Bhagat Singh Death Anniversary: शहीद दिन, जाणून घ्या, भगत सिंह यांच्या बद्दलच्या 5 गोष्टी
आज शहीद दिवस, क्रांतीवीर भक्त सिंह यांचा स्मृतीदिन. आजच्या दिवशीच त्यांना फाशी देण्यात आली होती.;
भगत सिंह यांचा जन्म 28 सप्टेंबर, 1907 ला पंजाब प्रांतांतील लायलपुर जिल्ह्यातील बंगा गावात एका शीख कुटुंबात झाला. ( आता पाकिस्तान)
भगतसिंग यांच्या पूर्वजांचा जन्म पंजाबमधील नवांशहरजवळील खटकडकला गावात झाला. त्यामुळे खटकडकला हे त्यांचे मूळ गाव. भगत सिंह यांचे आजोबा सरदार अर्जुन सिंग हे पहिले शीख होते. ज्यांनी आर्य समाजाचा स्वीकार केला. त्यांचे तीन मुल होती - किशन सिंग, अजित सिंग आणि स्वरण सिंग हे तीनही स्वातंत्र्यसैनिक होते.
13 एप्रिल 1919 ला झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा भगतसिंह यांच्यावर खोलवर परिणाम झाला आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा निश्चय केला. भगत सिंह जीवनात क्रांतिकारी बदल होण्याचं प्रमुख कारण म्हणजे 1921 मध्ये त्यांनी लाहोरमधील 'नर्सरी ऑफ पॅट्रियट्स' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॅशनल कॉलेजमध्ये घेतलेला प्रवेश. हे कॉलेज लाला लजपत राय यांनी सुरू केले होते. या महाविद्यालयात शिक्षण घेत असताना भगत सिंह यांनी राणा प्रताप, सम्राट चंद्रगुप्त यांच्या नाटकात अभिनेता म्हणून काम केले. याचा त्यांच्या विचारावर मोठा परिणाम झाला.
आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या घरच्यांनी त्यांचं लग्न ठरवलं होतं. मात्र, भगत सिंह यांना लग्न करायचे नव्हते म्हणून ते घर सोडून कानपूरला पळून गेले. जाताना त्यांनी लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, "देशाला स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. म्हणूनच कोणतीही सांसारिक इच्छा किंवा सुख त्यांना आता आकर्षित करू शकत नाही." मात्र, शहीद-ए-आझम यांचं लग्न झालं, मात्र, ते कसं? भगत सिंह शहीद झाल्यानंतर त्यांचे घनिष्ठ मित्र भगवती चरण वोहरा यांच्या पत्नी दुर्गा भाभी, सांगतात… त्या स्वतः ही क्रांतीकारक होत्या…
''फांसी का तख्ता उसका मंडप बना, फांसी का फंदा उसकी वरमाला और मौत उसकी दुल्हन।''
स्वातंत्र्यसैनिक म्हणून भगतसिंग यांचे योगदानही मोठे होते. 8 एप्रिल 1929 रोजी अटक होण्यापूर्वी त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील प्रत्येक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. गांधीजींनी 1920 मध्ये असहकार चळवळ सुरू केली तेव्हा भगतसिंह अवघ्या 13 वर्षांचे होते. 1929 मध्ये त्यांना अटक झाली तेव्हा ते 22 वर्षांचे होते. या 9 वर्षात त्यांनी स्वातंत्र्यसैनिक म्हणून केलेले कार्य आजही सर्वांच्या स्मरणात आहे.
लाहोर कटात राजगुरू आणि सुखदेव यांच्यासह भगतसिंह यांना फाशी देण्यात आली. 24 मे 1931 ला फाशीची तारीख निश्चित करण्यात आली. मात्र 23 मार्च 1931 ला त्यांना फाशी देण्यात आली.
फाशी वर जाताना त्यांचे आवडते गीत त्यांच्या ओठावर होते…
कभी वो दिन भी आएगा
कि जब आज़ाद हम होंगें
ये अपनी ही ज़मीं होगी
ये अपना आसमाँ होगा.
शहीद भगत सिंह यांनी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण झालं.