फ्लू च्या लसीमुळे कोरोनापासून संरक्षण मिळते का?

कोरोना आजाराबाबत निश्चित असं कोणतही निदान नाही. त्यामुळं गाव खेड्यातील डॉक्टरांसह सर्वसामान्य जनतेला देखील अनेक प्रश्न पडत असतात. या प्रश्नांचं साथरोग तज्ज्ञ डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) यांनी दिलेलं उत्तर;

Update: 2021-05-29 12:21 GMT

IAP या बालरोग तज्ञांच्या संघटनेने लहान मुलांना फ्लूची लस देण्याबाबत सूचना दिली आणि बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न आला. काही जनरल प्रॅक्टीशनर्सनी देखील हा प्रश्न विचारला होता. फ्लूची लस कोरोनापासून संरक्षण देत नाही. मग तरी देखील ही सुचना का बरे दिली असेल?

१. जागतिक आरोग्य संघटना व सीडीसी यांनी कोविडकाळामध्ये फ्लूचे लसीकरण करण्याबाबत सूचना दिली आहे. (लिंक - https://tinyurl.com/ydueudea ). मात्र, यामुळे कोविडपासून संरक्षण मिळत नाही हे स्पष्ट केले आहे.

२. मात्र फेब्रुवारी २१ मध्ये AJMC या जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनामध्ये फ्लू ची लस घेतलेल्या व्यक्तीमध्ये गंभीर कोविड चे प्रमाण थोडेसे कमी आढळले असे निरीक्षण नोंदवले आहे. (लिंक - https://tinyurl.com/yguop2p2 )

३. याबाबत खात्रीशीरपणे काही सांगता येणार नाही. कारण लस घेणाऱ्या व्यक्ती अधिक काळजीपूर्वक वागणाऱ्या असू शकतात. मात्र, यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे.

(लिंक - https://tinyurl.com/yzk5frng )

४. सोबतच्या फोटोमध्ये भारतातील फ्लूच्या स्थितीबाबत माहिती आहे . पावसाळा व हिवाळ्यामध्ये फ्लू च्या बऱ्याच केसेस असतात.

५. त्यामुळे बाळाने जर फ्लू ची लस घेतलेली असेल तर बाळाला फ्लू पासून सुरक्षा मिळेल. तसेच कोविड आणि फ्लू असे एकत्रित संसर्ग होणार नाहीत. त्याचप्रमाणे जेव्हा एखादे कोविड सदृश्य लक्षण सुरु होईल. त्यावेळी ते फ्लू असण्याची शक्यता कमी असल्याने कालापव्यय न होता लवकर निदान, तपासणी व उपचार करणे शक्य होईल. आणि वरील संशोधन योग्य असल्यास गंभीर आजारापासून काहीसे संरक्षण मिळेल.

६. मात्र, कोरोना अनुरूप वर्तन हे सर्वाधिक सुरक्षा देऊ शकते आणि लसीकरणानंतरही नियम पाळायचेच आहेत. फ्लूची लस उपलब्ध असल्यास घेण्यास हरकत नाही. कोविडची लस घेतली असल्यास फ्लूची लस घेण्याची आवश्यकता नाही.



 


डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. साथरोग तज्ज्ञ, मिरज...

Tags:    

Similar News