भारतीय उद्योगपतीनं खरेदी केलं जगातलं सर्वात महागड घर

भारतीय वंशाचे उद्योगपती पंकज ओसवाल आणि त्यांची पत्नी राधिका ओसवाल यांनी जगातील सर्वात महागड घर स्वित्झर्लंडमध्ये खरेदी केलंय. तब्बल १ हजार ६४९ कोटी रूपयांना ओसवाल यांनी हे घर खरेदी केलंय.;

Update: 2023-06-29 09:40 GMT

स्वित्झर्लंडमधील ( Switzerland ) जिनिव्हा ( Geneva ) शहराजवळच्या गिंगिंस गावात विला वारी नावाचा हा बंगला आहे. ४ लाक ३ हजार स्क्वेअर फूटांमध्ये हा बंगला विस्तारलेला आहे. २०० मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे १ हजार ६४९ कोटी रूपयांना ओसवाल यांनी हा बंगला विकत घेतलाय. जगातील सर्वात महागड्या १० घरांमध्ये या बंगल्याचा समावेश होतो. हा बंगला ग्रीक शिपिंग कंपनीचे मालक एरिस्टॉटल ओनॅसिस यांची मुलगी ख्रिस्तियाना हिने विकत घेतला होता. त्यांच्याकडून हा बंगला विकत घेतल्यानंतर ओसवाल कुटुंबियांनी त्यामध्ये अनेक सुधारण केल्या आहेत. प्रसिद्ध इंटेरिअर डिझाइनर जेफ्री विल्किस ही सध्या या बंगल्याचं सुशोभिकरण करत आहे. जेफ्री ही अशाच पुरातन आणि प्रसिद्ध वास्तूंचं इंटेरिअर करण्यासाठी ओळखली जाते.

ओसवाल कुटुंब ( Oswal Family )

ओसवाल ग्रीनटेक आणि ओसवाल एग्रो मिल्स चे संस्थापक, प्रसिद्ध उद्योगपती अभयकुमार ओसवाल यांचे चिरंजीव आहेत पंकज. अभयकुमार यांचं २०१६ मध्ये निधन झालं होतं. ओसवाल ग्रुप ग्लोबल चे प्रमुख पंकज यांनी आपला व्यवसाय पेट्रोकेमिकल्स, रिअल इस्टेट, फर्टिलायझर्स आणि गौण-खनिज या क्षेत्रात विस्तारीत केलाय. पंकज हे भारतातच लहानाचे मोठे झाले. त्यांनी मणिपाल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून शिक्षण पूर्ण केलं. पंकज यांनी राधिका यांच्याशी लग्न केलं असून त्यांना दोन मुली आहेत. २०१३ मध्ये ओसवाल कुटुंबिय ऑस्ट्रेलियातून स्वित्झर्लंडला स्थलांतरित झाले.


विला वारी हे नाव ओसवाल यांच्या दोन्ही मुलींच्या नावावरून ठेवण्यात आलंय. त्यांची मोठी मुलगी वसुंधरा (वय २४) ही प्रो इंडस्ट्रिज पीटीई लि. या कंपनीत कार्यकारी संचालक असून एक्सिस मिनरल्स मध्ये महासंचालक म्हणून कार्यरत आहे. तर छोटी मुलगी रिधी (वय १९) सध्या लंडनमध्ये केमिकल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतेय. रिधी ही इंस्टाग्राम वर सक्रिय आहे. तिनंही या विला वारी चे फोटो इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत. तीन वर्षे या बंगल्याचं काम झाल्यानंतर ओसवाल कुटुंब इथं राहण्यासाठी आलं.

आपल्या गरजेनुसार ओसवाल कुटुंबियांनी या बंगल्यात अनेक सुधारणा केल्या आहेत. भारताबाहेर भारतीय संस्कृती, खानपान यापासून काहीसं वंचित राहावं लागतं. त्यामुळं भारताबाहेर छोटासा भारत निर्माण करण्याचं आमच्या कुटुंबाच स्वप्न होतं, ते यानिमित्तानं पूर्ण झाल्याचं रिधीनं इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलंय.

Tags:    

Similar News