हळद पिकाच्या भरपूर उत्पादन मुळे बालेश्वरच्या आयुष्यात आला आनंद

आज १ जुलै कै. वसंतराव नाईक यांची जयंती. राजस्थान मधील बालेश्वर नावाच्या शेतकऱ्याने हळद पिकाच्या माध्यमातून आयुष्यात आनंद निर्माण केला त्याची यशोगाथा सांगताहेत अभ्यासक विकास मेश्राम...

Update: 2021-07-01 00:30 GMT

अत्यंत कमी खर्चात आणि शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केल्यास हळद पिकामधून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. हळदीचा वापर औषधी उद्देशाने हजारो वर्षांपासून केला जात आहे. त्यात कर्क्यूमिन हा घटक असतो. ज्यामुळे हळदीचा पिवळा रंग होतो. हे अल्सर, पोट संबंधित समस्यांच्या उपचारांसाठी वापरले जाते. याशिवाय हळद घरातील प्रत्येकजण आहारात वापरतो. म्हणून, हळदेला मागणी असते . हळदीचे जागल्या प्रकारे उत्पादन घेवून शेतकरी आपले जीवनमान उंचावू शकतात.

गाव धनेवा बडा (तह.-आनंदपुरी जिल्हा. बासवाडा) राजस्थान मधील बालेश्वर नथुजी तबीयार आदिवासी प्रवर्गातील शेतकरी.आपल्या 5 बीघा सिंचनाखालील शेतीमध्ये हे शेतकरी खरीपातील मुख्य मका, उडीद या पिकांमध्ये रब्बी-खरीप हंगामात विविध पिके घेतात. , तीळ आणि पाथरिया तांदूळ आणि रब्बीमध्ये मुख्य पिके हरभरा, गहू आहेत. त्याच्याकडे चार म्हशी, दोन बैल आणि पाच शेळ्या आहेत.या जनावराच्या शेणाचा ऊपयोग बालेश्वर आपल्या शेतात सेन्द्रींय शेती करतात.


बालेश्वर जी सांगतात की , या पारंपारिक शेती पध्दती शिवाय आपल्या शेतात प्रायोगिक शेती करण्याचा हेतू माझ्या मनात बराच काळ होता. परंतु योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे ते करणे शक्य होत नव्हते . वाघधाराचे समन्वयक मानसिंह निनामा जेव्हा संस्थेचे कार्यक्रम अधिकारी गोपाल सुथार यांच्या संपर्कात आले तेव्हा त्यांनी मला वाघधाराची खरी शेती, सेंद्रिय शेती म्हणजे काय आणि फायदेशीर कसे होऊ शकते आणि आजच्या युगात सेंद्रिय शेती किती महत्त्वाची आहे याबद्दल सांगितले. आणि मला खरी शेती सेन्द्रींय शेती करण्यास प्रेरित केले.


त्याअंतर्गत, वाघधाराने माझ्या शेतात हळद उत्पादन करण्यासाठी मला 10 किलो हळद बियाणे दिले, मी अर्धा बीघा क्षेत्रात लागवड केली आणि माझ्याकडे असलेल्या पशुधनातील 1000 किलो शेण खतासाठी, हे मी हळदी च्या शेतात टाकले यासाठी मला तांत्रिक मार्गदर्शन . वाघधारा कृषी तज्ज्ञ पटेल यांनी दिली मी जुलैच्या पहिल्या आठवड्यात हळद पेरली 2021 आणि मे 2021 महिन्यात त्याची कापणी केली. अर्धा बीघा जमिनीत मी दहा किलो हळदपासून 5 क्विंटल हळद उत्पादन झाले . त्यात मी 4 रुपये क्विंटल हळद 100 रुपये किलो दराने विकून मी 40000 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवले. 70 किलोग्राम हळद पावडर बनवून ती 400 किलो दराने विकली, आणि मला 28000 रुपये मिळाले आणि 30 किलो माझ्या घरात मी खाण्यासाठी आणि पुढील हंगामात लावण्यासाठी ठेवले पिकासाठी ठेवले. मला हळदीच्या विक्रीसाठी कुठेही जाण्याची गरज भासली नाही , मी सोशल मीडियाचा योग्य वापर केला आणि व्हॉट्सअॅप ग्रुप व फेसबुकवरून जाहिरात करून संपूर्ण हळद विकली. त्याचप्रमाणे एकूण 68000 रुपये उत्पन्न मिळवून मी नफा कमावला आणि मला हळदीसाठी बाजारपेठेवर अवलंबून रहावे लागले नाही. २००९ मध्ये मला २० सागवान वागधारा ने दिली होती . जे आता झाडे बनले आहेत आणि त्यांचे बाजार मूल्य 35000 रुपयांपर्यंत आहे.





वाघधाराने मला भाजीपाला बियाणे किट केवळ माझ्या उदरनिर्वाहासाठीच नव्हे तर पोषण बागेत माझ्या कुटूंबाच्या आरोग्यासाठी पुरविली.परिवारातील पौष्टिक पातळी वाढविली. सेंद्रिय शेतीच्या दिशेने प्रेरित होऊन माझे जीवनमान वाढविण्यास मदत केल्याबद्दल मी वाघधारा संस्थेचे आभारी आहे.

विकास मेश्राम

वागधारा संस्था कुपडा

जिला बासवाडा

राजस्थान

vikasmeshram04@gmail.com

Tags:    

Similar News