भारतात कोरोनावरील लस पुढच्या महिन्यात?

कोरोनावरील भारतीय लसीबाबत अत्यंत सकारात्मक बातमी....;

Update: 2020-12-03 16:01 GMT

जगभरातील काही देशांमध्ये कोरोनावरील लस आलेली आहे. भारतात कोरोनावरील लस कधी येणार यावर AIIMSचे संचालक डॉ. रणजीप गुलेरिया यांनी कोट्यवधी भारतीयांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या सुरूवातीला कोरोनावरील लस येण्याची शक्यता आहे, असे गुलेरिया यांनी सांगितले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनावरील भारतीय लस सध्या चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहे. सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक दोन्हींच्या लस सध्या अंतिम टप्प्यात आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

डिंसेंबरच्या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा जानेवारीपर्यंत लस येईल आणि भारतीय नियामक प्राधीकरणाकडून या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. या लसींची चाचणी ७० ते ८० हजार लोकांवर चाचणी करण्यात आली आहे त्यांचे परिणाही सकारात्मक असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. लस सुरक्षित असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. केंद्र आणि राज्यांच्या पातळीवर लसीच्या वितऱणाचे नियोजन युद्धपातळीवर सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News