दोन डोस घेतल्यानंतर सुद्धा 500 जण पॉझिटिव्ह

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतर ही पुण्यात 500 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त होत असताना , पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी लसीकरणानंतरही नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

Update: 2021-07-28 02:18 GMT

पुणे// कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतर ही पुण्यात 500 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त होत असताना , पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी लसीकरणानंतरही नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.


लशीचे 2 डोस घेतल्यानंतर 14 दिवसानंतर अँटीबॉडीज तयार होतात. शिवाय 70 टक्के लोकांमध्ये इम्युनिट तयार होण्यासाठी वेळ लागतो.त्यामुळे लस घेतल्यानंतरही नागरिकांनी कोरोना संदर्भात सरकारने घालून दिलेलं सर्व नियम पालन आवश्यक आहे.

ज्या नागरिकांनी लस घेतल्यानंतर कोरोनाची नियम, जसं की, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, शारीरिक अंतर राखणे या नियमाचे पालन केले नाही अशा नागरिकांचा लसीकरणानंतर 14 दिवसात कोरोनाने ग्रासले आहे असं डॉ.भारती यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News