बालविवाह होतोय... तुमची भूमिका काय?

तुमच्या डोळ्यासमोर बालविवाह होतोय... पण कळत नाही काय भूमिका घ्यावी... कशी तक्रार करावी... कोणती यंत्रणा यावर काम करते... आणि कसं काम करते? याची योग्य माहिती नसल्यामुळे असे गुन्हे लोकांच्या डोळ्यासमोर घडत असताना देखील लोकांना बघ्याची भूमिका घ्यावी लागते. तुमच्या बाजूला जर बालविवाह होत असेल तर काय कराल? याविषयी योग्य माहिती जाणून घेण्यासाठी पाहा बालसंरक्षण तज्ज्ञ संतोष शिंदे बालविवाह विरोधात जनजागृती करणारा व्हिडिओ;

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-04-27 03:47 GMT
बालविवाह होतोय... तुमची भूमिका काय?

Social media

  • whatsapp icon

तुमच्या डोळ्यासमोर बालविवाह होतोय... पण कळत नाही काय भूमिका घ्यावी... कशी तक्रार करावी... कोणती यंत्रणा यावर काम करते... आणि कसं काम करते? याची योग्य माहिती नसल्यामुळे असे गुन्हे आपल्या डोळ्यासमोर होत असताना देखील आपल्याला बघ्याची भूमिका घ्यावी लागते. मॅक्समहाराष्ट्रने याविषयी योग्य माहिती जाणून घ्या घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रने बालविवाह विरोधात जनजागृती करण्याचा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.

त्या अंतर्गत बालविवाह भाग 2 मध्ये बालसंरक्षण तज्ज्ञ संतोष शिंदे यांनीा बालविवाह कसा रोखावा? यासंदर्भात माहिती दिली. बालविवाह रोखण्यासाठी सुजाण नागरिक म्हणून तुमची भूमिका काय असावी याचे सखोल विश्लेषण शिंदे यांनी यावेळी केले.

संतोष शिंदे म्हणतात की…2006 चा बालविवाह विरोधातल्या कायद्यात लग्नासाठी मुलीचे वय 18 आणि मुलाचे वय 21 वर्षाच्या आतील असल्यास तो विवाह कायद्याने गुन्हा ठरतो. तसेच मुलीचे आणि मुलाचे आई-वडील आणि नातेवाईक या कायद्यानुसार बालविवाहाच्या शिक्षेस पात्र ठरू शकतात. मात्र, जर त्या बालविवाहाच्या गुन्ह्याची नोंद झाली तरच या लोकांना शिक्षा होते. अन्यथा नाही. आपल्याकडे अशा प्रकारचा गुन्ह्याची नोंद होण्याची प्रक्रिया अतिशय संथ आहे. म्हणून या सगळ्या प्रक्रियेमध्ये यंत्रणांचे समन्वय असणे फार महत्त्वाचे आहे.

यंत्रणांचा समन्वय म्हणजे काय?

आपल्या जिल्ह्यात चाईल्ड हेल्प लाईन 1098, जिल्हा बाल कक्ष, पोलीस यंत्रणा या सगळ्यांचा समन्वय साधून काम करता येत का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रतिबंधात्मक आणि प्रतिसादात्मक या दोन्ही पातळीवर काम होणं आवश्यक आहे.

बालविवाह होत असल्याची माहिती तुम्हाला मिळाली तर काय करावे?

सर्वात प्रथम जिल्ह्यात बालसंरक्षणाच्या यंत्रणा कोणत्या आहेत हे समजून घेतलं पाहिजे.

जिल्हा पातळीवर असलेल्या चाईल्ड हेल्पलाईन 1098 या क्रमांकावर कॉल करणे आणि पोलिसांना बालविवाह होत असल्याची माहिती द्यावी.

पोलीस पाटलांच्या घरात जर बालविवाह होत असेल तर तुमची भूमिका काय असावी?

बालविवाह होत असल्याचे पुरावे कसे शोधावे? लग्नाची संपूर्ण तयारी झालेली असताना म्हणजेच, मंगल कार्यालय, जेवण, डेकॉरेक्शन, वाजंत्री, फोटोग्राफर इ. सगळा खर्च झालेला असताना लग्न थांबवायचं कसं?

बालविवाह कायद्यासंदर्भात समाजात जनजागृती कशी केली पाहिजे? बाल कल्याण समिती नेमकं काय काम करते? बाल कल्याण समिती जिल्ह्याच्या पातळीवर असल्यामुळे पालक पुन्हा मुलीचा बालविवाह करणार नाही असं बंधपत्र पालकांकडून लिहून घेणं सोप्पं असतं. जर पालकांनी या कायद्याचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. पालकांच्या मनात कायद्याविषयी जनजागृती करणं गरजेचं आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्यामुळे मुलींचं संरक्षण करण्यासाठी जिल्हापातळीवर कोण-कोणती यंत्रणा आहे आणि त्याचा उपयोग आपण बालविवाह रोखण्यास कसा करु शकतो? जाणून घेण्यासाठी पाहा बालसंरक्षणतज्ज्ञ संतोष शिंदे यांचे माहितीपूर्वक विश्लेषण .....

Full View
Tags:    

Similar News