इस्त्राईल-पॅलेस्टाईन संघर्षात भारताने नेमकी कुणाची बाजू घ्यायची?
इस्त्राईल पॅलेस्टाईन यांच्यात युद्ध भडकलं आहे. जगात आता दोन गट पडायला सरूवात झालीय. पण इस्त्राईल-पॅलेस्टाईन संघर्ष का आहे? त्यामागे नेमकी काय कारणं आहेत? या युद्धात भारताने नेमकी कुणाची बाजू घ्यायला हवी? याविषयी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांचे विश्लेषण....;
गेल्या काही दिवसापासून Israel आणि हमासच्या युद्धाच्या चर्चा सगळीकडे सुरू आहेत. एवढंच नाही तर भारतामध्ये तर जणू काही आपण नक्की कसे इस्त्राईलच्या बाजूने आहोत हे सांगण्याची धडपड किंवा स्पर्धा चालली आहे. जेव्हा दोन देशांमध्ये किंवा दोन समूहांमध्ये हिंसक संघर्ष होतो. तिथं युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते किंवा अशी युद्ध होतात. त्यावेळेला नक्की कुणाची बाजू घ्यायची? हा प्रश्न खरंतर फार किचकट असतो. अगदी तेच आत्ता झालेलं आहे.
हमास ही जी संघटना आहे. जिचे गाजा पट्टीवर वर्चस्व आहे. तिने अचानकपणे इस्त्राईलवर हल्ला केला आणि हल्ला करून अनेक नागरिकांना ताब्यात घेतलं. अनेकांवर क्रूरपणे अत्याचार केल्याच्या सुद्धा बातम्या येत आहेत. पण त्या अद्याप confirm झालेल्या नाही आहेत.
हमासच्या हल्ल्यानंतर तातडीने Israel ने त्याला उत्तर म्हणून गाजा पट्टीची नाकेबंदी करून तिथे तुफान बाँबवर्षाव सुरू केलाय. त्यामुळे एका अर्थाने सध्या इस्त्राईल पॅलेस्टाईनमधील संघर्ष 1967 सालच्या आसपास जसा तीव्र पातळीवरती होता. त्या पातळीवर जातो का काय? अशी आज जगामध्ये परिस्थिती आहे. पण मी म्हटलं तसं ज्यावेळेला या दोन समूहांमध्ये किंवा देशांमध्ये वाद होतो, हिंसा होते आणि युद्ध सदृश्य परिस्थिती तयार होते. त्यावेळेला कुणाचीही बाजू कुणाची बाजू घ्यायची? याआधी नक्की काय चाललंय? हे समजून घेणं आवश्यक असतं.
हमास दहशतवादी संघटना आहे का?
आपल्याकडचे पत्रकार, अनेक television माध्यमं आणि आपण सुद्धा मुख्यतः अमेरिकेच्या चष्म्यातून जगाकडे पाहतो आणि त्यामुळे आपल्याकडच्या सगळ्या बातम्यांमध्ये हमास ही एक दहशतवादी संघटना असल्याचा उल्लेख येतो. म्हणून सुरुवातीला हे स्पष्ट केलं पाहिजे की आम्हास तुम्हाला आवडो किंवा न आवडो. गाजामधल्या लोकांनी बहुमतांनी तिथे हमासचं सरकार निवडून दिलेलं आहे. त्यामुळे गाजापट्टीवरती आज हमासचा कारभार चालतो. तिथे हमासचे नियंत्रण आहे. ते बंदुकीच्या जोरावर नाही तर लोकमताच्या पाठिंब्यावरती तिथे हमासचं सरकार आहे. त्यामुळे हे सगळं पाहण्याआधी गाजा पट्टीचा भुगोल तपासून पाहू....
गाजा पट्टीचा भूगोल?
