डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व
देशाचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती आहे. त्यानिमित्त आश्र्विनी गावंडे यांनी त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश.
माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी. जे. कलाम यांनी लिहिलेल्या या ओळी. या वाक्यातील त्रिकालाबाधित सत्य एक सुभाषित बनून राहिले आहे. जे कायम लोकांनी आपापली लिटमस टेस्ट करण्यासाठी वापरावं असेच आहे.
नितळ,सहज,सजग,निष्कलंक लौकिक जगात जगात जगणारा हा देवदूत खरंच या काळात होऊन गेला. ज्याला राष्ट्रीय परिप्रेक्षात सर्वांनीच पाहिले. आज आपल्या भारत धर्मभेद, जातीयभेद जातीभेदाच्या या संकटात आहे. या वातावरणात जेव्हा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे नाव उच्चारले जाते,तेव्हा हे नाव एका हिंदूंचे आहे की मुसलमानाचे,की ख्रिश्चनाचे हे विसरायला लावणारा एक खरा समर्पित भारतीय नागरिक म्हणजे डॉ.ए.पी.जे. अब्दुल. कलाम
भारताच्या शिक्षण क्षेत्राला आणि त्यात काम करणाऱ्या लोकांवर वारंवार प्रश्नचिन्ह उठवले जाते. त्याच शिक्षकी पेशाला त्यानी घडविले. याआधी अनेक ज्ञानी उच्च विद्या विभूषित लोकांनी राष्ट्रपती पद भूषवले परंतु राष्ट्रपती या सर्वोच्च पदावरून निवृत्त होऊन पुन्हा शिकविण्याचे पवित्र काम हाती घेऊन शिक्षणक्षेत्राला उर्जा प्रदान करून त्याची गरिमा किती मोठी आहे. शिक्षणाची जबाबदारी आणि अधिकार किती मोठा आहे? हे एकाच वेळी अधोरेखित केले.
आज पर्यंत या पृथ्वीवर सर्वांनी पक्षी उडताना पाहीलेत परंतु स्वतःच्या हृदयातील आर्त हाकेला पंखरूपी महत्त्वाकांक्षेचे बळ देणारा, संपूर्ण जगाच्या अवकाशात हा एकमेव द्वितीय भारतीय अग्निपुरुष उडताना बघितला की भारतात जन्म घेतल्याचे सार्थक वाटतं. आपल्यात राहणाऱ्या, आपल्या सारखाच बोलणाऱ्या व्यक्तीचं मोठेपण समजून घेण्यासाठी प्रत्येकाला दरी एवढं खोल व्हावं लागतं हेच खरं.
कलामांच्या उच्च जीवनाची पायाभरणी ही त्यांच्या लहानपणीच घातली गेली होती. उणे पुरे आठ वर्षाचं मुल वर्तमानपत्र वाटता वाटता पूर्ण वर्तमानपत्र वाचून घेत असे त्याआधी त्यांच्या शिक्षकांनी सर्वांना आवाहन केलं होतं की मी अशा पाच विद्यार्थ्यांना फुकट शिकवेल जो सकाळी चार वाजता उठून आंघोळ करून शिकवणीसाठी माझ्याकडे येईल. त्यामध्ये एक डॉ. कलाम होते.त्यानंतर ते पेपर वाटायचं काम करायचे.
त्यांनी भारताची अनेक उच्चपदे भूषवली ज्याला आजच्या भाषेत मोस्ट हॅपनिंग (most happening) ठिकाणं म्हणता येतील असे परंतु कधीही ते पेजथ्री संस्कृतीत ते रमले नाहीत.
