बँकिंग आणि वित्त व्यवहारात डिजिटल चा वापर हिताचा: संजीव चांदोरकर
बँकिंग आणि वित्त व्यवहारात डिजिटल चा वापर राष्ट्राच्या आणि कोट्यवधी गरीब नागरिकांच्या हिताचा असून केंद्र आणि राज्य सरकारांनी लोककल्याणासाठी अर्थसंकल्पीय तरतुदी कराव्यात हि मागणी लावून धरलीच पाहिजे, असे अर्थविषयक विश्लेषक संजीव चांदोरकर यांनी म्हटलं आहे.;
पण या लोककल्याणाच्या योजना प्रत्यक्षात गरीब लाभार्थ्यांपर्यंत पोचतात कि नाही याबद्दल हि मागणी करणारे आपण फारसे बोलत नाही ; अनेक कारणे आपल्याला माहित आहेत , उपाययोजना सहजसाध्य नाहीत हे देखील अनेक दशकांच्या अनुभवावरून मान्य केले पाहिजे
मनरेगा वरील वेतन , खत आणि गॅस सबसिडी, स्वस्त धान्य , मुलांच्या स्कॉलरशिप्स दिल्या जातात , त्या तुटपुंज्या आहेत हे कारण आहेत त्या पोचवायचा कशा याच्यावर विचार न करण्यासाठी पुरेसे नाही परंपरागत पद्धतीने या योजना राबवताना तीन गोष्टी घडतात
अमलबजावणी मध्ये प्रचंड भ्रष्टाचार ; गरिबांना कागदपत्रांवरून नडणे, रेकॉर्डमध्ये खाडाखोड , लाच मागणे इत्यादी योजनेची तरतूद १०० रुपये असेल तर ती राबवणाऱ्या यंत्रणेवर , कर्मचाऱ्यांच्या पगारावर अर्धा खर्च; ज्यांच्यासाठी योजना बनवली त्यांना त्यातील ५० रुपये
गरिबांना बँकिंगची सवय लागण्यात अडथळा येतो, मिळालेले पैसे बँकेत जमा करायचे म्हटले तर बँक शाखेपर्यंत पोचणे , रोजगार बुडणे हे खूप खर्चिक ठरते.जनधन, आधार कार्ड आणि मोबाईल चा (JAM) वापर करून अमलात येणारी डायरेक्ट बेनेफिट ट्रान्स्फर योजना राबवली जात आहे.
त्यातून केंद्र सरकारचे बरेच पैसे वाचत आहेत ; ज्याचे स्वागत केले पाहिजे.एकंदरच स्मार्टफोन चा वापर करून डिजिटल बँकिंग आणि वित्त व्यवहार करणे गरिबांच्या हिताचे ठरणार आहे ; सध्या कनेक्टिव्हीटी वगैरेचे प्रश्न आहेत पण येत्या काळात ते दूर होतील.