गाजा पट्टीचा भूगोल पाहताना तुम्हाला असं दिसेल की, गाजापट्टी हा एक अत्यंत चिंचोळा पट्टा आहे आणि या चिंचोळ्या पट्ट्यामध्ये जवळपास वीस लाख लोक राहतात. हे लोक स्वतंत्र आहेत का नाही? याच्याबद्दलही काही प्रमाणामध्ये साशंकता आहे. याचं कारण असं की Israel च्या निर्मितीनंतर लोकांचं काय करायचं? हा एक किचकट प्रश्न तयार झाला होता. त्यातून संघर्ष निर्माण झाला होता. पुढे 2004 ला पॅलेस्टाईनच्या दोन भागांना इस्त्राईलने स्वातंत्र्य किंवा मोकळीक दिली. त्यातला एक वेस्ट बँक आणि दुसरा म्हणजे गाजा पट्टी हा प्रदेश. त्याच्यानंतर तेव्हापासून तिथे म्हणजे या गाजापट्टीमध्ये हमास या संघटनेचं वर्चस्व राहिलेलं आपल्याला दिसतं. त्यात संघटनेचे मूळ नेते जे होते यासर आराफात त्यांना मानणाऱ्या संघटनेचा वर्चस्व राहिलेला आहे. ही संघटना हिंसेवर विश्वास असलेली आहे. ती मुस्लिमवादी आहे आणि काही करून Israel पासून गाजाचं संरक्षण केलं पाहिजे याच्यासाठी आक्रमक भूमिका घेणारी आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ही संघटना आणि इस्त्राईलमध्ये सतत चकमकी होत असतात. हिंसा होत असते. एकमेकांवरती हल्ले होत असतात. तसाच हमासने इस्त्राईलवर आताही हल्ला केला.
हमासने केलेल्या हल्ल्याचं वैशिष्ट्ये काय?
हमासने इस्त्राईलवर जो हल्ला केला त्या हल्ल्याचं वैशिष्ट्ये म्हणजे तो अत्यंत पूर्वनियोजित आणि Israelला गाफील पकडणारा हल्ला होता. Israelची मोसाद ही जी गुप्तहेर संघटना जिचं आपल्याकडे अनेकांना फार कौतुक वाटतं. ती संघटना याच्यात फसली आणि तिला याचा पत्ताही लागला नाही. तो का लागला नाही? हे यथावकाश बाहेर येईलच. पण याच्यामध्ये दोष कुणाचा? आणि चूक कोणाची आहे? शोधण्यापेक्षा नेमकी परिस्थिती काय आहे? हे आपण जर पाहायला लागलो तर आपल्याला असं दिसतं की सध्या Israel मध्ये आक्रमक वृत्तीच्या नेत्यान्याहू यांचं राज्य आहे. त्यांनी गेल्या काही वर्षांपासून सतत Palistin च्या विरुद्ध आणि Palistin नी लोकांच्या विरुद्ध कारवाया चालवलेल्या आहेत. त्यांच्या सरकारमध्ये जे संरक्षण मंत्री आहेत ते त्यांच्याहूनही जास्त आक्रमक वृत्तीचे आहेत आणि त्यामुळेच आत्ता हा हल्ला झाल्यानंतर आता गाजापट्टीचं संपूर्णपणे नेस्तनाबूतीकरण केलं जाईल. त्यांचं निर्दालन केलं जाईल अशी भाषा Israel कडनं केली. याच्यात गंमत अशी आहे की, पाश्चात्य देश आणि America यांचा सतत Israelला पाठिंबा असतो. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा पाश्चात्य देशांनी Israe lची पाठराखण करणं हे अत्यंत स्वाभाविक होतं.
गाजा पट्टीला शस्त्र आणि पैसा येतो कुठून?