एअर फोर्स मध्ये जाण्याचा त्यांचा मानस जेव्हा नियतीने डावलला. त्यावेळी च्या मनात अनेक मोठी वादळं उसळली. डेहराडून ला इंटरव्यू ला जाण्याचे पैसे त्यांच्या बहिणीने दागिने मोडून दिले होते.एवढेच काय तर परत जाण्याचे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. ऋषिकेश ला गंगेकाठी आत्महत्या करण्याचे बळ एकवटत असताना,स्वामी शिवानंद यांनी त्यांना बघितलं त्यांच्या मनातील विचार त्यांनी ओळखले.सर्व वृत्तांत जाणून घेतला. आणि "तू केरळचा, म्हणजे माझ्या शंकराचार्यांचा गावाचा " पैसे तर मी तुला देईनच पण हे लक्षात घे नियतीने तुला पाहिजे तो कौल दिला नाही. त्याबद्दल तू खंत करू नकोस यापेक्षा अधिक महत्त्वाच्या कामासाठी नियतीने तुला सुरक्षित राखून ठेवले आहे*. हे लक्षात घे" आणि खरंच हे वाचल्यावर सतत असं वाटत राहतं की ,
भारताच्या भाळी यशोशिखरे लिहिण्याचं कामचं नियतीने कलमांकडे सोपवले होते. आज आपण एकविसाव्या शतकात एकविसाव्या शतकातील स्किल म्हणून लेझर बिम फोकस Laser beam focus वर खूप चर्चा करतो ते कलाम विसाव्या शतकातच जगले. इंजीनियरिंग शिकत असताना "तू जर तीन दिवसात विमानाचे तुझे मॉडेल तयार करून नाही दाखवले तर तुझी स्कॉलरशिप बंद होऊ शकते". असे जेव्हा त्यांना सांगण्यात आले तेव्हा सलग७२ तास प्रयोगशाळेत उभे राहून नवीन मॉडेल तयार केलं. हा लेझर बिम फोकस नाहीतर काय आहे?
ए.पी.जे. कलाम एक शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ सोबतच शिक्षण तज्ञ सुद्धा होते. ते नेहमी म्हणत प्राथमिक शिक्षण हा मनुष्य जीवनाचा पाया आहे. हा पाया पक्का करणारे तीन मुख्य घटक म्हणजे आध्यात्मिक वातावरणात योग्य संस्कारांची बिजे रोवणारे आई-वडील आणि लहानग्या मनामध्ये प्रत्येक श्वासागणिक विश्वासाचे बळ भरणारे शिक्षक . शिकायचं कशासाठी त्याची नेहमी ते तीन कारण सांगत,शिकण्यासाठी शिकायचं, जगण्यासाठी शिकायचं आणि जिवंत राहण्यासाठी शिकायचं.
भारतातील कुठलीही मुलं इयत्ता बारावी पर्यंत शिकण्यासाठी आयुष्याचे 25 हजार तास देतो मग शिक्षणाचा उद्देश काय असावा तर विद्यार्थ्यांमधील सृजनसशीलतेचा संशोधन व्हावं. सृजनशीलता बाहेर कशी काढावी त्यासाठी सृजनशील पाठ्यक्रम सृजनशील वर्ग आणि सृजनशील शिक्षक असणे खूप गरजेचे आहे. यापैकी पाठ्यक्रम आणि वर्ग हे दोन्हीही सृजनशील बनवल्या जाऊ शकतील परंतु सृजनशील शिक्षक कसे ओळखावेत? किंवा कसे तयार करावेत? यावर त्यांचे असे मत होते की, शिक्षकाच्या ज्ञानाची धारणक्षमता,
त्यांचा अधिकार, त्यांची शिक्षकी पेशाविषयीची उत्कटता, त्याची विद्यार्थ्यां प्रतीची भावना आणि त्यांना पुढे नेण्याचा भाव ही सृजनशील शिक्षकाची वैशिष्ट्ये आहेत. ज्ञान म्हणजे काय? हे विस्तृतपणे बोलताना डॉ. कलाम म्हणतात ज्ञान म्हणजे नीतिमत्ता अधिक सूजनशीलता अधिक धैर्य. यामध्ये शिक्षकाचे धैर्य म्हणजे काय ?किंवा धैर्यवान शिक्षक कोणाला समजावे ? तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या पद्धतीवरून आणि विद्यार्थ्यांच्या चुकीच्या प्रश्नाला बरोबर करून उत्तर देणे ,सोबतच शिक्षक स्वतः कसा जगतो. या सर्व बाबी त्यांनी महत्त्वाच्या मानल्या अशाच शिक्षणातून ज्ञानवंत निपजतील असा त्यांचा विश्वास होता.
डॉ. कलाम म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या जे त्यांच्या जगण्यातील प्रत्येक प्रसंगातून प्रतीत होत होते. जेव्हा ते डीआरडीओ मध्ये मिसाईल बनवण्यावर काम करत होते तेव्हा पीएसएलव्ही चे साहित्य ते आणि त्यांचे सहकारी (हे सर्व राष्ट्रीय स्तरावरील गणमान्य वैज्ञानिक* होते.) सायकल वरून ने -आण करीत असत. राष्ट्रपती झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या संपूर्ण परिवाराला त्यांनी काही दिवस राष्ट्रपती भवनात वास्तव्यास बोलविले होते तेव्हा त्या 51 जणांवर 3 लाख 52 हजार झालेला खर्च त्यांनी त्यांच्या वैयक्तिक खात्यातून राष्ट्रपती भवनाच्या खर्चात दिला. जेव्हा त्यांना याविषयी मनाई करण्यात आली तेव्हा ते म्हणाले की "राष्ट्रपती भवनांची जबाबदारी फक्त राष्ट्रपतीला सांभाळण्याची आहे त्याच्या परिवाराला नाही."
