इंदौर: 7 रुग्णांमध्ये आढळला कोरोनाचा नवीन वैरिएंट A.Y.4

इंदौर: 7 रुग्णांमध्ये आढळला कोरोनाचा नवीन वैरिएंट A.Y.4

Update: 2021-10-24 16:11 GMT

सध्या देशातील कोरोनाचा जोर ओसरला असताना देशातील मध्य प्रदेशमधील इंदौर मध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे इंदौरमधीलकोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सरकारपासून प्रशासनापर्यंत सर्वांच्याच चिंतेत वाढ झाली आहे.

त्यातच इंदौरमध्ये कोरोनाचे नवीन A. Y. 4 Variant चे 7 रुग्ण आढळल्याने इंदौरमध्ये खळबळ उडाली आहे. नव्याने संक्रमित झालेल्या 7 रुग्णांमध्ये दोन लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नेशनल सेंटर ऑफ डिजास्टर कंट्रोल याबाबत माहिती दिली आहे. या संक्रमित रुग्णांचे नमुने 21 सप्टेंबर ला जीनोम सिक्वेन्सिंगसाठी दिल्लीला पाठवण्यात आले होते. दिल्लीच्या एनसीडीसीने अलीकडेच जीनोम सिक्वेन्सिंगचा रिपोर्ट दिला आहे. यामध्ये या रुग्णांमध्ये A.Y.4 Variant ची लक्षण आढळले आहेत.

काय आहे A.Y.4?

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा एक उप-प्रकार आहे. कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये घट होत असताना महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये A.Y.4 चे रुग्ण आढळले आहेत.

Tags:    

Similar News