शिवसैनिक उतरवण्याची खरंच गरज होती का....?
भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष आता हाणामारीपर्यंत पोहोचला आहे. त्यातच नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर कारवाई करत शिवसेनेने इशारा दिला आहे. पण शिवसैनिकांनी एवढे भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष आता हाणामारीपर्यंत पोहोचला आहे. त्यातच नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर कारवाई करत शिवसेनेने इशारा दिला आहे. पण शिवसैनिकांनी एवढे आक्रमकता दाखवण्याची गरज होती का, असा प्रश्न उपस्थित केला आहे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी.
भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष आता हाणामारीपर्यंत पोहोचला आहे. त्यातच नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर कारवाई करत शिवसेनेने इशारा दिला आहे. पण शिवसैनिकांनी एवढे आक्रमकता दाखवण्याची गरज होती का, असा प्रश्न उपस्थित केला आहे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी.।
१९९५ ला युती सरकार आले तेव्हा रामदास फुटाणे यांनी' कार्यकर्त्यांच्या बैठकीसारखीच कॅबिनेट भरत असते' अशी गंमतीशीर कविता केली होती. शिवसेना संघटनेच्या मानसिकतेतून सरकारच्या मानसिकतेत जात नाही असा तो मुद्दा होता.दुर्दैवाने ते आज सेनेने पुन्हा 'करून दाखवलं...!!!
ज्या काळात सरकार पातळीवर सेनेची पोहोच नव्हती,सरकार गंभीरपणे घेत नसायचे त्याकाळात रस्त्यावर ताकद दाखवून देणे समजण्यासारखे होते पण आज तुमचे मुख्यमंत्री व सरकार असताना, पोलीस तुमच्या हातात असताना शिवसैनिक रस्त्यावर आणून प्रदर्शन करण्याची गरज नेमकी काय होती ?
मातोश्री परिसरात विशिष्ट कलम लावून प्रवेशबंदी करून त्यांना पोलिसांनी रोखणे शक्य होते.त्यात ते इतके मोठे झाले नसते व महाराष्ट्रात जणू अनागोंदी झालीय अशी प्रतिमा ही निर्माण झाली नसती...दोन व्यक्तींना रोखायला इतकी शक्ती लावण्याची खरेच गरज होती का..?
सेनेच्या शीर्ष नेतृत्वाला निष्ठावान शिवसैनिकांचे दर्शन का घडवावेसे वाटते आहे ? शरद पवारांच्या घरावर असे घडल्यावर त्यांना तर राज्यभरातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर आणणे शक्य होते पण तसे न करता त्यांनी लगेच कायदेशीर मार्ग अवलंबला..
सेनेला राणा दाम्पत्य रोखणे पोलिसांकडून अगदी सहज शक्य असूनही हा गर्दीचा मोह का टाळता आला नाही...??
राणा दाम्पत्याला गमावण्यासारखे काहीच नव्हते.ते उलट देशभर पोहोचले. तुम्ही काहीही केले तरी ते फोकस होणार आहेत व ते तुमचे स्पर्धक ही नाहीत, त्यांची शक्ती मतदारसंघाबाहेर नसताना त्यांना दुर्लक्ष करून पुढे जायला पाहीजे होते
ग्रामीण भागात एक म्हण आहे की रात्री तुमच्या दाराबाहेर दारुडा शिव्या देत असेल तर गुपचूप घरात जा, त्याला काही बोललात तर तो रात्रभर दार वाजवून झोप खराब करील..यात मुद्दा असा की फार शक्ती नसलेल्या व्यक्तींना ओलांडून पुढे जाता आले पाहिजे पण मंत्री तिथे येऊन गर्दीचे नेतृत्व करतात,स्वतः मुख्यमंत्री त्यात लक्ष घालतात...
यात उद्धव ठाकरे यांना शिवसैनिक अजूनही किती कडवा व मातोश्री शी किती एकनिष्ठ भक्तीने जोडला आहे हे दाखवता आले पण अनागोंदी माजल्याचा प्रचार करण्याची संधी विरोधकांना व माध्यमांना दिली
सरकार व पोलीस हाताशी असताना पक्षाचे लोक कशाला उतरवले याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे....