भारतातील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) या संशोधन करणाऱ्या संस्थेने केलेल्या संशोधनात धूम्रपान करणारे आणि शाकाहार व मांसाहार करणाऱ्या लोकांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कसा होतो याचा अभ्यास करण्यात आला आहे. या सर्वेत वय, लिंग, पहिला काही आजार आहेत का? ते धूम्रपान करतात का? मद्यपान करतात का? ते कसा प्रवास करतात? आहार काय घेतात? या सर्व बाबीचा या सर्वेत अभ्यास करण्यात आला आहे, या सर्वेतील निष्कर्षाविषयी इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांचे विश्लेषण....
- सर्वेक्षणात धूम्रपान करणाऱ्यांच्यात कोरोना होण्याचं प्रमाण कमी
- धुम्रपान कारणार्यांच्यात सिरो पॉझिटिव्ह असण्याचे प्रमाण ६.८८ टक्के
- धुम्रपान न करणाऱ्यांचे प्रमाण हे १०.११ टक्के
- धुम्रपान कोरोनापासून बचाव करत याची शक्यता तर्काच्या आधारे कमी
- संशोधनात त्रुटी असू शकतात
- काही सामाजिक कारणे देखील असू शकतात
- धुम्रपान करणार्यांना संक्रमण कमी झालं आहे
- गोष्ट तार्किक दृष्टया न पटणारी
- धुम्रपान कारणार्यांच्यात जंतुसंसर्ग जास्त
- धुम्रपान कारणार्यांच्यात संसर्ग कमी होण्याची इतर कारणे
शाकाहारी लोकांच्यात संक्रमण कमी, याची काय करणे काय आहेत?
- शाकाहार करणाऱ्यांच्यात सिरो अभिसरण होण्याचं प्रमाण ६.८६ टक्के
- संमिश्र आहार घेणाऱ्यांच्यात हे प्रमाण ११ टक्के इतकं आहे.
- जागतिक स्तरावर संशोधन करणाऱ्या संस्था शाकाहाराचा प्रसार करणाऱ्या संस्था देखील संतुलित आहार घ्या असे सांगतात
- हा सर्व्हे वगळता इतर कोणत्याही संशोधन करणाऱ्या कोणत्याही संस्थेकडून असे सांगण्यात आलेलं नाही.
- तुम्ही संतुलित आहार घ्या.
- मांसाहार करणार्यांनी या संशोधनावरून ते बंद करू नये.
सार्वजनिक वाहतूक करणाऱ्यांपेशा स्वतःच वाहन वपरणाऱ्यांच्यात संसर्गाचा धोका कमी
- स्वतःचं वाहन वापरणाऱ्यांच्यात संसर्गाचा प्रमाण ९.३ टक्के
- सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्यांच्यात हे प्रमाण १५.६ टक्के
- गर्दीमधून जाणाऱ्यांच्यात संसर्गाचा प्रमाण जास्त आहे
- ज्यांना शक्य आहे त्यांनी सायकल मोटरसायकलचा वापर करा
- सार्वजनिक वाहनातून प्रवास करत असाल तर काळजी घ्या