निरोगी जीवनासाठी ४ हजार कि.मी. चा सायकल प्रवास
भारत देश आणि देशातील तरुण पिढी निर्व्यसनी आणि निरोगी रहावी ही आजच्या काळाची गरज आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी औरंगाबाद शहरातील सेवानिवृत्त क्षेत्रीय अधिकारी यांनी साडेचार हजार किलोमीटरचा सायकल प्रवास ( cycle journey ) केला. प्रवासात लहानापासून मोठ्यांनी प्रोत्साहन दिल्याचं प्रवास करणारे निवृत्त अधिकारी दिनकर भिकाजी बीरारे यांनी सांगितले.;
साधारण कुटुंबात जन्मलेले सिडको कार्यालयातील निवृत्त क्षेत्रीय अधिकारी दिनकर भिकाजी बिरारे त्यांचं शालेय शिक्षण सातवी पर्यंत संभाजी नगर येथे तर दहावीपर्यंत त्यांनी मामाच्या गावात शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये काम केले, त्यानंतर त्यांनी सिडको कार्यालयामध्ये चार रुपये हजेरी प्रमाणे काम केले. नोकरी करत हळूहळू एमए,एल एल बी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी प्रमोशन मिळत गेले आणि ते अधिकारी पदावर पोहचले. मात्र या पदापर्यंत गेल्यानंतरही त्यांनी आपला साधेपणा सोडला नाही. अधिकारी असल्यामुळे त्यांना दारापासून कार्यालयापर्यंत चार चाकी वाहन होते. मात्र या चारचाकी वाहनामुळे माझ्या शरीराला आळस येईल. यामुळे ते चार चाकी वाहन न घेता पायी घरापासून कार्यालयापर्यंत जात असे. सिडको कार्यालयमध्ये त्यांनी 36 वर्ष सहा महिने नोकरी करत क्षेत्रीय अधिकारी म्हणून २०१३ मध्ये सेवानिवृत्ती घेतली. आज 66 व्या वर्षांमध्ये त्यांना एकही औषध गोळी सुरू नाही. त्यांना कुठलाही आजार जगडलेला नाही. यामुळे ते 66 व्या वर्षी देखील स्वतःच्या शेतीमध्ये ११०० सीताफळांची झाडे जगवतात आणि त्यांची मशागतही करतात.
देश निरोगी व्हावा यासाठी ऊर्जा खर्च करायची, या हेतूने आज ६६ व्या वर्षी देखील मी निरोगी आहे, यामुळे माझा देशही निरोगी असावा, अशी माझी इच्छा आहे. यामुळे आता माझ्यामध्ये जी ऊर्जा आहे ती मला देशाचे तरुण निर्व्यसनी आणि देश निरोगी व्हावा यासाठी खर्च करायची आहे. हे उद्दिष्ट समोर ठेवून मी औरंगाबाद पासून ओंकारेश्वरपर्यत ४ हजार किलोमीटरचा सायकलवरुन प्रवास ( cycle journey ) करत परिक्रमा केली. या प्रवासादरम्यान व्यसनाधीनता आणि योगासना संदर्भात जनजागृती केल्याचे दिनकर भिकाजी बीरारे यांनी सांगितले. त्यांच्यासोबत सायकल स्लिपींग बॅग दोन कपडे पाणी बॉटल इत्यादी साहित्य सोबत होते.
२९ डिसेंबर २०२२ ला हा प्रवास सुरू करण्यात आला. त्यानंतर २ जानेवारीला २०२३ ला ते ओंकारेश्वर पोहचले. ४ जानेवारीला ओंकारेश्वर येथून नर्मदा परिक्रमेला सुरुवात केली. आणि २४ फेब्रुवारी रोजी पुन्हा ते ओंकारेश्वरला पोहचले. रस्त्याने जाताना नागरिकांनी कुणी घरात तर कुणी मंदिरात जेवण दिले. तसेच यावेळी १६०० रुपये दक्षिणा दिली. हे पैसे लहान मुलांना चॉकलेट घेऊन दिले. यादरम्यान त्यांना कुठलाच त्रास जाणवला नाही. त्यांनी दररोज रोज ५०-६० किमीचे अंतर सायकल वरुन प्रवास करुन पार केले. औरंगाबाद इथून सायकलवरुन सुरु झालेला नर्मदा परिक्रमेचा प्रवास ४ हजार किलोमीटरचे अंतर पूर्ण करुन पुन्हा औरंगाबादला हा प्रवास थांबला. याचा मला खूप आनंद आहे आणि या प्रवासातून मला खूप काही शिकायला मिळाले असे दिनकर भिकाजी बीरारे यांनी सांगितले. या प्रवासादरम्यान नागरिकांनी मला भरभरून प्रेम दिले, त्याबद्दल मी प्रत्येकाचा आभारी आहे. सकारात्मक ऊर्जा घेऊन प्रत्येकाने हे केलं तर आयुष्यात त्यांना सकारात्मकता दिसेल, असे दिनकर भिकाजी बिरारे यांनी सांगितले.