गाजा पट्टी हा चिंचोळा प्रदेश आहे. मग एवढ्या छोट्या चिंचोळ्या पट्टीमध्ये कारभार करणाऱ्या गाजाकडे शस्त्र आणि पैसा येतो कुठून? असा प्रश्न पडतो. या प्रकाराकडे बघताना याचे तीन पदर दिसतात. म्हणजेच त्याच्यामध्ये तिहेरी गुंता आहे आणि आपण भारतातून जेव्हा त्याच्याकडे बघतो. त्यावेळेला बहुतेक वेळेला चुकीच्या चष्म्यातून बघतो. हे तुमच्या लक्षात येईल. एक म्हणजे अरब विरुद्ध ज्यू हा संघर्ष आहे. त्यामुळे आपल्याला असं हे याच्यामध्ये दुसऱ्या बाजूला आपल्या देशातल्या काही लोकांना असंही वाटतं की हा मुद्दा मुस्लिम विरुद्ध ज्यू आणि ख्रिश्चन असा संघर्ष आहे. त्यामुळे अर्थातच मुसलमानांचे जे विरुद्ध असतात ते मग लगेच विरुद्ध भूमिका घेतात.
यातला महत्वाचा भाग म्हणजे हा वाद जसा स्थानिक मुद्दा वाटतो. तसाच तो इस्त्राईल विरुद्ध पॅलेस्टाईन असा आहे. त्यामुळे एका बाजूला हा धार्मिक वाद किंवा वांशिक वाद वाटतो. पण प्रत्यक्षात हा वाद स्थानिक पातळीवर इस्त्राईल विरुद्ध पॅलेस्टाईन सरकार यांच्यातला आहे.
जवळपास 1916 पासून ज्याला आपण Israel असं म्हणतो. त्या प्रदेशात स्वतंत्र राष्ट्र म्हणून चळवळ सुरू झाली होती. या चळवळींनी साधारणपणे इस्त्राईल म्हणजे ज्यूईश किंवा धार्मिक, वांशिक एकतेच्या मुद्द्यावर राष्ट्र, असेल असा विचार मांडलेला होता.
दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान युरोपात पण विशेषतः Germanyमध्ये ज्यू लोकांवरती जे अत्याचार झाले. त्यामुळे या मागणीला आणखीन जोर आला. त्याच्यानंतर 1947 मध्ये मुख्यतः युरोपीय देशांनी ज्यूंना Palestin च्या जवळच्या प्रदेशामध्ये वास्तव्य करायला आणि त्यांचं तिथे राज्य स्थापन करायला मान्यता दिली. हा एका अर्थाने आयजीच्या जीवावर बायजी उदार असा प्रकार होता. याचं कारण 1947 आधी Palistinच्या लोकांचं तिथे वावर होता. त्यांचं त्या प्रदेशावरती नियंत्रण होतं. पण Europe चं नियंत्रण अरब देशांवरती राहावं या भूमिकेतून अमेरिकेने आणि पाश्चात्य देशांनी आसपासच्या प्रदेशामध्ये ज्यूं ची वस्ती करून तिथे Israel हे राष्ट्र निर्माण केलं. तेव्हापासून आणि त्याच्या आसपासचा प्रदेश कोणाचा? हा वाद रंगलेला आपल्याला दिसतो. आणि तो वाद रंगण्याचं कारण अर्थातच हे आहे की, ही जेरुसलेम ज्यू लोकांची पवित्र भूमी मानली जाते. तशीच ती मुस्लिमांची आणि ख्रिश्चनांची सुद्धा पवित्र भूमी मानली जाते. या वादाच्या ठिणगीतून यासह यांचं नेतृत्व उदयाला आलं आणि दीर्घकाळ सशस्त्र लढा देऊन त्यांनी Israelला नियंत्रणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला काही प्रमाणात यश आलं.
