सामाजिक कार्यकर्ते रमेश हरळकर यांना परिस्थितीमुळे उच्चशिक्षित असुनही कचरा वेचण्याचं काम कराव लागलं. हे काम करताना ते जिथे राहत होते त्या वस्तीचं वर्णन ते 'नरक' असे करतात. कोट्यवधी लोकांसाठी मायानगरी, स्वप्ननगरी ठरणाऱ्या मुंबईला स्वच्छ ठेवणाऱ्या लोकांसाठी ती 'नरक' का ठरत असावी? याबाबत जाणून घेण्यासाठी ज्यांनी हे सगळं स्वतः भोगलंय त्या रमेश हरळकर यांचे अनुभव नक्की ऐका