८० च्या दशकात दलित पँथर संघटनेने महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. या संघटनेला आता ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त नांदेडमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात दलित पँथर संघटनेचे संस्थापक सदस्य ज.वि.पवार यांनी आंबेडकरी समाजातील नेते आणि कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले. बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घ्या, या शब्दात त्यांनी सुनावले....बाबासाहेबांच्या समाजातील लोक विकले जातात याची खंत वाटते, अशीही नाराजी त्यांनी व्यक्त केली.