चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने भारत, जपान, थायलंड आणि अमेरिका या देशांमध्येही नव्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, जपानमधील तज्ज्ञांनी कोरोनाबाबत इशारा दिला आहे. जपानी मीडिया एनएचके वर्ल्डच्या म्हणण्यानुसार, तज्ञांचे म्हणणे आहे की, 15 जानेवारीनंतर कोरोनाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होताना दिसू शकते. याशिवाय जपानने कोरोनाचा (Covid 19) संसर्ग रोखण्यासाठी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी आवश्यक केली आहे. म्हणजेच आता चीनमधून जपानमध्ये येणाऱ्यांची जपानमध्ये पोहोचताच त्यांची कोरोना चाचणी केली जाईल. आतापर्यंत येथे येणाऱ्या चिनी प्रवाशांना फक्त कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे आवश्यक होते.
भारतातील कोरोनाची स्थिती काय आहे?
रविवारी भारतात कोरोनाचे 163 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या 2 हजार 423 सक्रिय केसेस आहेत.
आतपर्यंत जगात किती कोरोना रुग्ण आढळले?
कोरोना वर्ल्डोमीटरनुसार, जगात आतापर्यंत 66 कोटी 85 लाख 63 हजार 221 रुग्ण आढळले आहेत. 11 जानेवारी 2020 रोजी चीनमधील वुहान येथे एका 61 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. जगातील कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू होता. यानंतर मृत्यूची प्रक्रिया वाढू लागली. आतापर्यंत 67 लाख 13 हजार 388 मृत्यू झाले आहेत.
आतापर्यंत 17 देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे..
स्वीडन, जर्मनी, मलेशिया, कतार, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मोरोक्को, फ्रान्स, यूके, स्पेन, अमेरिका, जपान, इस्रायल, भारत, इटली आणि दक्षिण कोरियाने चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. येथे चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह कोरोना रिपोर्ट दाखवावा लागेल. मोरोक्कोने आधीच चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. तैवानने चीनमधून येणाऱ्यांसाठीही कोविड चाचणी अनिवार्य केली आहे. पाकिस्तान आणि फिलिपाइन्सही नजर ठेवत आहेत. थायलंड आणि न्यूझीलंडने कोणतेही निर्बंध लादण्यास नकार दिला आहे.