`ध` चा `मा` करत खोटारडा प्रचार: राहुल बोरसे
देशात महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्नाने सर्वसामान्य माणुस भरडला जात असताना समाजमनात धार्मिक मुद्द्यांवर वाद निर्माण करुन डायव्हर्जन सुरु आहे. उच्चवर्णिय व्यवस्था यापध्दतीचे नॅरेटिव का सेट करतेयं का? याचा वेध घेतला आहे... आतरराष्ट्रीय संगणक अभियंते राहूल बोरसे यांनी....;
मीडियात बसलेले ब्राम्हण हे ध चा मा करत खोटारडा प्रचार कसा सुरु करतात हे अमोल मिटकरींच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसतंय. अमोल मिटकरींनी ब्राम्हण कसे फसवत असतात याचं उदाहरण दिलं तर ब्राम्हणांनी लगेच त्यांनी हनुमान चालीसाची खिल्ली उडवली असा प्रचार सुरू केलाय. इतकंच काय ब्राह्मणांवर केलेल्या टीकेला त्यांनी सरळ हिंदूंवर टीका असं म्हणत कुठच्या कुठे संबंध जोडलेय. महत्वाचं म्हणजे भट बामन कधीच स्वतःला स्वार्थाशिवाय सामान्य हिंदूंशी जोडून घेत नाहीत. त्याउलट भट बामन पूजेच्या नावावर लोकांना कसे लुबाडतात याची अनेक उदाहरणे आपण रोजच्याच जीवनात बघत असतो.
काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर येथे दक्षिणेसाठी ब्राम्हणांनी जे खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांची आईमाई काढली तसेच त्रंबकेश्वर येथीलच एका ब्राम्हणाने यजमानाच्या घराच्या स्त्रीवर केलेला बलात्काराचा केलेला प्रयत्न पाहता देव तरी त्यांच्या पूजेला पावत असेल असं वाटत नाही. आधीच्या काळापासून धर्म आणि मंदिरे ही ब्राह्मणांसाठी केवळ पैसे कमावण्याची साधने राहिलेली आहेत. त्यामुळे त्यांनी कधीही इतर हिंदूंना धर्माचे आणि मंदिराचे अधिकार दिलेले नाहीत. जेणेकरून लोकांच्या पैशांवर डल्ला मारण्याचे काम बिनधोकपणे सुरू राहील.
देवींच्या मंदिरांमध्ये पूर्वी गुरव असायचे. आता तिथेही ब्राम्हणांनी घुसखोरी सुरू केलेली आहे. इतकंच काय अनेक संतांच्या मंदिरांमध्ये ब्राम्हण पुजारी नसत. तिथे गोसावी पुजारी असण्याची परंपरा होती. पण तिथेही ब्राम्हण पुजाऱ्यांनी घुसखोरी सुरू केलेली आहे. आळंदीला संत ज्ञानेश्वरांच्या समाधीची होणारी झीज पाहून तेथील व्यवस्थापनाने समाधीवर चालणाऱ्या पूजा समाधीच्या बाहेर करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याला विरोध दर्शवत आळंदी येथील ब्राम्हणांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या पूजेवरच बहिष्कार टाकला होता. कारण दक्षिणा बुडत होती. पण व्यवस्थापनाने दुसरे बामन आणून पूजा करवून घेतली तेव्हा आपला धंदा बुडेल या भीतीने तात्पुरत्या स्वरूपात पूजा सुरू करण्यात आल्या.
खरंतर संत ज्ञानेश्वरांच्या मंदिरात निष्ठावान वारकरी घरातील बाई माणूस पूजेला असायला हवा. तसा प्रश्न मी व्यवस्थापनाला विचारला होताही. व्यवस्थापनही त्यासाठी जर कुणी पुढे आले तर विचार करू असं म्हणाले होते. पण वारकऱ्यांच्या नावावर दुकानदारी उघडलेले त्यासाठी तयार नसतात. किंवा वारकऱ्यांना तशी संधी न मिळू देण्यासाठी झारीतले शुक्राचार्य काम करत असतात.
#दुकानदारीच्या_चिंधड्या
(लेखक राहूल बोरसे हे आतंराष्ट्रीय संगणक विश्लेषक असून सामाजिक विषयांवर ते परखड लेखन करतात.)