भारताच्या शेती विकासासाठी औदोगिक विकास: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारताची ओळख म्हणजे भारत हा शेती प्रधान देश होय. जशी स्वातंत्र्यपूर्व काळात ही ओळख होती ती आज ही तशीच आहे. मात्र दुर्दैवाने आज ही आपण भारतीय शेतीचा विकास करण्यात यशस्वी झालो नाही. या पार्श्वभूमीवर, बाबासाहेब आंबेडकरानी सांगितलेला उद्योग विकासातून शेती विकास हा उपाय आज ही कसा उपयोगी ठरू शकेल त्याचे सखोल विश्लेषण केले आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील प्रा. डॉ. पी. एस. कांबळे यांनी….;

Update: 2022-12-05 12:15 GMT

   डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ होते. कारण त्यांचे सर्वाधिक शिक्षण अर्थशास्त्रातील होते. विशेष म्हणजे ते शिक्षण परदेशात म्हणजेच अमेरिका आणि इंग्लंड मध्ये झाले होते. त्यांचा एम. ए. ,पीएच. डी. आणि डी. एस सी. साठीच्या संशोधणा साठी ही अर्थशास्त्र हाच विषय होता. विशेष म्हणजे त्यांचे हे अर्थशास्त्रातील संशोधन अमेरिकेतील कोलंबिया आणि इंग्लंड मधील इंग्लंड विद्यापिठात झाले होते. एवढेच नव्हे तर, ते विकास धोरणकर्ते कारण ते 1942 ते 46 या कालावधीत बाबासाहेब कौन्सिल मंत्रीमंडळात कॅबिनेट दर्जाचे श्रम, ऊर्जा आणि जल मंत्री होते. कारण या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी स्वातंत्र्यपुर्वकालीन विकास धोरण निश्चितीत आणि अम्मलबजावणीत महत्वाचे योगदान दिले आहे. बाबासाहेबांची देशाबद्दल चे प्रेम आणि राष्ट्रभक्ती यामुळे त्यांनी देशासमोरील आर्थीक आणि सामाजिक समस्याच त्यांचा संशोधनाचा विषय होता. असेच एक त्यांचे अत्यंत महत्वाचे संशोधण म्हणजे भारतीय शेतीच्या समस्या होय. भारताची तोंड ओळख म्हणजे भारत हा शेती प्रधान देश होय. ती जशी स्वातंत्र्यपूर्व काळात तशीच ती आज ही म्हणजेच स्वातंत्रोत्तर काळात ही. मात्र दुर्दैवाने आज ही आपण भारतीय शेती च विकास करण्यात आपण यशस्वी झालो नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (doctor Babasaheb Ambedakar )शेती समस्या विषयक विचार आणि उपाय आपणास त्यांच्या 1918 मध्ये प्रसिद्ध झालेल्या "Small Holdings in India and Their Remedies" या जर्नल ऑफ इंडियन इकनॉमिक सोसायटी या अत्यंत नामाकींत आणि प्रसिद्ध अशा जर्नल मध्ये, आणि त्यांच्या 1947 मध्ये प्रसिद्ध झालेल्या " States and Minorities" या प्रसिद्ध अशा ग्रंथात. ते सर्व प्रथम भारतीय शेतीचे महत्व , शेती पुढील समस्या आणि नंतर ठोस अश्या उपाय योजना सुचवितात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, शेती ही भारतासारख्या देशा साठी अत्यंत महत्वाची आहे. कारण शेतीच लोकांची त्यांत महत्वाची अन्न ही गरज भागवू शकते. उद्योगांचा विकास कच्या माला शिवाय होऊ शकत नाही आणि शेती आवश्यक कच्चा