राज्यात कोरोना रुग्ण संख्येत घट… पाहा काय आहे आजची स्थिती?
राज्यात कोरोना रुग्ण संख्येत घट… पाहा काल आणि आजची स्थिती नक्की काय आहे?;
राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. आज राज्यात ५१ हजार ७५१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. तर ५२ हजार ३१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज राज्यात कोरानाने २५८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे . सध्या महाराष्ट्र राज्याचा मृत्यूदर १.६८% एवढा आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण २८,३४,४७३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.९४% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,२३,२२,३९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३४,५८,९९६ (१५.४९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३२,७५,२२४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,३९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
काय होती कालची स्थिती?
दिनांक ११ एप्रिल २०२१ रोजी राज्यात ६३ हजार २९४ नवीन रुग्णांचे निदान झाले होते. तर ३४ हजार ००८ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. राज्यात कोरानाने ३४९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता . ११ एप्रिलला राज्याचा मृत्यूदर १.७% एवढा होता. आज तो १.६८ झाला आहे,
११ एप्रिलला राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.६५% इतका होता. आज त्यात घट झाल्याचं दिसून येते. आज कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ८१. ९४ टक्के इतका आहे.