मुंबईत आजारांचा ताप ; पालिकेचे आवाहन

Update: 2023-08-09 03:52 GMT

मुंबईमध्ये दिवसेंदिवस आजारांचा ताप वाढत आहे. मुंबईमध्ये मलेरिया, डेंग्यू आणि गॅस्ट्रो या आजारांचा मोठ्याप्रमाणात समावेश आहे. १ ते ६ ऑगस्ट या कालावधी मध्ये आजारांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली दिसुन आली आहे. मलेरियाचे २२६, डेंग्यूचे १५७ रुग्ण या सहा दिवसांत आढळून आले. स्वाइन फ्लूचा प्रादुर्भावही वाढता आहे. या आठवड्यात या आजाराच्या ५६ रुग्णांची नोंद झाली.

मुंबईतील रुग्णसंख्या

मुबईती जुलै महिन्याची तुलनात्मक १ ते ६ ऑगस्ट आणि आकडेवारी समोर आली आहे. मलेरिया - २२६-७२१, लेप्टो - ७५- ४१३, डेंग्यू - १५७- ६८५, गॅस्ट्रो- २०३- १७६७, कावीळ - ६- १४४, चिकुनगुनिया- ९- २७, स्वाइन फ्लू - ५६- १०६ ही आकडेवारी धक्कादायक असल्याने आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

महानगरपालिकेकडून डास मारण्यासाठी केलेली ‘फॉगिंग’ करण्यात आले आहे. यामध्ये ६,५६५ फिलिंग मशिन वापरण्यात आल्या आहेत तर आता पर्यंत २०,७२९ इमारतींच्या परिसरांची धूरफवारणी करण्यात आली आहे. २,५३,१२४ झोपड्यांची धूरफवारणी करण्यात आली आहे

दरम्या डेंग्यू नियंत्रणासाठीही महानगर पालिकेवतीने ३,५२,४१६ घरांची तपासणी केली केली. तर ३,७४,३२७ कंटेनर ची तपासणी केली आहे. यामध्ये एडिस डासांच्या उत्पत्तीची ५,११५ स्थाने आहेते.

लेप्टोस्पायरोसिसच्या प्रतिबंधासाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत

साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या संपर्कात आल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार ७२ तासांच्या आत रोगप्रतिबंधक उपचार घ्यावे पूर किंवा मुसळधार पावसानंतर साचलेल्या पाण्यात जाऊ नये. मुसळधार पावसात अनवाणी चालू नये

पालिकेची आरोग्य केंद्रे, दवाखाने व रुग्णालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

Tags:    

Similar News