माल पुरविण्यात अत्यंत महत्वाची भूमिका पार पाढते. तसेच प्राथमिक उदयोग विकासात शेतीचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. मात्र दुर्दैवाने भारतीय शेती पुढे अत्यंत महत्वाच्या समस्या असून त्याची व्याप्ती आणि तीव्रता अधिक आहे. भारतीय शेतीचे आकारमान अत्यंत लहान असून ते विखुरलेले आहेत. असाम मध्ये शेतीचे सरासरी आकारमान 3.37 एकर अत्यल्प असताना ते 3.3 एकर पर्यन्त कमी झाले आहे. तर ते मद्रास मध्ये सरासरीने फक्त 7 एकरच राहिले आहे. त्यानंतर बाबासाहेब पुण्य जवळील पिंपळा सौदागर या खेड्यात ही शेतीचे आकारमान किती अल्प आहे ते स्पस्ट केले आहे. त्यांच्या मते, 1 ते 2 एकर आकारमान असलेले 164 शेतकरी, तर 20 ते 30 गुंठे आकारमान असलेले 136 शेतकरी होते. या वरुण खेड्यात ही शेतीचे आकारमान किती लहान आहे ते स्पस्ट केले आहे. त्यानंतर बाबासाहेब शेतीवर कसे अतिरिक्त अवलंबित्व आहे ते स्ट करतात. शेतीवर उदरनिर्वाहाचे साधन म्हणून अवलंबून असणार्‍या लोकांचे प्रमाण 71.5% एवढे अतिरिक्त असून ते परदेशात इंग्लंड 15.3%, अमेरिका 33.3% आणि आयर्लंड 44.7% एवढे अत्यल्प आहे. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय शेतीची उत्पादकता अत्यल्प असल्याचे सिद्ध करतात. कॅनडा मध्ये दर एकरी उत्पादकता 1723 किलो गहू आणि 3191 किलो मका आहे , तर ती भारतातील 555 आणि 766 अनुक्रमे एवढीच आहे. या बरोबरच डॉ. आंबेडकर हे सांगतात की शेतीचे योग्य आर्थिक अकारमानाचे विचार फक्त मागणी किंवा प्राप्ती दृष्टीकोनातून न करता पुरवठयाच्या बाजूने करायंला पाहिजे , ज्यात उत्पादन घटकांच्या प्रमाणाचा आणि वापराचा विचार करणे गरजेचे आहे. दुर्दैवाने भारतात शेती अवजारे आणि प्राणी उपलब्धता आणि वापर ही कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कांही अत्यंत महत्वाचे उपाय सुचविले आहेत. मात्र त्यात त्यांनी सर्वात अधिक महत्व औदोगिक विकासास दिले आहे. त्याच्या मते, ओदोगिक विकास हाच प्रभावी आणि सिद्ध उपाय आहे, जो अमेरिकेत सिद्ध ही झाला आहे आणि भारतात राबविणे अत्याश्यक आहे. त्यासाठी भारताने औदोगीकरनास प्राधान्य देवून प्रामाणिक प्रयत्न करावा त्यातून शेतीचा विकास होवून देशाचा ही विकास होईल. म्हणून भारताच्या शेती विकासाठी औदोगिक विकास अत्यावश्यक आहे. तोच अत्यंत खात्रीचा, सिद्ध आणि विश्वसनीय उपाय आहे. त्याबरोबरच शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा आणि तो सरकारी उद्योगाचा असेल तर अधिकच चांगले होईल. या बरोबरच, शेतीचे एकत्रीकरण आणि तुकडेजोड करून आकारमान वाढवावे, शेतीतील आतिरिक्त मनुष्यबळ बिगर शेती रोजगारात गुंतविणे, शेती आदानांचा वापर वाढवावा. म्हणूनच औदोगिक विकास हाच शेती विकसाचा प्रभावी उपाय आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात.

