता अजून देशाचं विभाजन व्हावं अशी इच्छा जरी कोणाची नसली किंवा तरी 1980-84 या काळामधील अनेक लोकांचे survey available आहेत. त्या काळात social media नव्हता. तरीपण कित्येक लोकांना वाटत होतं की आता खलिस्तान नक्की होणार. कारण अमृतसर हे आता संपूर्ण असा प्रभाव टाकलाय की खलिस्तान नक्की होणार. पण तो झाला नाही. त्याच्या राजकारणात मला द्यायची इच्छा नाही. पण आत्ता सुद्धा खलिस्तान चळवळीचा जोर नुसता भारतात नव्हे तर Australia, Canada आणि America मध्ये किती आहे? हे मी प्रत्यक्ष डोळ्यांनी तिकडे जाऊन पाहिलेलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे.

New Zealand ला तो अधिक आहे. पण मी New Zealandला गेलेला नाही. त्याच्यामुळे खलिस्तानची ही अवस्था आहे. तर स्वतः Pakistan जो पुर्वीचा इतिहास होता, असं आपण मानतो. त्याच्यामध्ये आता काय चाललंय? हेही आपण पाहतो. त्यामुळे हा संपूर्ण भारतीय प्रदेश त्याला देश म्हणा किंवा आणखी काही. हे सगळं अपूर्व आहे आणि तिथंच सगळ्या आदर्श गोष्टी घडतात आणि ते परंपरा उज्वल येते. येथे आदर्श उज्वल आणि तत्वज्ञान उज्वल आहे. इथं रामायण महाभारत उज्वल आहे. त्यामुळे हे सगळं इथंच होणार. असाच भ्रम आपल्या मनात असेल तर आपण कॉम्प्लेक्स घेऊन जगतोय.

कारण आताच हे गेल्याच महिन्यामध्ये काही लोकांनी अशी भाषणं केली की, अशा पद्धतीने जर विचार होत असेल तर भारतासंबंधी तामिळनाडूला वेगळा विचार करावा लागेल. हे चुकीचं विधान आहे. कारण 1934-66 या काळामध्ये Tamil Nadu नी द्रविडीस्तान म्हणून घोषित व्हावं, असं डीके चळवळीच्या प्रवक्त्यांनी बोलायला सुरुवात केली होती. आम्हाला वेगळा झेंडा द्या, आम्हाला वेगळी करन्सी द्या, आम्हाला वेगळी policy द्या, असं ते म्हणत होते. त्यामुळे द्राविडीस्तानचा मुद्दाही आहे. एवढंच काय तर 1930 आणि त्यावेळच्या त्यावेळच्या गोलमेज परिषदांमध्ये भारत हा एक देश आहे का? अशी चर्चा झालेली आहे. प्रत्यक्षातसुद्धा. त्याच्यामुळे भारत हा एक देश आहे आणि भारतीय परंपरा थोर आहे, असं म्हटलं जातं.

पण एकीकडे बॅ. जीना, दुसरीकडे आंबेडकर, तिसरीकडे ग तिकडे चिंता पण आहे तिकडे द्रविडी लोक पण अशी मागणी करत आहेत. by the way खलिस्तानचा पहिला ठराव हा 1935 सालचा आहे.

त्यामुळे भारत unity of India हे सगळ्यांना अत्यंत आपल्याला प्रिय आहे. आणि त्यामुळे भारतावरचं प्रेम म्हणजे त्या unity of India वरचं प्रेम हे स्टेटमेंटच मला अनैतिहासिक वाटतं.

मन की बात बोलो

मन की बातचा उल्लेख झाला. मन की बातचे तुम्ही जर्मन भाषांतर केलं तर ते माईन कांम्फ असं होतं. आता हे माईन काम्फ हे पुस्तक कुणाचं होतं हे प्रेक्षकांना सांगायची गरज नाही. कारण हिटलरने त्याची मन की बात खूप अगोदर सुरु केली होती. पण आपल्या मन की बात वाल्यांनी त्यांची सुरवात 2014 नंतर केली.

ऑगस्ट आणि सप्टेंबर 1947 पुर्वीची गोष्ट. त्यावेळी पंडित नेहरू यांनी पाच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले होते. त्यामध्ये देशाला सर्वात मोठा धोका हिंदूत्ववादी शक्तींकडून असल्याचं म्हटलं होतं. एवढंच नाही तर नेहरूंनी त्या पत्रात म्हटलं होतं की, या लोकांच्या विचारशक्तीला आणि त्यांच्या संघटनशक्तीला आपण रोखू शकलो नाही आणि हे जर सत्तेत आले तर देशाचं खूप मोठं नुकसान होईल. त्यातून देशाला बाहेर पडण्यास खूप वेळ लागेल.

