कमी क्षेत्रात, कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकरी रासायनिक खते तसेच कीटकनाशकांचा वापर करतात. यामुळे कर्करोगासारख्या आजारांचे प्रमाण वाढून मानवी जीवनालाच धोका निर्माण झाला आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या गोष्टींचा विचार करतावेळीच सावध होण्याचा इशारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे पर्यावरण विभाग प्रमुख प्रा. विनायक धुळप यांनी दिला आहे..