राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यानंतर सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. पण दुकाने ४ नंतर बंद कऱण्यात येत असल्याने व्यावसायिकांना अडचणी येत आहे. व्यवसाय खऱ्या अर्थाने 4 वाजेनंतर असतो त्यामुळे 50 टक्केच व्यवसाय होतो आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्य सरकारने आता संपूर्ण लॉकडाऊन उठवावे अन्यथा आंदोलन करु असा इशारा व्यावसायिकांनी दिला आहे. 4 वाजेनंतर व्यवसाय बंद करण्याची सक्ती रद्द करावा आणि सर्व दुकानं सरसकट उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यवसायिकांनी केली आहे.