लेखनामध्ये त्याच्यानंतर आलेले हिमालय, दंगल, रामायण, महाभारत they are not हिंदू symbol at all. आपण ज्या प्रदेशात राहतो, म्हणजे गावात राहतो, म्हणजे माणसाबरोबर राहतो. त्याच्याबद्दल आपल्याला आत्मियता वाटणं हे स्वभाविक आहे. कारण आपण माणसं आहोत. त्यामुळे गांधीजींना आणि नेहरूंना गंगेवरची कविता आहे ती वाचून गंगेचं वेगळंच चित्र दिसायला लागतं. कवितेमध्ये गंगेने किती पापं या किणाऱ्यावरून पाहिली आहेत, अशी ती कविता होती. त्यामुळे तुम्ही गंगा जरी पाहिली तरी गंगेच्या पावित्र्याबद्दल आपल्याला संशय येईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे गंगेबद्दल, हिमालयाबद्दल पंडित नेहरू यांना आत्मियता वाटली असेल तर ती स्वभाविक आहे. त्यातून हिंदूत्ववाद सिध्द होत नाही.

रामायण, महाभारत या पुस्तकांबद्दल लिहीलं आहे. पण महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं की मी फक्त हिंदू नाही. मला हिंदूत्ववादाचा अभिमान आहे. पण नंतर ते म्हणतात की, सनातनी हिंदू असल्याचं म्हटलं जातं. भगवद्गीतेचा संदर्भ देत विनोबा भावे असो वा लोकमान्य टिळक यांची गीतारहस्य यामध्ये कुठंही भगवद्गीता हिंदू धर्माचे प्रतिक असल्याचे म्हटले नाही.

जर उद्याला कोणी असं म्हणायला लागलं की त्याच्या पलीकडे काही नाही.

जगाच्या प्रत्येक मानवी इतिहासात मुलभूत तत्वज्ञानावर डिबेट

तर असं काही चालणार नाही. प्रत्येक जगाच्या मानवी इतिहासामध्ये fundamental philosophical debate झालेली आहे. Fundamental cultural issue वर डिबेट झाली आहे. आपलंच culture श्रेष्ठ आणि Indian culture Indian culture श्रेष्ठ म्हणणं हा अतिशय immatureity चा प्रकार आहे. आपल्याकडचे जे इथले लोकं असतात भारतातले विशेषतः अमेरिकेत गेलेले आहेत. ते तिकडे तुम्हाला माहित असेल नागरिकत्व जर स्वीकारायचं असेल तर त्यांच्या परीक्षा झाल्यावर झेंड्यासमोर उभं राहायचं असतं आणि या झेंड्यासाठी या देशासाठी प्रामाणिक रहायला तयार आहे, असं तिथे म्हणायचं असतं. मग त्याला ते तर आपल्याकडचे अनेक देशभक्ती आहे. आपली जी अमेरिकेतले भारतीय आहेत त्यांचीच देशभक्ती म्हणजे अक्षरशः वाहती आहे.

ते तिकडे ते सगळे शपथ घेऊन आलेले आहेत. त्या झेंड्यासमोर त्या देशासाठी प्राण द्यायला आणि त्यांची देशभक्ती एवढी वाढलेली आहे की, ते तिकडे बसून सागर प्राण मिळवायला म्हणतात. त्यांचा सागर प्राण इकडे विषयांशी जवळ तळमळायचा. कारण तिकडे Visa मिळायचा. तिकडे जायचे. त्यांना actually तिकडे जायचे असते. त्यामुळे मला वाटतं की त्यांचं सागर हा प्राण खेळमळ आहे. अत्यंत ढोंगीपणाचं वागणं असतं त्यांचं. त्यामुळे सावरकर किंवा ते अखंड भारत व्हावा, अशी माझी इच्छा आहे. एकदा अफगाणीस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश भारतात आला तर मग हिंदू पंतप्रधान कसा होईल? हा प्रश्न मला पडतो. त्यामुळे हिंदू समाज, भारतीय समाज आणि आशियाई समाज असा उल्लेख केला असेल तरी तो वेगळ्या दृष्टीकोणातून होता.

मला हिंदू, ख्रिश्चन, बौध्द अशा कुठल्याच संस्कृतीची गरज नाही. त्यापेक्षा मानवी सहिष्णूता ठीक आहे, असं कुमार केतकर यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News