भारताची वर्तमान विकास स्थिती (Present State of Development of India) :

आज ही भारत शेती प्रधानच देश आहे. शेती हाच ग्रामीण आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आज ही भारतीय शेती 60% पेक्षा अधिक लोकसंखेचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. म्हणजेच बिगर शेती रोजगार निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो नाही कारण उदोग विकसच केंद्र बिन्दु आपण शहरी भागच ठेवला , त्यात थोडाबदल झाला आहे मात्र तो अपेक्षित नाही. त्यातच शेतीतील रोजगार हंगामी असून त्यातील स्त्रीयांचा सहभाग अधिक आहे. मात्र दुर्दैवाने स्त्री आणि पुरुष यांच्या वेतन दरात खूपच फरक आहे. आपल्या देशात खाजगी मालकी आहे. शेतीला उदोगाचा दर्जा दिलेला नाही. दर्जा दिलेला नाही आणि सरकारी मालकीच्या उदोगाचा दर्जा तर अजिबातच दिलेला नाही. आज ही ते ग्रामीण अर्थव्यवस्थेचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. भारतीय शेतीपुढे आज ही अल्प जमीन धारणा आणि विखुरलेलेच आहे. किम्बहुणा शेतीचे आकारमान खूपच लहान लहान होत आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर विखुरले जात आहे. विशेष म्हणजे शेतीचे योगदान देशाच्या विकासात सातत्याने घटतच आहे. नियोजनाच्या सुरवातीच्या काळात भारतीय शेती आपल्या देशाच्या स्थूल देशांर्गत उत्पादनात 50% पेक्षा अधिक होता तो आज 20% पेक्षा ही कमी आहे. मात्र त्या वेळेलाच शेती वरील आपले उदरनिर्वाहाचे साधन म्हणून आपले अवलंबित्व फारसे कमी झाले नाही. देशातील शेतीत सार्वजनिक गुंतवणूक सातत्याने कमी कमी होत आहे आणि खाजगी गुंवणूक अत्यंत अल्प असून होणारी भांडवल निर्मिती ही अल्पच आहे. विशेष म्हणजे आज ही भारतीय शेती मान्सून वरील जुगारच आहे. म्हणजेच आपण शेतीसाठी आवश्यक जल सिंचन सुविधा निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो नाही. आज ही भारतीय शेतीची उत्पादक्ता तुलनेने कमीच आहे, जरी देशात हरितक्रांति झालेली असली तरी.

वर्तमानकालीन उपयुक्तता (Present Importance) :

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शेती विषयक उपाय आणि धोरणेच भारतीय शेतीचा विकास करण्यास उपयुक्त ठरू शकतील. सर्व प्रथम आपण बाबासाहेबांनी सांगितल्या प्रमाणे शेतीला उदोगाचा दर्जा देणे अत्यावशक आहे. जर शेतीस सरकारी मालकीच्या उद्योगाचा दिला तर ते अधिकच उत्तम होईल कमीत कमी सामुदायिक आणि सहकारी शेतीचा अवलं करणे आज अत्यावश्यक आहे. सर्वात महत्वाची गोस्ट म्हणजे शेतीचा स्वतंत्र असा विकास होणे शक्य नसते , त्यासाठी उदोगांचा विकास अग्रक्रमाने करणे अत्यावश्यक असून त्याच वेळेला शेतीतील आतरिक्त लोकसंख्या बाहेर काढून औदोगिक रोजगारात समाविस्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण औदोगिक विकास हे अमेरिकेत सिद्ध झालेले विकासाचे धोरण असल्याने शेतीच्या आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी ते आज अत्यंत गरजेचे आहे. आज ही शेतीचे आकारमान अत्यंत कमी कमी होत असून जमिनीचा बिगर शेती वापर खूपच वाढत आहे ते शेती विकासास अडथळा ठरू शकेल. बाबासाहेबांनी शेतीच्या आकारमानाकडे बघताना पुरवठा बाजूने पाहणे आवश्यक , म्हणजे आदांनांच्या वापराकडे लक्ष देने आवश्यक आहे म्हनजेचे सिंचन सुविधा , अवजारे आणि ईतर ही. वर नुमद केल्या प्रमाणे देशाचे शेती, औदोगिक आणि आर्थिक विकास धोरण तयार करून प्रामाणिकपणे राबविल्यास भारतीय शेतीचा आणि अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास निश्चितच होईल , असे वाटते.

प्रा. डॉ. पी. एस. कांबळे

अर्थशास्त्र विभाग

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

Tags:    

Similar News