मराठा आरक्षणानंतर आता धनगर समाजही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे. तसेच न्यायालयीन लढा उभा करत अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाची मागणी करत आहेत. धनगर समाजाला देशातील विविध राज्यात आरक्षण मिळत आहे. र आणि ड च्या शाब्दिक फरकामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळत नाही. मात्र, आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत. आमच्या आरक्षणाच्या मागणीचा खटला सरकारनं जलदगती न्यायालयात चालवून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं (ST) आरक्षण लागू करावं अशी मागणी धनगर समाजातीलं काही बांधवांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलतांना केलीय.