"अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भारतीयांची सोशल मीडियावरील अभिव्यक्ती "
अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्या मार्गारेट मॅकडिओल या अस्खलित हिंदी बोलल्या खऱ्या. पण त्यांच्या व्हिडीओवर आलेल्या कॉमेंट्स भारतीयांची मानसिकता दर्शवणारी असल्याचं स्पष्ट झालं. पण नेमकी ही मानसिकता एवढी बिभत्सतेकडे का जाते? याविषयी मानसशास्राचे अभ्यासक प्रा. राजरत्न खिल्लारे यांनी विश्लेषण केले आहे.;
अमेरिकन स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्ता मार्गारेट यांचा अलिकडच्या काळात भारत सरकार व अमेरिकन प्रशासनामधे झालेल्या आंतरराष्ट्रीय करारांसंदर्भात भाष्य करणारा व्हिडिओ ट्विटर हँडलवर व्हायरल झाला. मार्गारेट यांनी भारतीय राष्ट्रभाषा हिंदी आत्मसात केलेली आहे व चांगल्या अस्सखलीतपणे त्या ही भाषा भारतीय न्यूज मिडियासमोर बोलताना वापरतात. व्हिडिओमधील विषय पाहता त्यात रोजगारसंधी, व्यवसायसंधी / परदेशात शिक्षण, स्टुडंट मोबिलीटी, नॉलेड अँड टेक्नोलॉजी एक्सचेंज या विषयांवर भारतीय बेरोजगारांच्या भवितव्यासाठी खरोखर आशादायक चित्र उभे राहताना दिसते. परंतु या व्हिडिओवरील भारतीयांच्या काँमेंट्स बघून मात्र भ्रमनिरास होतो. सध्या भारतीय तरूणाई (यात रोजगारधारक व बेरोजगार दोन्हीही आले) सोशल मीडियावर व्यक्त होताना सुसंस्कृतपणाचे कोणतेही अभिनिवेश पाळत नाहीत. हेच स्पष्ट करणाऱ्या या टुकार कॉमेंट्स असतात. आपलं व्यक्त होणं हे व्हर्च्यूअल असलं तरी ते सार्वजनिक आहे व आपली ओळख वजा लायकी इंटरनेटद्वारे जगासमोर आणनारं आहे. हे कॉमेंट्सकर्ते लक्षात घेत नाहीत. यामागील मानसिकतेची कारण शोधली तर लक्षात येते की, एकाबाजूला बरेच लोक फेक अकाऊंट वरून कॉमेंट्स पास करतात किंवा समोरासमोर व्यक्त होण्यापेक्षा व्हर्च्यूअल लेव्हलला व्यक्त होणं. त्यांना अधिक सुरक्षित वाटत.
सध्याच्या काळात यूट्युब नेटफ्लिक्स / ओटीटी मीडिया व तत्सम विविध प्रसार माध्यमांवर बिभित्स अश्लील वेबसिरीज तरूणांकडून बघितल्या जातात. अशा वेबसिरीज अतिप्रमाणात बघण्याचा प्रभाव विचारसरणीवर व त्याद्वारे सोशल मिडियावर व्यक्त होण्यावर पडत असतो.
या बिभित्स व अश्लिल वेबसिरीज बघणा-यांकडून विनयभंग /छेड-छाड लैंगिक गुन्हे घडण्याचे प्रमाण पोलीस स्टेशनमधील गुन्हेनोंदीवरून वाढलेले लक्षात येते. परंतु या वेबसिरीजचा एक दर्शकवर्ग मात्र असा आहे की, जो अशा गुन्ह्यांना करू धजावत नाही व म्हणून व्यक्त होण्यातून व कॉमेंट्सद्वारे "Mild Cyber Crime" करणे सुरक्षित समजतो.