आपणही सामाजीक दोषी
दर्शना पवार असेल की सरस्वती वैद्य या दोन्हीही हत्या प्रकरणात सोशल मिडीयावर रंगणाऱ्या चर्चा या त्या हत्येपेक्षाही जास्त भयानक आहेत. अनेक प्रश्नचिन्ह सोशल मिडीयात कमेन्टमध्ये उपस्थित केले जातं असले तरी या हत्ये इतकेच सामाजाचे दोषी आपण कसे आहोत याचा उहापोह करणारा मॅक्सवुमन च्या संपादिका प्रियदर्शिनी हिंगे यांचा हा लेख
दर्शना पवारच्या निमित्ताने पुन्हा महिला सुरक्षेचा प्रश्न चर्चेला आला. मात्र हा प्रश्न चर्चेला येताना असांच येतं नाही.तो पुरुषसत्ताकतेच्या वाटेनेच येतो. Mpsc पास झालेली पोरगी जी कधीतरी शिक्षण नी त्याबरोबर आपल्या जीवनातल्या ध्येयाचे स्वप्न रंगवत होती ती चा जगातूनच नष्ट केलं जात. या संबंधीत संशयीत म्हणुन मित्राता ताब्यात जरी घेतलं गेलेलं असंल तरी खुन त्यानेच केला की नाही हे चौकशी नंतरच सिध्द होणार आहे. मात्र त्या आधीच त्याला फाशी इ मागण्या समोर येत आहेत. सोशल मिडीयावर तर सांगायलाच नको इतक्या चर्चा रंगत आहेत. जी गेली ती च्या चारित्र्यावर संशय घेतला जातोय का तर एकट्याने त्या पुरुषा सोबतच जायचं का? असाच नी हाच प्रश्न उपस्थित केला गेला होता दिल्ली च्या निर्भया केस बद्दल तीने इतक्या रात्री मित्रा सोबत का जावं? किंवा तीने मित्रा सोबत चाळे केले म्हणुनच त्या मुलांची भुक चाळवली. किती सहजच हे प्रश्न उपस्थित केले जातात. बाई ने काय बोलाव कसं बोलाव कोणाशी बोलावं नी कुठल्या वेळेला बोलावं ? हे सगळंच आपण ठरवुन ठेवलेल आहे. त्याला कुठेही धक्का लागला तर आपण हेच प्रश्न पुन्हा उपस्थित करतो पुण्यातील नयना पुजारी हत्याकांडातही सुरवातीला हाच प्रश्न उपस्थित केला गेला.मात्र तपासा नंतर भिषण सत्य समोर आले त्या दरम्याना तीच्या परिवाराला काय सोसावं लागलं याची कल्पनाच बरी.
दर्शनाला आपण कोणीही फारस जवळून न ओळखणारे सहज शेरे मारुन जातो मात्र त्याचा परिणाम हा पुढच्या पिढीवरही पडतो हे सबशेल विसरतो. कोणाला स्विकारव कोणाला नाकाराव हा अधीक्षक त्या त्या व्यक्तींचा असतो. व्हिटीम नक्की कोण हे माहिती असुनही किंवा अर्धवट माहिती असुनही आपण त्यावर वाटेल ते बोलत सुटतो. हा आपल्यात भिनलेल्या पुरुषसत्ताकतेचा परिणाम आहे.
त्या आधी घडलेली सरस्वती सोबतची घटना इतकी क्रुर होती की आपण त्या बातमीने ही हादरलो. सहज सावज गाठाव तसं तुमच्या अगदी जवळच्या माणसाने घात करावा तशीच ती घटना. सरस्वतीच्या सहचार्याला किती सहज ती चा काटा काढता आला कारण ही मुलगी एकटी होती. कुटुंब नावाची संस्था त्या अर्थाने तिच्या मागे नसल्याने आपण केलेले कृत्य सहज पचवु हा विश्वास त्या माणसाला होता. हि पराकोटीची हिंसा जरी असली तरी माणसाची विचार करायची पध्दत या निमित्ताने समोर येते. गावाकडे सहज म्हणुन बाहेर पडणारी मुलगी सोबत म्हणुन लहान भावाला घेवुन जाते. ती जात नसेल तीच्या सोबत कोणी तरी पाठवले जाते. शक्तीने मनाने ती क्षीण असल्याचा हा विचार आपल्याला समोर येतांना दिसतो तोच विचार या खुन्याच्या मनातही आपल्याला दिसतो. ती ‘एकटी’ आहे मग हव तसं वापरा नी सोडून द्या अगदी जनावर काय तर वस्तु प्रमाणेच. अधिकार तर सोडाच पन किमान माणुस म्हणुनही तिला वागवलं जातं नाही. ति ‘ एकटी’ असली की काय होतं? किंवा काय होवु शकतं? याची उदाहरण म्हणजे या दोन घटना सांगता येतील. मग तु एकटी असली की असाच त्रास तुला होईल किंवा होतो असं सांगुन किंवा तशी परस्पर भिती दाखवून महिलांनाच कुटुंबात ठेवलं जातं.कुटुंबातही फार काही सुरक्षीत नसली तरी ती किती सुरक्षीत आहे असंच भासवलं जातं. युनिसेफ च्या एका अहवालानुसार दहा पैकी दर तीसरं मुलं हे लैंगिक शोषणाला बळी असं असेल तर कुटुंबातील सुरक्षीतता किती फोल आहे हे यावरुन लक्षात येतं मात्र याबाबत कुठेही बोलं जातं नाही. त्यामुळे एकट्या मुली असुरक्षीत असतात हे जस साफ चुकल आहे तसंच सहज एकटेपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे ही ही चुकचं आहे. एकट्या मित्रा बरोबर का गेल्या? एकटी का रहाते? एकट्याने कुठेही जावु नकोस! हे सांगतांना किंवा प्रश्न उपस्थित करतांना या मुलींना आपण वस्तुच समजण्याची चुक करतोय हे लक्षात घ्यायला हवे, या मुलीचे मारेकरे जसे दोषी आहेत तसेच शेरे मारणारे हे देखील सामाजीक दोषी आहेत हे आपण विसरतां कामा नये.
प्रियदर्शिनी हिंगे