Charity Hospital : मोफत उपचार करणाऱ्या जिजाऊ हॉस्पिटल सारख्या संस्था सक्षम करण्याची गरज

शासनाची कुठलीही आर्थिक मदत न घेता किंवा कुठलाही सीएसआर फंड न घेता निलेश सांबरे यांनी स्वकमाईतून 24 तास हा आरोग्ययज्ञ सुरु केलाय.;

Update: 2025-04-06 09:42 GMT


"दीनानाथ" हॉस्पिटल आणि राज्यभरातील धर्मादाय हॉस्पिटलच्या लुटीचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. मात्र, काही सामाजिक संस्था या मोफत रुग्णसेवा देत आहेत, अशा संस्थांना सरकारनं अधिक सक्षम कऱण्याची गरज आहे.

महाराष्ट्रातील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून १५०/१५० बेडच्या दोन मोफत हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत आरोग्यसेवा करण्यात येत आहे. पालघर सारख्या जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातल्या झडपोली इथं श्री. भगवान महादेव सांबरे नावानं हॉस्पिटल गेल्या सात वर्षांपासून मोफत आरोग्यसेवा देत आहे. तर ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे श्री. भगवान महादेव सांबरे क्रिस्टल केअर या हॉस्पिटलचंही जानेवारी महिन्यात उद्घाटन करण्यात आलं.




 


झडपोली आणि शहापूर इथल्या या दोन्ही हॉस्पिटलमध्ये डोळ्यांच्या ऑपरेशनपासून कॅन्सरपर्यंत सर्व प्रकारची मोफत ऑपरेशन्स केली जात आहेत. सिजरपासून NICU पर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा येथे मोफत आहेत. सर्व प्रकारची मेडिसीनही इथं मोफत पुरवली जातात. मुंबईतील पंचतारांकित हॉस्पिटलला लाजवेल अशा प्रकारची ही दोन्हीही दर्जेदार सुसज्ज रुग्णालयं मोफत आरोग्यसेवा पुरवत आहेत.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारा पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, डहाणू, विक्रमगड हे दुर्गम भाग आहेत. कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यू यामुळं हजारो मृत्यू या जिल्ह्यातील आदिवासी व गोरगरिबांचे झाले आहेत. विक्रमगडचे सुपुत्र असणारे सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक निलेश भगवान सांबरे यांनी सन २००८ पासून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्रच्या माध्यमातून कोकणातील जनतेचे जीवनमान उंचवण्यासाठी शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, शेती या माध्यमातून भरीव काम सुरु केलंय. पालघर जिल्ह्यात कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यूचा शिक्का पुसण्यासाठी विक्रमगडसारख्या ठिकाणी वडिलांच्या नावानं सुसज्ज श्री. भगवान महादेव सांबरे नावाचं मोफत हॉस्पिटल सुरु केलंय़. दररोज दोनशेच्या वर येथे ओपीडी असते. यातील बहुतांश रुग्ण दुर्गम व आदिवासी भागातील असतात. मुंबईतील एमडी डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांच्यावर मोफत उपचार व ऑपरेशन केले जातात. या हॉस्पिटलमुळं पालघर जिल्ह्यातील कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यू कमी होण्यास मोठा हातभार लागला आहे. अशा स्वयंसेवी रुग्णालयांना खऱ्या अर्थानं सरकारनं अधिक सक्षम करण्याची गरज आहे.


 



ठाणे जिल्ह्यातील बहुतांश रुग्णांना उपचारांसाठी मुंबई किंवा नाशिकला जावं लागतं. महामार्गावरील अपघातांमध्ये मृत्यू होण्याचं प्रमाणही मोठं आहे. बालमृत्यू आणि मातामृत्यूचंही प्रमाण अधिक होतं. लोकसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवताना त्यांनी येथील जनतेच्या सेवेसाठी मोफत हॉस्पिटल सुरु करू, असं आश्वासन निलेश सांबरे यांनी दिलं होतं. अपक्ष उमेदवार म्हणूनही जनतेनं त्यांच्या पारड्यात तब्बल अडीच लाख मतांचं दान टाकलं. जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत शहापूरमधील आसनगाव इथं मुंबईतल्या जेजे हॉस्पिटलसारख्या भव्य सुविधा देणाऱ्या श्री. भगवान महादेव सांबरे क्रिस्टल केअर हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा जानेवारी महिन्यात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ पत्रकार मंदार फणसे, आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडला. येथेही सिजरपासून कॅन्सरपर्यंत सर्व आजारांवर मोफत उपचार केले जातात. ठाणे जिल्ह्यातील तळागाळातील जनतेसाठी ही मोठीच आरोग्य सुविधा झाली आहे..




 


शासनाची कुठलीही आर्थिक मदत न घेता किंवा कुठल्याही प्रकारचा सीएसआर फंड न घेता निलेश सांबरे यांनी उद्योगातून केलेल्या स्वकमाईतून 24 तास हा आरोग्ययज्ञ सुरु केलाय. आजच्या सेवेच्या नावाखाली लुटीच्या काळात जिजाऊ संस्थेची ही आरोग्यसेवा जनतेला नक्कीच आधार बनली आहे.

जिजाऊ संस्थेची मोफत आरोग्यसेवा व शिक्षणसेवा :-

१) १५० बेडची दोन हॉस्पिटल

२) कोकणात २४ मोफत ऍम्ब्युलन्स

३) दरवर्षी २०० च्यावर आरोग्य शिबिरे व उपचार

४) महिलांसाठी कॅन्सलप्रतिबंधक लस

५) महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण व मदत

६) ८ मोफत सीबीएससी शाळा आणि महाविद्यालय

७) अंध व मतिमंद शाळा

८) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

९) कोकणात ४५ वाचनालये

१०) आयआयटी व जेईई साठी मोफत प्रशिक्षण

११) ३५ पोलिस प्रशिक्षण केंद्र

१२) २ अग्निशमन प्रशिक्षण केंद्र

१३) दरवर्षी २५ लाख वह्यांचे वाटप

१४) महिलांसाठी विविध कोर्स प्रशिक्षण

१५) शेकडो नेत्रदान व रक्तदान शिबिरे

Tags:    

Similar News