डॉक्टर कलामांची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यांचा मानवीय पक्ष खूप मजबूत होता. जो प्रत्यक्ष राष्ट्रपती झाल्यानंतर लोकांसमोर आला. त्यांचा मोठा भाऊ भावाची मुलगी आणि नातू जेव्हा हज यात्रेसाठी गेले असता ही गोष्ट भारतीय दूतावासाला जेव्हा माहित झाली,त्याची शहानिशा केल्यानंतर भारतीय दूतावासाला डॉ. कलाम यांनी असे आदेश दिले की ते तिघेजण सामान्य व्यक्ती सारखे हज यात्रा करू शकतील याकडे लक्ष द्यावे.
राष्ट्रपती भवनांचे अनेक प्रोटोकॉल त्यांनी मोडीत काढले (चांगल्या अर्थाने म्हणता येतील.) राष्ट्रपती तर्फे दरवर्षी इफ्तार पार्टी दिली जायची.ती आपल्या कार्यकाला दरम्यान डॉक्टर कलामांनी ती कधीही दिली नाही. त्यांच्या मताप्रमाणे इफ्तार पार्टीमध्ये आपण ज्या लोकांना आमंत्रित करतो ती लोक एक तर खात्यापित्या घराची असतात आणि त्यावर चौकशी केला असता त्यांना असे कळले की त्यावर साधारणतः अडीच ते तीन लाख खर्च येतो यापेक्षा आपण ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे अशासाठी या पैशातून काही करू शकतो का? यावर विचार व्हावा. असे त्यांनी आदेश दिले आणि मग या रकमेतून अनाथालयासाठी आवश्यक वस्तू देण्याचे ठरले आणि तसे ते झालेही त्यावर त्यांचे म्हणणे असे पडले की हा सर्व राष्ट्रपती भवनाचा खर्च आहे. माझ्याकडून तर काहीच मदत दिल्या गेली नाही तेव्हा त्यांनी स्वतःकडचे एक लाख रुपये देऊन त्यात भर घालण्यास सांगितले.
राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी त्यांची जी काही संपत्ती होती ती सुद्धा दान करून टाकली. कारण की त्यांचे असे म्हणणे होते की आता माझी संपूर्ण आयुष्य संपेपर्यंतची काळजी हा देशच घेणार आहे मग मला माझ्याजवळ कुठली गोष्ट ठेवण्याची गरजच काय?
राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षा गार्ड च्या व्यवस्थेपासून ते खानसामा आणि बटलर यांना त्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपले. भारतीय युद्धात भूमिका बजावणाऱ्या जनरल माणेकशा ,अर्जनसिंग यांनी या देशाने पदव्या तर प्रदान केल्या परंतु त्यांची रोजच्या जगण्याची पैशाच्या रूपाने व्यवस्था मात्र डॉक्टर कलामांनी रीतसर करून दिली.
त्यांचे आत्मकथन Wings of fire मध्ये ते म्हणतात मै नही कहता मेरी आत्मकहानी से लोक प्रेरित हो, मै तो बस इतना ही जानता हु की मेरे देश की नोजवानो को एक साफ नजरिये और दिशा की जरूरत है। कोई शक्स कितना भी छोटा हो, वो कचदिल ना हो वो इस देश के किसी भी कोने, से समाज के किसी भी तपके से आये, "किसी भी मासूम को मेरे इस आत्मकथन से उम्मीद मिले ,चैन मिले"
त्यांचे जगणं इतकं समृद्ध होतं की त्यापुढे सर्व शब्द थिटे पडावेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला कधीही कोणत्याही सीमांनी बद्ध केलं नाही.स्विझर्लंडला तो दिवस म्हणजे 26 मे 2006. त्यांनी जेव्हा भेट दिली तो त्यांच्या भेटीचा दिवस स्वित्झर्लंड हा देश "विज्ञान दिवस" म्हणून आजही साजरा करतो.
