देश स्वातंत्र्याच्या पंच्चाहत्तरीत पर्दापण करत असताना स्वातंत्र्याचा इतिहास नेमका काय होता हे आज पुन्हा एकदा नव्यानं समजून घेण्याची गरज आहे. देश स्वातंत्र्यांच्या लढाईत ज्यांनी नेतृत्व केले त्यांच्या विचारांची दखल घेत नव्या भारताची बांधणी करण्याची गरज आहे. खरंतर स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वातंत्र्याची व्याख्या काय आहे? देशाला 74 वर्ष पूर्ण होत असताना समाजातील प्रत्येक घटकाला सामाजिक, व्यक्तिगत, आर्थिक, राजकीय स्वातंत्र मिळालं आहे का? सध्याची परिस्थिती पाहता सामाजिक, आर्थिक स्वातंत्र्यासाठी लढण्याची गरज आहे का? शोषित-वंचितांना अद्यापही सामाजिक स्वातंत्र्यापासून दूर का राहावे लागले? यासंदर्भात माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांनी केलेले विश्लेषण नक्की पाहा.