कोरोना प्रमाणे बेरोजगारीची चर्चा का नाही?

कोरोना ने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र, कोरोनाबरोबरच बेरोजगाराची चर्चा का होत नाही? काय आहे जगभरातील कामगारांची स्थिती? वाचा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचा लेख

Update: 2020-10-27 05:34 GMT

कोरोनाची सुरुवात झाली. त्यावेळी सर्वच राष्ट्रात बेरोजगारी अचानक वाढली; पण त्याचे प्रमाण मात्र, भिन्न भिन्न होते. अमेरिकेत ते चार पटीने वाढून १५ % झाले. जपानमध्ये ते फक्त २.५ % राहिले. दोन्ही राष्ट्रे स्वतःला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणवतात; मग हा फरक का ?

कारण दोघांच्या भांडवलशाहीची जातकुळी भिन्न आहे. अमेरिका नागडी भांडवलशाही आहे. तर जपानची कमरेला काहीतरी बांधून असते.

अमेरिकेतील एम्प्लॉयर जेव्हढा नफा होईल तो ओरबाडून घेतात; खूप तोटा व्हायला लागला की नोकरांना / कामगारांना कामावरून काढून टाकतात.

जपानमधील एम्प्लॉयर ज्यावेळी बऱ्यापैकी नफा होईल. त्यावेळी तो बॅलन्स शीट मध्येच ठेवतात. घरी घेऊन जात नाहीत; आणि ज्यावेळी खूप तोटा होईल. त्यावेळी तो संचित नफा नोकरांना / कामगारांना पगार देण्यासाठी वापरतात.

वाचकांनो तुम्हीच विचार करा; आपल्याकडे एम्प्लॉयर जपानचे मॉडेल का राबवत नाहीत ?

Tags:    

Similar News