1984 सालानंतर खुद्द यासर आराफल यांनी समोपचाराची भूमिका घेतली आणि अंतिमतः ज्याला two nation solutions म्हणतात. म्हणजे एकाच प्रदेशामध्ये दोन राष्ट्र असतील हे solution मान्य झालं. या ओस्लो शहरामध्ये जो करार झाला. त्याच्यानुसार असं मानलं गेलं की Israelला Palistinचे लोक मान्यता देतील आणि पॅलेस्टिनला Israel मान्यता त्यानुसार आपण मघाशी उल्लेख केला त्याप्रमाणे आणि या दोन प्रदेशांमध्ये पॅलेस्टीईने लोकांचं राज्य आलं. एका अर्थाने काही प्रमाणात का होईना आता शांतता निर्माण होऊ शकेल. अशी परिस्थिती आहे. पण नेतान्याहू यांच्यासारखे नेते जेव्हा जेव्हा Israelमध्ये उदयाला आले. तेव्हा त्यांनी Palistin च्या विरुद्ध आणि पॅलेस्टिनी लोकांच्या विरुद्ध धोरण आखलेली आपल्याला दिसतात.
Israil मध्ये म्हणायला लोकशाही जरी असली तरी ही लोकशाही कितपत खरी आहे असा प्रश्न खुद्द स्वतः ज्यू असलेल्या राज्यशास्त्रज्ञांनी उपस्थित केलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ethanic म्हणजे धार्मिक आधारावरती जेव्हा तुम्ही राष्ट्र निर्माण करता तेव्हा ते लोकशाही असू शकत नाही. या भूमिकेतून Israel कडे जर आपण पाहिलं तर आपल्याला जसं दिसतं की, खुद्द Israel मधल्या अरब विरुद्ध आणि Israel च्या देखील विरुद्ध असं नेता धोरण सातत्याने राहिलेलं आहे. ज्याला promocation असं इंग्रजीत म्हणतात. म्हणजे मुद्दाम दुसऱ्या राष्ट्रांना किंवा इतर विरोधकांना आपल्या विरोधामध्ये चिथावणी देणं हा प्रयत्न ते सतत करताना दिसतंय. मग आत्ता हमासाला मदत कोण करतंय? तर आत्ता सगळी आरोप राष्ट्र बाजूनी नाहीत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अरब नसलेलं Iran हे राष्ट्र मुख्यतः आत्ता हमासला पाठिंबा आहे. तुर्कस्तांनी तर आत्ता सध्या गेली काही वर्ष याच्यात पुढाकार घेऊन बाजू घेतलेली दिसते.
आंतरराष्ट्रीय राजकारणातल्या डाव प्रति डावांचा भाग म्हणून चीननीही छुपा पाठिंबा हमासला दिलेला आपल्याला दिसतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या सारीपाटावर कोण काय भूमिका घेतो? याच्याकडे जर आपण बारकाईने बघायला लागलो. तर आपल्याला हमास विरुद्ध Israel याच्यातला गुंता लक्षात येतो. हा मुद्दा मुस्लिम विरुद्ध ज्यू नाही. हे जर आपण लक्षात घेतलं, तर तातडीने आपण Israelची बाजू घेतलीच पाहिजे असंही नाही. हेही आपल्या लक्षात येतं. ज्या हल्ला केला त्याला विरोध करतानाच जी क्रुरता Israelने दाखवलेलं आहे त्याचाही आपण निषेध करायची तयारी ठेवली पाहिजे. धाडस दाखवलं पाहिजे आणि जर आपण युद्धाच्या विरोधात असलो आणि भारतातले अनेक लोक अचानकपणे युद्धाच्या आणि हिंसाच्या विरोधात उभे राहिलेले दिसतायेत. तसे जर आपण असलो तर आपण Israel आणि हमास या दोघांचाही निषेध केला पाहिजे. याचं कारण जागतिक शांतता असेल किंवा मानवतावाद असेल या भूमिकेतून कोणीही कुणाला मारणं धर्माच्या आधारावर राष्ट्र उभं करणं आणि धर्माच्या आधारावर इतर धर्मियांना मारणं, हे केव्हाही निषेधार्हच असतं हा हमास आणि इस्त्राईल यांच्यातल्या हिंसेचा खरा धडा आहे.
हे ही पाहा- सुहास पळशीकर यांचे वेगवेगळ्या विषयावरचे विश्लेषण नक्की पाहा...