कोरोनाचा लैगिंक आयुष्यावर काय परिणाम झाले?
कोरोनाचा व्यक्तींच्या लैगिंक आयुष्यावर काय परिणाम झाला? कोरोनाचा लैंगिक अवयवांवर काही परिणाम झाला आहे का? मानसोपचार व लैगिंक समस्या तज्ज्ञ डॉ.प्रशांत चक्करवार यांचा लेख;
Corona Virus Disease -19 (COVID-19) हया कोरोनाच्या महामारीचा उगम नोव्हेंबर 2019 मध्ये चीन मधील वूहान शहरातून झाला. बघता बघता हया महामारीने वैश्विक महामारीचे स्वरूप घेतले व एप्रिल 2020 पर्यंत हया आजाराने एखाद्या सुनामीप्रमाणे सर्व जगाला आपल्या विळख्यात घेतले. सर्व ठिकाणी एकदम अफरातफरी माजली. कधी नव्हे ते आपण लॉकडाउन, Quarantine हया सारखे शब्द जीवनात पहिल्यांदा अनुभवले.
कोरोनाच्या हया वैश्विक महामारीने आजपर्यंत जगभरात सरकारी आकड्याप्रमाणे 40 लाख लोकांनीं आपले जीव गमावले. हया महामारीचे आपल्याला आर्थिक, सामाजिक व राजकीय अश्या सर्व क्षेत्रात दुष्परिणाम दिसत आहेत. पण त्या पेक्षाही भयंकर व मानवी समाजासाठी दूरगामी म्हणजे हया आजाराचे आपल्याला अर्थवट कळलेले शारीरिक परिणाम.
त्यापैकीच एक म्हणजे कोरोना महामारीमुळे उद्भवलेले लैगिंक आजार. मी एक लैगिंक समस्या तज्ज्ञ असल्यामुळे असे रुग्ण माझ्याकडे नेहमी येतात. पण माघील सप्टेंबर-ऑक्टोबर पासून लैगिंक शिथिलता (Erectile Dysfunction) ही समस्या घेऊन येणारे रुग्ण अचानक चार-पाच पटीने वाढले. अगदी सुरुवातीला वाटले कोरोना महामारीच्या हया sudden traumatic इव्हेंट मुळे, job loss व त्यामुळे येणाऱ्या उदासीनतेमुळे हे प्रमाण वाढले असावे.
मग मी जगभरात असे काही रिसर्च पेपर येत आहेत का? ह्याचा शोध घेऊ लागलो. पण जगभरातील डॉक्टर्ससाठीसुद्धा ही गोष्ट नवीनच होती. जानेवारी 2021 मध्ये अश्या प्रकारचे रिसर्च पेपर येऊ लागले व कोरोना महामारीमुळे लैगिंक शिथिलथेचे रुग्ण वाढत आहेत. ह्याची जगभरात वेगवेगळ्या ठिकाणावरून रिपोर्टींग येऊ लागली.
खरंच काय कारण असतील कोरोनामहामारीमुळे येणाऱ्या लैगिंक शिथिलथेमाघे??? रिसर्च पेपर शोधू लागलो. त्यात पुढील कारणे प्रामुख्याने आढळली. एकतर कोविड 19 ही Vascular inflammatory disease आहे. त्यामुळे रक्तवाहिन्यांना सूज येते. जर रक्त वाहिन्यांना सूज आली तर लिंगाकडे लैगिंक ताठरता येण्यासाठी आवश्यक तेवढा रक्ताचा पुरवठा होऊ शकणार नाही व लैगिंक शिथिलता (Erectile Dysfunction) येईल. हया व्यतिरिक्त कोविडच्या हया आजाराचा आपल्या सेक्स हार्मोन्स वर पण परिणाम होत असावा ह्यावर संशोधन चालू आहे.
हया महामारीत वाढलेल्या ताणामुळे सुद्धा लैगिंक समस्या निर्माण होत असाव्यात. हया व्यतिरिक्त कोविडच्या आजारामुळे जबरदस्त शारीरिक थकवा हे सुद्धा कोविडनंतर येणाऱ्या हया लैगिंक समस्यांचे कारण असू शकते. संशोधन चालू आहे. पण आपण घाबरून जाण्याचे काही कारण नाही.
Post-Covid complications वर आपण लगेच उपचार केले तर आपण कोविडमुळे होणाऱ्या हया लैगिंक समस्यांवर मात करू शकतो. हे मी अश्या रुग्णांना यशस्वीरित्या दिलेले माझ्या उपचाराच्या अनुभवावरून सांगू शकतो. कोविड नंतरही आपल्या शरीरात inflammatory process ही 30 ते 40 दिवस सुरु राहू शकते. हया वेळेत जर आपण योग्य उपचार केले तर आपण हया समस्येवर नक्की मात करू शकतो.
डॉ.प्रशांत चक्करवार,
मानसोपचार व लैगिंक समस्या तज्ञ,
सारस्वत चौक, यवतमाळ