मेरी उपयोगिता ही मेरा सन्मान है. या न्यायाने जगणाऱ्या डॉ. कलाम यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न हे सर्वोच्च सन्मान मिळवण्याची त्यांची गरज नव्हतीच कधी,तर ती देणाऱ्याची गरज होती. त्यामुळे देणाऱ्यांची गरिमा वाढली. 2020 पर्यंत भारत विश्व गुरु बनू शकतो हे कधीही इतर कोणीही न पाहिलेले स्वप्न ते भारताला देऊन गेले.
एक तर अशी एखादी अदृश्य गोष्ट किंवा Vision निर्माण करणे. त्यावर लोकांचा विश्वास बसणे आणि त्यासाठी केवळ त्यांनीच नाही,तर इतरांनीही झटणे या सर्व बाबी केवळ अविश्वासनीय आहेत. पण आपण सर्वजण ते त्यांच्यासोबत जगलो,करोडो मुलांमध्ये त्यांनी या सर्व गोष्टींचं बिजारोपण केलं. ते म्हणत "हर हिंदुस्तानी के दिल में एक जलती हुई लो (ज्योत) उस लो की परवान से सारा आसमान रोशन हो जाये।"
असे महनीय व्यक्ती खरे तर समयातीत असतात. त्यांच्या ऊर्जेने संपूर्ण आसमंत भरलेला असतो नेहमीच. अशा महात्म्याला प्रत्यक्ष ऐकण्याचा लाभ मलाही नियतीने दिला. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स ने आयोजित केलेल्या सभेत विदर्भाच्या प्रगतीच्या दृष्टीने मागे का आहे? यावर त्यांनी जे परखड प्रश्न त्यांनी वैदर्भीयन लोकांना विचारले त्याला तोड नाही.
कमालीचं निरीक्षण, स्पष्ट वक्तेपणा, आणि निर्भीडपणे आपले मत मांडण्याची कुवत माणसांमध्ये निर्माण होते, ती त्याच्यामध्ये असलेली दुसऱ्याविषयीची कणव आणि आपल्या कामाप्रती असलेली सचोटी यातून. तसे त्यांचे प्रत्येकच वाक्य अनमोल आहे .परंतु मानवी जीवनाची अलौकिकता व्यक्त करणारं, मानवाच्या लौकिकाकडून अलौकिक प्रवास सांगणारे हे वाक्य अंगावर शहारे निर्माण करतं.
Learning gives us creativity
Creativity leads to thinking.
*Thinking provides knowledge and knowledge makes you great.
When there is beauty in character, there is harmony in the home.
when there is harmony in the home, there is order in the nation.
when there is order in the nation there is peace in the world.
त्यांची संपूर्ण शरीर यात्रा बघितली तर *केरळ मधील रामेश्वरम येथील जन्म आणि शिलाँग मध्ये शरीर त्याग अर्थात मृत्यू. म्हणजे भारतीय नकाशाच्या अनुषंगाने अगदी पायथ्यापासून जीवनाला सुरुवात करून शीर्षस्थ स्थानी अंत.अर्थात एका मानवी शरीर यात्रेत एका व्यक्तीला काय करता येऊ शकते याचा प्रतिकात्मक बोध म्हणजे डॉ.कलामांचा आयुष्य.
डॉ.कलामांच व्यक्तिमत्व एक आरस्पानी व्यक्तिमत्व होतं .म्हणजेच स्वच्छ, नितळ, सहज म्हणून तर अजातशत्रू. आणि दुसऱ्या अर्थाने म्हणजे आरशासारखं प्रतिबिंब दाखवणारे समोर जो उभा राहील त्याला आपण कसे आहोत ?हे क्षणात कळेल आणि आपल्याला कुठपर्यंत प्रवास करायचा आहे ? हे सैद्धांतिकरीत्या दाखवून देऊ शकणार प्रतिबिंब दाखवणारं. खरंतर या पृथ्वीतलावरचा प्रत्येक मानव म्हणजे निसर्गाचे रुपच प्रत्यक्ष निसर्गच प्रत्येक व्यक्तीतून अंश रूपाने व्यक्त होत असतो. डॉ. कलामांच्या व्यक्तिमत्वातून निसर्गाने स्वतःला किती सुंदर रूपात व्यक्त केल आहे.
हे बा.भ. बोरकरांच्या कवितेच्या ओळीतून व्यक्त केल्या जाऊ शकते.
देखणी ती जीवने ची तृप्तीची तीर्थोदके ।
चांदणे ज्यातून वाहे शुभ्रपाऱ्यासारखे ।।
देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा।
अग्नीचा पेरून जाते रात्रगर्भी वारसा।।