दहशतवादी कारवाया कशा थांबवणार? निखील वागळे यांचे विश्लेषण

14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा (Pulwama Attack) येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्यात 42 जवान शहीद झाले होते. हा काळा दिवस (Black Day)आजही अंगावर शहारा आणणारा आहे. या घटनेला चार वर्षे पूर्ण झाले. पण अजूनही या हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर पण अशा प्रकारे होणारे दहशतवादी हल्ले कसे रोखायला हवेत? याविषयी जेष्ठ पत्रकार निखील वागळे (Nilkhil Wagle) यांनी केलेले विश्लेषण मॅक्स महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी पुन्हा प्रसारित करीत आहोत.;

Update: 2023-02-14 02:31 GMT

14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा (Pulwama) येथे जवानांची गाडी उडवून देत दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांबाबत चर्चा सुरु झाल्या. त्यातच दहशतवादी कारवाया कशा रोखायला हव्यात? हा महत्वाचा मुद्दा पुन्हा चर्चेला येतो, असं मत निखील वागळे यांनी व्यक्त केले आहे.

पुलवामा (pulwama Terrorist Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळला. शहीद जवानांच्या कुटुंबीयांचे दुःख, त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी झालेले भावनांचे प्रदर्शन आणि आदरणीय जवानांचे घरं अजूनही मला आठवतात. हल्ल्यानंतर माझ्याप्रमाणे तुम्हालाही चार दिवस शांत झोप लागली नसणार याविषयी माझ्या मनात खात्री आहे.

जवानांचा ताफा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो. त्यावेळेस सुरक्षा व्यवस्था असतानाही जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी तिथपर्यंत कसा पोहोचला? लष्कराला, पोलिसांना, आर्मीला, एवढंच नाही तर कुणालाही त्या आत्मघाती बाँबने उडवून घेणाऱ्या दहशतवाद्याचा अंदाज कसा आला नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे, असं मत निखील वागळे (Nikhil Wagle) यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केले होते.

प्रत्येकाला वाटते की, आपण बदला घेतला पाहिजे. पण मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की, बदल्याच्या भावनांनी सगळं साध्य होईल का? याबरोबरच सगळ्या जगाला माहिती आहे की, दहशतवाद्यांना पाकिस्तान सरकारचा पाठींबा आहे. ISI चा पाठींबा आहे. याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही. भारत सरकारनेही पाकिस्तानवर याबाबत आरोपही केले आहेत. पण या कारवाया थांबवल्या पाहिजेत, यासाठी पाकिस्तानला धडा शिकवणे आवश्यक आहे.

आजही लाखो भारतीयांना 42 जवानांचे चेहेरे आणि शरीराचे तुकडे आठवतात. पण आणखी किती जवानांचा बळी जाणार? हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण सर्व देशाने, सर्व धर्मीयांनी, सर्व जातीच्या लोकांनी, सर्व पंथाच्या लोकांनी एकजूट दाखवली पाहिजे. भारत एक आहे आणि सगळे भारतीय एक आहोत. त्यामुळे फक्त पाकिस्तानचे झेंडे जाळून तुमचे भारतीयत्व सिध्द होणार नाही. तरीसुध्दा संताप व्यक्त करण्याचा हक्क प्रत्येक भारतीय व्यक्तीला आहे. आपल्या घटनेने दिलेल्या हक्कानुसार लोकशाही मार्गाने आपण आपला संताप व्यक्त करू शकतो. पण हे करताना आपल्या भारतीय भावंडांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. 

Tags:    

Similar News